ऑटो न्यूज
मुखपृष्ठ >> Drive इट >> ऑटो न्यूज
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ऑटो न्यूज Bookmark and Share Print E-mail

गुरुवार, १ नोव्हेंबर २०१२
अमेरिकेतही धावणार नॅनो

टाटांची नॅनो लवकरच अमेरिकी बाजारपेठेत दाखल होणार असून त्यासाठी या गाडीत अनेक बदल केले जात आहेत. अमेरिकेतील बाजारपेठ फार वेगळी आहे. त्यामुळे तेथे नॅनो सादर करताना त्यात बदल करणे अपरिहार्य आहे असे रतन टाटा यांनी अलिकडेच सांगितले. तेथे ५.२७ लाखांच्या मर्यादेत (१० हजार डॉलर) नॅनो सादर केली जाईल. सध्याची नॅनो अंडाकार असून भारतातील मध्यमवर्गीयांची दुचाकी वाहनांवर चार-चार जण बसून होणारी परवड थांबवण्यासाठी ती तयार केली होती. २००९ मध्ये तिची भारतातील किंमत २५०० डॉलर म्हणजे १.३१ लाख होती. ती जगातली स्वस्त मोटार म्हणून प्रसिद्ध आहे. अमेरिकेत स्पर्धा करण्यासाठी नॅनोला तेथील निकषांचे पालन करावे लागणार असून त्यात पॉवर स्टिअरिंग व ट्रॅक्शन कंट्रोल या सुविधा द्याव्या लागतील. अमेरिकेत नॅनोची किंमत ४.२१ लाख म्हणजे ८००० डॉलर असेल. मेक्सिकोच्या निस्सान कंपनीच्या व्हर्सा गाडीची किंमत सध्या ११,७५० डॉलर म्हणजे ६.१९ लाख रुपये आहे. तिच्याशी नॅनो कशी टक्कर देते हे पाहणे उत्सुकतापूर्ण ठरणार आहे. नॅनोची नवी आवृत्ती मोठे इंजिन व इतर सुविधांसह येणार असून नॅनो गाडी युरोपात पाठवतानाही त्यात वेगळे बदल करावे लागतील असे टाटा यांनी सांगितले. टाटा मोटर्सने २०११-१२ मध्ये ३१ अब्ज डॉलर म्हणजे १६५,६५४ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. टाटा मोटर्सच्या सहकारी कंपन्या ब्रिटन, दक्षिण कोरिया, थायलंड, स्पेन व दक्षिण आफ्रिकेत आहेत.

फोर्सची ट्रॅव्हलर-२६
alt
फोर्स मोटरच्या ट्रॅव्हलर-२६ चे राजस्थानमध्ये बुधवारी अनावरण करण्यात आले. २६ सीटरच्या मीडी बस प्रकारातील अत्याधुनिक प्रणाली असलेली ही पहिली बस असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या बसच्या चाकांसाठी वापरण्यात आलेल्या यंत्रणेमुळे मर्यादित वेग असतानाही बसचा प्रवास आरामदायी होणार आहे. पुढल्या वर्षी म्हणजेच मार्च २०१३ पर्यंत एक हजार बस विकण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले असून त्याच्या पुढल्या वर्षी चार हजार ५०० बस विकण्याचे उद्दिष्ट आहे. देशभरात कंपनीचे १७३ विक्रेते असून ४६ सव्‍‌र्हिस सेंटर आहेत. तर लवकरच विक्रेत्यांची संख्या २२३ आणि सव्‍‌र्हिस सेंटरची संख्या ६५ होणार आहे.

ऑटोकार परफॉर्मन्स शो
alt
दसरा-दिवाळी म्हणजे खरेदीचा धमाका.. याच दिवसांत तर नवनवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकाराजा सज्ज असतो. त्यातल्या त्यात गाडय़ा घेण्याकडे तर ग्राहकांचा मोठा ओढा असतो. त्यामुळेच तर कार आणि बाइक निर्माता कंपन्या या सणांकडे डोळे लावून बसलेले असतात. जाहिरातींचा भडिमार, आकर्षक कर्जयोजना, भेटवस्तू, सूट याचा धुमधडाकाही ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी केला जातो. या सर्व पाश्र्वभूमीवर मुंबईत आजपासून सुरू होत आहे ‘ऑटोकार परफॉर्मन्स शो’ म्हणजे या शोमध्ये तुम्हाला जगातील सर्व नवनवीन कार व बाइक्स पहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर या गाडय़ांमध्ये वापरले जाणारे नवनवीन गॅजेट्सची माहितीही उपलब्ध होणार आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या एमएमआरडीए ग्राऊंडवर सुरू होत असलेला शो ४ नोव्हेंबपर्यंत चालणार आहे. या शोमध्ये मर्सिडीज, पोर्शे, व्होल्वो, ऑडी आणि जग्वार या नामवंत कंपन्यांच्या गाडय़ा पहायला आणि टेस्ट ड्राइव्हसाठी उपलब्ध असतील तसेच स्कोडा, फोक्सव्ॉगन, फोर्ड, टोयोटा, निस्सान, महिंद्रा आणि महिंद्रा, ह्य़ुंडाई व रेनॉ या गाडय़ाही चालवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच सुपरकार गॅलरी हा नवीन सेक्शनही या ठिकाणी उपलब्ध असेल. भविष्यातील कार कशा असतील याचे चित्र या ठिकाणी रंगवण्यात आलेले असेल. थोडक्यात चार दिवस एमएमआरडीए ग्राऊंडवर व्रूम व्रूमची धूम असेल. शोला भेट देण्यासाठी १५० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे.

थंडरबर्डची दोन नवीन मॉडेल सादर
alt
बंगळुरू - चेन्नई येथील रॉयल एनफिल्ड कंपनीचा दुसरा प्रकल्प चेन्नई नजीक ओरगाडाम येथे २०१३ मध्ये सुरू होत असून त्यानंतर बुलेट मोटरसायकलसाठीचा प्रतीक्षा कालावधी सहा ते आठ महिने इतका खाली येईल असे सांगण्यात आले आहे. नवीन प्रकल्पात दीड लाख बुलेट दरवर्षी तयार केल्या जाणार असल्याची माहिती रॉयल एनफिल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी  वेंकी पद्मनाभन यांनी दिली. रॉयल एनफिल्ड बुलेटच्या थंडरबर्ड प्रकारातील दोन मॉडेल ५०० सीसी व ३५० सीसी गटात सादर करण्यात आले. कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष शाजी कोशी यांनी सांगितले, की कर्नाटकात या बुलेट गाडय़ांना जास्त मागणी आहे. २०१० च्या तुलनेत २०११ मध्ये या गाडय़ांचा खप ८० टक्क्य़ांनी वाढला. या वर्षी खपात २०११ च्या तुलनेत ७० टक्के वाढ झाली आहे. कर्नाटकात त्यासाठी १६ वितरक नेमले आहेत. आतापर्यंत ७५ हजार बाइक विकल्या गेल्या असून या आर्थिक वर्षांत एक लाख गाडय़ा विकण्याचा इरादा आहे. पूरक साधनाच्या बाजारपेठेत कंपनी उतरली असून त्यात लेदर, नायलॉन जॅकेट, हेल्मेट व ग्लोव्हज या साधनांचा समावेश आहे. नवीन थंडरबर्ड बुलेटची किंमत ५०० सीसीला रु. १,८६,६२२ इतकी आहे तर ३५० सीसी गटात ती रु. १,४६,४६६ इतकी आहे. अमेरिका हे रॉयल एनफिल्डची मोठी बाजारपेठ आहे. ऑस्ट्रेलिया, युरोप, लॅटिन अमेरिकेतही या गाडय़ा लोकप्रिय आहेत. त्यामुळे या देशात त्यांची निर्यात केली जाते. थंडरबर्डचे पहिले मॉडेल २००२ मध्ये सुरू करण्यात आले त्यानंतर ३५० सीसी गटात महिन्याला १००० गाडय़ा विकल्या गेल्या, असे पद्मनाभन यांनी सांगितले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो