विहंग व्हॅलीच्या पाणीचोरीचे ‘प्रताप’ पोलिसांना सादर
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> विहंग व्हॅलीच्या पाणीचोरीचे ‘प्रताप’ पोलिसांना सादर
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

विहंग व्हॅलीच्या पाणीचोरीचे ‘प्रताप’ पोलिसांना सादर Bookmark and Share Print E-mail

दररोज दीड लाख लिटर पाणी चोरले 
प्रताप सरनाईक पुन्हा अडचणीत 
आयुक्त राजीव यांचा पुन्हा दणका
प्रतिनिधी, ठाणे

घोडबंदर मार्गावर उभारण्यात येत असलेल्या ‘विहंग व्हॅली’ या गृहसंकुलासाठी बेकायदा घेण्यात आलेल्या जोडण्यांचा सविस्तर अहवाल ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने मंगळवारी रात्री कासारवडवली पोलीस ठाण्यात सादर केला. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे या गृहसंकुलाचे विकासक आहेत. या प्रकल्पासाठी महापालिकेच्या २५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीस अनधिकृतपणे १०० मिलीमीटरचे ‘टॅपिंग’ केल्याचे उघड झाले असून ही पाणीचोरी करताना कंपनीने केलेल्या ‘प्रतापां’चा सविस्तर पाढाच या अहवालात वाचला आहे.
महापालिकेच्या परवानगीशिवाय २५० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकून त्यावर १०० मिलीलीटरचे संयोजन जोडून बिनभोबाटपणे पाणीचोरी केल्याचा उल्लेखही अहवालात करण्यात आला आहे. या अहवालानुसार सरनाईक यांच्या कंपनीने गृहसंकुलासाठी दररोज सुमारे दीड लाख लिटर पाण्याची चोरी केल्याची धक्कादायक माहिती उघड होत आहे.
‘विहंग व्हॅली’ या गृहसंकुलासाठी चोरीचे पाणी वापरण्यात आलेले नाही, असा दावा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक सातत्याने करत आहेत. याप्रकरणी आयुक्त आर. ए. राजीव आकसाने कारवाई करत असल्याचा आरोप करत सरनाईक यांनी थेट राज्याचे मुख्य सचिवांकडे तक्रार केली आहे. याशिवाय शिवसेनेच्या ठाण्यातील आमदारांनी बुधवारी पोलीस आयुक्तांची भेट घेत चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी तक्रार केली. एकीकडे बचावासाठी सरनाईकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असताना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मंगळवारी रात्री गृहसंकुलातील पाणीचोरी संदर्भातील सविस्तर अहवाल कासारवडवली पोलिसांना दिला. तसेच या नव्या अहवालानुसार तपास करण्याची मागणी केली. त्यामुळे सरनाईकांसह शिवसेनेचे नेते काहीसे बॅकफूटवर गेले आहेत.
विहंग व्हॅली या गृहसंकुलासाठी चोरीचे पाणी वापरल्याप्रकरणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे उप-अभियंता संजय नार्वेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र, दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यावेळी नार्वेकर यांनी पाणी चोरी झालेली नसल्याचे जबाबामध्ये म्हटल्याने सरनाईक आक्रमक बनले. नार्वेकर यांच्या जबाबाचा आधार घेत सरनाईकांनी राजीव यांना कायदेशीर नोटीस बजावली. त्यामुळे राजीव अडचणीत सापडतील, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, विहंग व्हॅली गृहसंकुलासाठी चोरीचे पाणी वापरण्यात आले आहे, या आपल्या भूमिकेवर ठाम असलेल्या राजीव यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना फैलावर घेत पुन्हा पाहाणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवारी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी पाहाणी करून त्याचा सविस्तर अहवाल तयार केला. हा अहवाल कासारवडवली पोलिसांना देण्यात आला आहे.     
अशी झाली चोरी..
या नव्या अहवालात महापालिकच्या २५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहीनीस अनधिकृतपणे १०० मिलीमीटरचे टॅपिंग केल्याचे म्हटले आहे. तसेच २५० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी महापालिकेच्या परवानगीशिवाय टाकून त्यावर १०० मिलीलीटरचे संयोजन जोडून घेतले आहे, असा उल्लेख करण्यात आला आहे. विकासकाने महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता महापालिकेच्या २५० मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीला जोडून मोठय़ा आकाराच्या पाईपमधून पाणी घेण्यात आले. तसेच महापालिकेचा रस्ता त्यासाठी  खोदण्यात आला. हा रस्ता खोदून अनधिकृत जलवाहिनी टाकण्यात आली, असे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. महापालिकेने मुळात २५० मिलीमिटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरून दिलेली एक इंचाची सहासंयोजने (कनेक्शन) खंडित करण्यात आली आहेत व त्याऐवजी विकासकाने स्वत:च्या वितरण वाहिनीवर ही संयोजने अनधिकृतपणे स्थलांतरीत केली आहेत, असेही अहवालात म्हटले आहे. मंजुरीप्रमाणे दिलेल्या संयोजनानुसार प्रतिसंयोजन १५,५५३ लीटर पाणी पुरवठा प्रतिदिन मिळणे अपेक्षित असताना उपरोक्त अनियमिततेमुळे ५९,८३२ लीटर पाणीपुरवठा प्रतिदिन विहंग गृहसंकुलाने घेतला आहे. तसेच चार इंची व्यासाच्या जलवाहिनीमधून होणारा पाण्याचा पुरवठा पाहता विहंग व्हॅलीने दररोज तब्बल १,६९,०९३ लीटर अतिरिक्त पाणीपुरवठा घेतला आहे, असे अहवालात म्हटले आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो