प्रणब मुखर्जी, मुरली देवरा यांच्यामुळे रिलायन्सला हजारो कोटींचा फायदा
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> प्रणब मुखर्जी, मुरली देवरा यांच्यामुळे रिलायन्सला हजारो कोटींचा फायदा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

प्रणब मुखर्जी, मुरली देवरा यांच्यामुळे रिलायन्सला हजारो कोटींचा फायदा Bookmark and Share Print E-mail

अरविंद केजरीवाल यांचा आरोप
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली

केजी बेसिनचे कंत्राट देताना नैसर्गिक वायूच्या उत्खननात जेवढा जास्त पैसा लावाल तेवढा जास्त नफा मिळेल, असा रिलायन्सच्या फायद्याचा करार भाजपने केला. हा वायू २.२५ डॉलर प्रति युनिट दराने १७ वर्षे विकण्याचा करार झाला होता. या दरातच उत्पादन खर्च आणि नफा दोन्हींचा समावेश असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे, पण २.२५ डॉलरऐवजी ४.२५ डॉलर प्रति युनिट दराने खरेदी करण्यासाठी रिलायन्सने काँग्रेसच्या सरकारला भाग पाडले, असा घणाघाती आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी येथे एका पत्रकारपरिषदेत केला. तत्कालीन अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांनी एनटीपीसीला ‘जनहिता’साठी ४.२५ डॉलरच्या दराने खरेदी करायला लावून मुकेश अंबानींना दहा हजार कोटींचा फायदा मिळवून दिला, असा आरोपही त्यांनी केला.
ते म्हणाले, की मुकेश अंबानींच्या दबावाखाली दोन पेट्रोलियममंत्री, मणिशंकर अय्यर आणि जयपाल रेड्डी यांना बदलण्यात आले. अय्यर यांच्या जागी आलेले मुरली देवरा हे अंबानींचे खास विश्वासातील होते, असे म्हटले जाते. त्यांनी रिलायन्सच्या मागणीनुसार केजी बेसिनच्या उत्खननासाठी ४५ हजार कोटींचा उत्पादन खर्च मान्य करून अंबानींना १ लाख कोटींचा फायदा पोहोचवून दिला. आता अंबानी नैसर्गिक वायूची प्रति युनिट १४.२५ डॉलर मागत आहेत. ही मागणी मान्य झाली तर देशाला ४५ हजार कोटींचे नुकसान होईल आणि गॅसवर आधारित देशातील ९ हजार मेगाव्ॉट वीजनिर्मिती प्रकल्पांमधील विजेचा दर ३ रुपये प्रति युनिटवरून ७ रुपयांवर जाईल. देशात आज १५ कोटी युनिट गॅसची मागणी आहे. त्यापैकी ८ कोटी युनिट गॅसचा रिलायन्सला पुरवठा करायचा आहे, पण आतापर्यंत २.७५ कोटी युनिट गॅसचेच उत्पादन होत आहे. रिलायन्सने ३१ पैकी १३ विहिरींचेच उत्खनन केले असून ब्लॅकमेलिंग, गॅसची साठेबाजी आणि दादागिरी करीत आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सरकारवर दबाव आणत आहे. या प्रकरणी पंतप्रधान मनमोहन सिंग एकतर काँग्रेस पक्षाच्या दबावाखाली आहेत किंवा त्यांना काही कळत नसावे. काँग्रेस पक्षाने त्यांना एकापाठोपाठ एक घोटाळ्यात स्वाक्षऱ्या करून फसविले आहे, असा आरोपही केजरीवाल यांनी केला.
घरगुती गॅसच्या अनुदानासाठी सरकारपाशी ३५ हजार कोटी नाहीत, पण रिलायन्सला मात्र एका तासाच्या आत एक लाख कोटी रुपयांचा फायदा मिळवून दिला जातो, असे ते म्हणाले. केजी बेसिनमधील नैसर्गिक वायू ही रिलायन्सची नसून देशाची संपत्ती असतानाही २९ पैकी २१ विहिरी ब्रिटिश पेट्रोलियमला विकण्याच्या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिली आहे. मनमोहन सिंग सरकार रिलायन्सचे दलाल म्हणून काम करीत आहे. केजी बेसिनचे रिलायन्सला दिलेले कंत्राट रद्द करून ते सरकारी कंपन्यांना देण्यात यावे, अशी मागणी केजरीवाल आणि त्यांचे सहकारी प्रशांत भूषण यांनी केली. कोळसा खाण वाटप घोटाळ्याच्या तोडीचा हा घोटाळा असून त्याचे अंकेक्षण कॅगकडून करण्यात यावे, अशीही मागणी केजरीवाल यांनी केली.    
गोंधळ व हाणामारी!  : केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेत एका ‘आम आदमी’ने त्यांच्यावर आरोप करीत सरकारी नोकरीत असताना त्यांची बदली का झाली नाही, असा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गोंधळ उडाला. त्याला काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी पाठविल्याचा आरोप करीत केजरीवाल यांच्या समर्थकांनी त्याला प्रश्न विचारू दिला नाही. आपण सामान्य व्यक्ती असून कुठल्याही राजकीय पक्षाशी आपला संबंध नाही, असे सांगण्याचा त्याने प्रयत्न केला. केजरीवाल यांनी त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, पण गोंधळ शमण्याऐवजी वाढतच गेला. ही संधी साधून पत्रकार परिषदेत शिरलेल्या काही लोकांनी ‘केजरीवाल हाय हाय’, अशा घोषणा देत जोडे व चपला भिरकाविल्या. त्यात केजरीवाल समर्थक व विरोधक यांच्यात जुंपली आणि वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे केजरीवाल यांच्याऐवजी गोंधळाकडे वळले. परिणामी केजरीवाल यांना पत्रकार परिषद गुंडाळून बाहेर पडावे लागले.

मोईलींचा प्रतिक्रियेस नकार : रिलायन्सच्या मागण्यांना भीक न घालणारे जयपाल रेड्डी यांच्याकडून मुकेश अंबानींच्या दबावाखाली पेट्रोलियम मंत्रालय काढून घेण्यात आले. आता नवे पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी रिलायन्सच्या १४.२५ डॉलरच्या प्रस्तावावर अनुकूल निर्णय घेऊ नये म्हणून त्यांना माहितीच्या अधिकाराखाली हैराण करून टाका, असे आवाहन केजरीवाल यांनी केले. मात्र वीरप्पा मोईली यांनी या आरोपांची दखल घेण्यास नकार दिला. केजरीवाल यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देण्यापेक्षा अनेक चांगली कामे करायची आहेत, असे मोईली म्हणाले.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो