सॅण्डी वादळाचा अमेरिकेला तडाखा, १७ बळी
मुखपृष्ठ >> देश-विदेश >> सॅण्डी वादळाचा अमेरिकेला तडाखा, १७ बळी
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

सॅण्डी वादळाचा अमेरिकेला तडाखा, १७ बळी Bookmark and Share Print E-mail

पीटीआय, न्यूयॉर्क

* वादळी वाऱ्यांचा वेग ताशी ८० मैल
* अनेक झाडे उन्मळून पडली
* विद्युत उपकेंद्रात स्फोट
* मॅनहटन, न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये वीज खंडित
* देशाच्या अनेक भागांत आणीबाणी जाहीर
* न्यूयॉर्कमध्ये १३ फूट उंचीच्या लाटा
* अंदाजे २० अब्ज डॉलर्सची वित्तहानी
अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात प्रलयंकारी ठरलेल्या ‘सॅण्डी’ या वादळाने अमेरिकेची वाताहत केली आहे. या वादळात आतापर्यंत १७ जण ठार झाले असून लाखो लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

पूर्व किनाऱ्यावरून उठलेल्या या वादळाने रौद्र रूप धारण करीत निम्मा देश व्यापला आहे. कोलंबिया, मेरीलॅण्ड, न्यूजर्सी, पेनसिल्वेनिया आणि न्यूयॉर्कसह अनेक भागांत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. या दुर्घटनेमुळे अमेरिकेतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
सॅण्डी या वादळाला तापमानातील बदलांमधून अधिकाधिक ऊर्जा मिळत असल्याने ते प्रचंड वेगाने पसरत चालले आहे. त्यामुळेच या वादळाने अमेरिकेच्या पूर्व तसेच ईशान्य किनारपट्टीस चांगलेच झोडपून काढले आहे. अमेरिकेतील अनेक

विमानतळे या वादळामुळे बंद पडली असून सुमारे १३ हजार विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
या वादळासह अनेक भागात मुसळधार पाऊसही कोसळत असून त्यामुळे फिलाडेल्फिया, न्यूयॉर्क येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे. सर्वच रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी गाडय़ा व इतर वाहने रस्त्यावरील पाण्यावर तरंगत असल्याची दृश्ये दिसत आहेत.
या पुरामुळे मॅनहटननजीक एका विद्युत उपकेंद्रामध्ये स्फोट झाला असून त्यामुळे अनेक ठिकाणी विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. या पाश्र्वभूमीवर अमेरिकेच्या आण्विक नियामक आयोगाने न्यू जर्सीतील अणू ऊर्जा केंद्राला धोक्याचा इशारा दिला आहे. सध्या कोणताही आण्विक प्रकल्प बंद करण्यात आला नसला तरी चढय़ा उंचीच्या लाटा, वाऱ्याची बदलती दिशा आणि वादळाचा तडाखा यामुळे अनेक प्रकल्प ठप्प झाले आहेत.
या वादळात आतापर्यंत १७ जणाचा बळी गेला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. न्यूजर्सी येथे मोठय़ा संख्येने भारतीय कुटुंबे राहात असून तेथे ताशी ८० मैल वेगाने वारे वाहात असल्याने भीतीचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी झाडे alt
उन्मळून पडली असून त्याच्या बरोबरीनेच अनेक ठिकाणी लहान-मोठय़ा इमारती तसेच विजेचे खांबही कोसळले आहेत.
नौदलाची १४० हेलिकॉप्टर्स मदतकार्याकरिता सक्रिय झाली आहेत. या वादळामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि ठप्प झालेली वाहतूक व्यवस्था याची आपल्याला अध्यक्षीय निवडणुकीपेक्षा अधिक चिंता असल्याचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी सांगितले आहे.    
रुग्णांना हलविले
न्यूयॉर्कला सॅण्डीचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. न्यूयॉर्क शहर रुग्णालयातील जनरेटरही बंद पडल्याने तब्बल २०० रुग्णांना हलवावे लागले आहे.
वीजसंकट
वादळाने वीजपुरवठा खंडित झाला असून कॅरोलिना ते ओहियो या राज्यांपर्यंतच्या पट्टय़ातील तब्बल ६० लाख घरे विजेविना आहेत. देशाच्या वीजवितरणाच्या इतिहासातले हे सर्वात मोठे वीजसंकटही आहे. न्यूयॉर्क आणि आसपासची साडेसहा लाख घरे अंधारात आहेत.

प्रचारधुरा क्लिंटन यांच्याकडे देऊन ओबामा धावले मदतीला
सॅण्डी वादळाच्या तडाख्यानंतर अध्यक्ष बराक ओबामा हे प्रचारदौरा अर्धवट सोडून सॅण्डी वादळाला तोंड देण्यासाठी नियोजन करण्यास पुढे सरसावले आहेत,  प्रचाराची धुरा त्यांनी माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याकडे दिली आहे. बिल क्लिंटन याचा करिष्माही सर्वज्ञात असून ते आता ओबामा यांच्या वतीने शेवटच्या टप्प्यात प्रचाराचे नेतृत्व करतील. प्रचाराच्या दृष्टीने शेवटचा आठवडा महत्त्वाचा असताना सॅण्डीच्या झंझावाताने तो आठवडा झाकोळला आहे.
ओबामा यांनी सांगितले, की पुढील आठवडय़ात निवडणूक होईलच, पण वादळात सापडलेल्या लोकांचे प्राण वाचवणे, मदतकार्य करणे, ठिकठिकाणी जाऊन पाहणी करणे, अन्नपुरवठा करणे, निवारा उपलब्ध करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. लोकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे, त्यामुळे आपल्या पतीने अध्यक्ष या नात्याने त्याला प्राधान्य दिले, असे मिशेल ओबामा यांनी सांगितले.
रिपब्लिकनचे अध्यक्षीय उमेदवार मिट रॉम्नी व पॉल रायन यांनीही वादळग्रस्तांसाठी मदत सुरू केली आहे. रॉम्नी यांनी वादळामुळे प्रचारसभा रद्द केल्या आहेत.    

‘पायरेटस् ऑफ कॅरिबियन’मधील जहाज बुडाले
पायरेटस् ऑफ कॅरिबियन, डेड मॅन्स चेस्ट यांसारख्या गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटांमुळे प्रसिद्ध झालेले एचएमएस बौंटी हे जहाज सॅण्डी या वादळाच्या तडाख्यात बुडाले.
अमेरिकेच्या तटरक्षक दलाचे उपप्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल रॉबर्ट पार्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जहाजावर असलेल्या १६ कर्मचाऱ्यांपैकी १३ जणांना वाचविण्यात यश आले असले तरी ३ जण मात्र वाहून गेले. बौंटी या जहाजाचा प्रदीर्घकालीन कप्तान रॉबिन वॉलब्रिज बेपत्ता झाला असून उर्वरित दोघाजणांचे मृतदेह हाती लागले आहेत.
या जहाजास नॉर्थ कॅरोलिनाच्या किनाऱ्यापासून १४४ कि.मी. अंतरावर अटलांटिक महासागरात जलसमाधी मिळाली.
या विशाल जहाजाच्या जनित्रांत दोष निर्माण झाला आणि ते बंद पडले. परिणामी, जहाजातून पाणी उपसण्यात अडथळे येऊ लागले. त्यातच जहाजाचे मुख्य इंजिन बंद पडले आणि ही दुर्घटना घडली, असे तटरक्षक दलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो