सोन्याचा भाव असलेली जमीन झाली कवडीमोलाची!
मुखपृष्ठ >> विदर्भ वृत्तान्त >> सोन्याचा भाव असलेली जमीन झाली कवडीमोलाची!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सोन्याचा भाव असलेली जमीन झाली कवडीमोलाची! Bookmark and Share Print E-mail

म्हाडाच्या नवीन चंद्रपुरातील जमीन आरक्षणाने भूखंड व्यावसायिक हादरले
चंद्रपूर / प्रतिनिधी
नवीन चंद्रपुरातील दाताळा, खुटाळा, कोसारा व पडोली येथील ३१० एकर जमीन महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाने (म्हाडा) आरक्षित केल्याने जमीन व्यावसायिकांना जबर धक्का बसला आहे. या भागात राजकारणी, कंत्राटदार, जमीन व्यावसायिक, मालगुजार, शैक्षणिक संस्थानिकांची सर्वाधिक जमीन असून कालपर्यंत सोन्याचा भाव असलेल्या या जमिनीची किंमत आता कवडीमोल झाली आहे.
या शहरालगत दाताळा, खुटाळा, कोसारा व पडोली या भागात नवीन चंद्रपूर शहर विकसित करण्यात येत आहे. म्हाडा कॉलनी, व्यवस्थापन कॉलेज, डी.एल. बी.एड. पॉलिटेक्निक कॉलेज, तसेच प्रतिष्ठित कॉन्व्हेंट व विकसित होत असलेली औद्योगिक वसाहत याच भागात आहे. त्यातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दत्ता मेघे यांचे खासगी हॉस्पिटल व इतर अनेक संस्थाही याच परिसरात येत असल्याने गेल्या दोन वर्षांत या भागातील जमिनीला सोन्याचा भाव आला होता. तीन वर्षांपूर्वीपर्यंत तीन ते चार लाख रुपये एकर असलेल्या जमिनीची किंमत ३० लाखापासून, तर ५० लाख रुपये एकपर्यंत पोहोचली होती. शंभर ते दिडशे रुपये फुटाने खरेदी केलेले प्लॉट आज ६०० ते ८०० रुपये दराने विकण्यात येत होते. अशातच म्हाडाने या भागातील रस्ते विकसित केल्याने सहा महिन्यात हा दर एक हजार रुपयांपर्यंत गेलेला होता. त्यामुळे जमीन विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या परिसरात जमीन असलेले कोटय़धीश झाले होते, परंतु म्हाडाने या परिसरातील ३१० एकर जमीन आरक्षित केल्याने सोन्याचा भाव असलेल्या जमिनीची किंमत एकदम कवडीमोल झाल्याने जमीन व्यावसायिकांना जबर धक्का बसला आहे.
म्हाडाने गृहनिर्माण कॉलनीसाठी पडोली या गावातील सव्‍‌र्हे क्रमांक ५८,५४,५२,४५,४१,४२,४३,५३,११,३३,२०,१८,२५ आरक्षित केले आहे, तर कोसारा गावातील सव्‍‌र्हे क्रमांक १२८,१३२,१३१ पासून, तर सव्‍‌र्हे क्रमांक ९० व ६५ पर्यंत जमीन तसेच याच गावालगतच्या खुटाळा येथील सव्‍‌र्हे क्रमांक ९५ पासून, तर ७२ पर्यंतची जमीन आरक्षित केली आहे. या आरक्षित जागेवर हाऊसिंग कॉलनीसोबतच म्हाडा बस स्थानक, शॉपिंग कॉम्प्लेक्स, प्राथमिक शाळा, क्रीडांगण, पोलीस ठाणे, बगीचा, मार्केट, सांस्कृतिक सभागृह, स्मशानभूमी, म्हाडा कॉम्प्लेक्स यासाठीही जागा आरक्षित केली आहे. ज्या लोकांच्या जमिनी म्हाडाने आरक्षित केल्या त्यांना शासकीय दराने किंवा तीन वर्षांपूर्वी रजिस्ट्री झाली त्या दराने पैसे देण्यात येणार आहेत. या पध्दतीने जर जमिनीचे पैसे मिळाले तर एक कोटी रुपये किंमत असलेल्या जमिनीचे केवळ ३० ते ४० लाख रुपये मिळतील. त्यामुळे जमीन मालकांना तीन पट नुकसान सहन करावे लागणार आहे. म्हाडाने ३१० एकर जमीन आरक्षित केल्याची माहिती समोर येताच आपला सव्‍‌र्हे नंबर आरक्षित झाला काय, हे बघण्यासाठी जमीन व्यावसायिकांनी येथील म्हाडा कार्यालयात एकच गर्दी केली.
विशेष म्हणजे, बहुतांश लोकांची जमीन आरक्षित झाली असून यात राजकीय नेत्यांसोबतच कंत्राटदार, जमीन व्यावसायिक, शैक्षणिक संस्थानिक, मालगुजारांच्या जमिनींचा सर्वाधिक समावेश आहे. सोन्याचा भाव असलेल्या जमिनीचे कवडीमोल दराने पैसे मिळतील, हे ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. या भागात भविष्यात जमिनीचे दामदुप्पट भाव येतील म्हणून अनेकांनी फार्म हाऊस, प्लॉट स्कीम, रो-हाऊसेस तयार केली होती, मात्र ही जमीनही आरक्षित झाल्याचे माहिती होताच जमीन मालकांना धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, काही मोजक्या लोकांची जमीन यातून वगळण्यात आलेली आहे.

चौराळा व देवाडाचे भाव कडाडले
दाताळा, खुटाळा, कोसारा व पडोली येथील ३१० एकर जमीन आरक्षित होताच लगतच्या चौराळा व देवाडातीलही जमिनीचे भाव कडाडले आहेत. कालपर्यंत चौराळा व देवाडात १२५ रुपये फूट या दराने प्लाट विकण्यात येत होते. आज त्याचा दर २५० ते ३०० रुपये फुटावर गेला आहे. विशेष म्हणजे, चौराळा व देवाडा हे दोन्ही गावे महानगरपालिकेच्या हद्दीत नाहीत. त्यात १ नोव्हेंबरपासून पालिकेचा स्थानिक संस्था कर अर्थात, एलबीटी लागू होत असल्याने व्यापारी, जमीन व्यावसायिक व दलालांनी आपला मोर्चा या दोन गावांकडे वळविला आहे. त्यामुळे येथील जमिनीचे दर कडाडले आहेत.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो