जळगाव जिल्हा बँक घोटाळा; सुरेश जैन यांच्याविरोधात गुन्हा
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> जळगाव जिल्हा बँक घोटाळा; सुरेश जैन यांच्याविरोधात गुन्हा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

जळगाव जिल्हा बँक घोटाळा; सुरेश जैन यांच्याविरोधात गुन्हा Bookmark and Share Print E-mail

आर्थर रोड तुरुंगात हलविण्याचे न्यायालयाचे आदेश
वार्ताहर, जळगाव

पालिकेच्या घरकुल घोटाळ्यानंतर वाघूर पाणीपुरवठा योजनेतील कोटय़वधी रुपयांच्या गैरव्यवहाराबद्दल या आधीच पोलिसात गुन्हे दाखल असताना आता जिल्हा बँक व विमानतळ विकास प्रकरणात तब्बल ६१५ कोटींचा घोटाळा झाल्याचा गुन्हा दाखल झाला असून या सर्व प्रकरणांमध्ये आ. सुरेश जैन हेच मुख्य संशयित आहेत. दरम्यान मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जैन यांना आर्थर रोड तुरुंगात हलविण्याचे आदेश देत जिल्हा न्यायालयाने मंगळवारी आणखी एक दणका दिला. महानगर विकास आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी शहर पोलीस ठाणे व जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात जिल्हा बँक व विमानतळ विकास घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात स्थानिक पोलीस गुन्हा दाखल करून घेत नसल्याने पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्या पाश्र्वभूमीवर २९ ऑक्टोबरच्या रात्री गुन्हे दाखल करण्यात आले. पाटील यांनी यापूर्वी शहर पोलीस ठाण्यात २९ जुलै रोजी वाघूर पाणीपुरवठा योजनेतील ४३ कोटी रुपयांच्या घोटाळ्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. विमानतळासाठी बेकायदा ठराव, कर्ज व गैरव्यवहार, भूकंप सहायता निधी, संत मुक्ताबाई ट्रस्टला कोटय़वधीची कर्जमाफी, नगरपालिका व महावीर पतपेढीला कोटय़वधींचे नियमबाह्य़ कर्ज, असे गुन्हे जैन यांच्याविरुद्ध आहेत. प्रदीप रायसोनी यांच्यासह तत्कालीन नगराध्यक्ष, ठरावांच्या बाजूने मतदान करणारे नगरसेवक, अटलांटा या मुंबईच्या कंपनीचे मालक व मक्तेदार, खान्देश बिल्डर्स, कृषीधन कॅटल, ईसीपी हाऊसिंग, जैन इरिगेशन सिस्टीम, जिल्हा बँकेचे तत्कालीन संबंधित अधिकारी, संत मुक्ताबाई ट्रस्टचे अध्यक्ष, आदींना संशयित आरोपी करण्यात आले आहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना सुरेश जैन व संबंधित संचालकांनी बँकेच्या निधीचा गैरवापर करीत बनावट दस्तावेज तयार करून खान्देश बिल्डर्सला (जगन्नाथ वाणी) २५३ कोटी ८० लाख ७५ हजार, कृषीधन कॅटल फिल्डला १७७ कोटी १५ लाख जैन इरिगेशन (भंवरलाल जैन व अशोक जैन) ११ कोटी ९० लाख, ईपीसी हौसिंग ३४ कोटी ७५ लाख रुपये बेकायदा व नियमबाह्य़ दिले होते. महावीर सहकारी पतपेढीच्या अध्यक्षाशी संगनमत करून जैन यांनी २००१ ते २००३ या कालावधीत बनावट उतारा व बनावट तारण कागदपत्रे देऊन आठ कोटी रुपये कर्ज दिल्याने बँकेचे नुकसान झाले. पालिकेत हितसंबंधित व्यक्ती, नगराध्यक्ष व उच्चाधिकारी समिती असल्याने पालिकेला ६४ कोटी २६ लाखांचे बेकायदा व नियमबाह्य़ कर्ज मंजूर केले होते.
१९९९मध्ये पालिकेची आर्थिक स्थिती नसताना पालिकेमार्फत विमानतळ योजना राबविली गेली. शहरात पुरेशा नागरी सुविधा देऊ न शकणाऱ्या पालिकेने विमानतळ विकासाच्या नावाखाली पाच कोटी एक लाख ८४ हजार रुपयांचा अपहार केला. जिल्हा बँकेला आर्थिक नुकसानीत टाकून श्रीसंत मुक्ताबाई ट्रस्टला एक कोटी २७ लाखांची कर्जमाफी केली. २००१मध्ये गुजरातच्या भूकंपग्रस्तांना मदत म्हणून २१ लाख रुपये बेकायदा दिले. अशा प्रकारचे हे चार गुन्हे विविध कलमान्वये दाखल झाले आहेत.
जळगाव पालिकेशी संबंधित घरकुल गैरव्यवहाराचा गुन्हा सर्वप्रथम २००६ मध्ये दाखल झाला. २९ कोटींच्या या गुन्ह्य़ात प्रत्यक्षात तब्बल सहा वर्षांनी कारवाई सत्र सुरू झाले. जानेवारी २०१२मध्ये प्रदीप रायसोनीसह इतरांना अटक झाली तर मार्चमध्ये सुरेश जैन यांना १९ मे रोजी काही आजी-माजी नगरसेवक, नगराध्यक्ष, माजी महापौर यांना अटक झाली. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले जैन हे मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्हा न्यायालयात सरकारी वकील प्रल्हाद चव्हाण यांच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जाची मंगळवारी सुनावणी होऊन अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. दीक्षित यांनी जैन यांना आर्थर रोड तुरुंगात हलविण्याचे आदेश दिले.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो