विशेष लेख :कथानिर्मितीत रमलेले अध्यक्ष
मुखपृष्ठ >> विशेष लेख >> विशेष लेख :कथानिर्मितीत रमलेले अध्यक्ष
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विशेष लेख :कथानिर्मितीत रमलेले अध्यक्ष Bookmark and Share Print E-mail

 

डॉ. सुधीर रसाळ - शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२

८६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांचं मोठेपण नेमकं कशात आहे, याचा हा दोन पिढय़ांच्या प्रतिनिधींनी घेतलेला वेध..  संमेलनाध्यक्षांच्या अभिनंदनावर न थांबता त्यांच्याकडून कोणत्या अपेक्षा केल्या पाहिजेत, हेही सांगणारा..
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची निवड झाल्याने अध्यक्षपदाचा बहुमान मराठवाडय़ाला प्रथमच मिळत आहे. डॉ. गंगाधर पानतावणे यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत यश मिळाले नाही. ना. धों. महानोरांनी अध्यक्षपदाच्या उमेदवारीला नकार दिला.

रा. रं. बोराडे हेही प्रतिभावंत साहित्यिक. पण ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाहीत. नरहर कुरुंदकर अकालीच गेले. त्यांच्या वाटय़ाला हा बहुमान मिळू शकला नाही. डॉ. कोत्तापल्ले यांच्या निवडीमुळे मराठवाडय़ातील लेखक, कवींचे खाते उघडले गेले आहे. डॉ. कोत्तापल्ले यांचे वाङ्मयीन कार्य दुहेरी स्वरूपाचे. ते मराठी भाषा आणि वाङ्मयाचे नामवंत प्राध्यापक आणि अभ्यासक. विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांनी मराठवाडा आणि पुणे येथे लौकिक मिळविला. आर्थिक परिस्थिती अनुकूल नसतानाही ते देगलूर येथून औरंगाबाद येथे एमएची पदवी मिळविण्यासाठी आले. मराठवाडा साहित्य परिषदेमध्ये अल्पवेळ नोकरी करून त्यांनी एमए.मध्ये प्रथम श्रेणी मिळविली. बीडच्या महाविद्यालयात व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले. पुणे विद्यापीठात ते मराठी विभागप्रमुख म्हणून रुजू झाले. त्यांचे सर्व आयुष्यच मराठी वाङ्मयाशी निगडित आहे.
अध्यापनाबरोबरच त्यांनी दर्जेदार वाङ्मयनिर्मिती केली. मराठी वाङ्मयात दीर्घकथा हा प्रकार काहीसा उपेक्षित होता. डॉ. कोत्तापल्ले यांच्या लेखनातून बऱ्याच प्रमाणात तो समृद्ध झाला. खरेतर डॉ. कोत्तापल्ले हे कवी मनाचे. त्यांचा पहिला कवितासंग्रह दर्जेदार होता. पण नंतर मात्र ते कथावाङ्मय लिखाणाकडे वळले आणि त्यात रमले. ‘मूड्स’ या कवितासंग्रहानंतर त्यांचा आणखी एक कवितासंग्रह प्रकाशित झाला. पण त्यानंतर ‘राजधानी’, ‘देवाचे डोळे’, ‘गांधारीचे डोळे’ ही कादंबरी, ‘काळोखाचे पडघम’ ही पुस्तके गाजली. त्यांचे लिखाणही विपुल आहे. कथांमध्ये पददलित आणि ग्रामीण जनतेचे दु:ख त्यांनी मांडले आहे. सर्वसामान्य माणसाचे जीवन बदलण्याची प्रेरणा व्हावी, असा सुप्त हेतू त्यांच्या लेखनामागे असतो. ग्रामीण लेखनाच्या चळवळीचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये त्यांची कथा आहे. सामाजिक बांधीलकी आणि पुरोगामी विचारांची प्रेरणा त्यांच्या कथांमध्ये दिसून येते.   
 डॉ. कोत्तापल्ले यांच्या सार्वजनिक जीवनात वाङ्मयीन संस्थांमधील कार्य मौलिक आहे. मराठवाडा साहित्य परिषदेत ते चिटणीस आणि अध्यक्ष होते. ‘प्रतिष्ठान’चे मुख्य संपादक म्हणून त्यांनी दीर्घकाळ कार्य केले. महामंडळाचे ते काही वर्षे कोषाध्यक्षही होते. पुणे येथे गेल्यानंतर तेथे साहित्य परिषदेच्या कार्यात त्यांनी सहभाग नोंदविला. वाङ्मयीन कार्याबरोबर त्यांनी विद्यार्थी जगतात मौलिक कार्य केले. वाङ्मयात आणि सामाजिक जीवनात डावी विचारसरणी मानणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या निवडीमुळे मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर काही वेगळय़ा प्रकारचे वाङ्मयीन विचार प्रकट होतील, अशी अपेक्षा आहे. राज्य शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे ते अध्यक्ष आहेत. मराठी भाषेच्या विकासासंबंधी त्यांच्या मनातही काही कल्पना असतील. त्या त्यांनी संमेलनाच्या व्यासपीठावरून प्रकट कराव्यात, अशी अपेक्षा आहे. वास्तविक बी. रघुनाथानंतर मराठवाडय़ातील ग्रामीण उपेक्षित समाजाच्या जीवनाचे प्रत्ययकारी चित्रण डॉ. कोत्तापल्ले यांच्या कथावाङ्मयात झालेले आहे. ते ज्या प्रकारची कथा लिहितात, ती कथा मराठीत इतरत्र लिहिली गेली नाही.
खरेतर मराठी साहित्य संमेलनाच्या परंपरेप्रमाणे अध्यक्ष हा केवळ संमेलनापुरता उत्सवमूर्ती असतो. नंतरचा संमेलनाध्यक्ष निवडून येईपर्यंत तो केवळ पदसिद्ध सदस्य असतो. महामंडळाच्या कार्यामध्ये संमेलनाध्यक्षांनी नेतृत्व करावे, अशी अपेक्षा नसते. याचा परिणाम असा होतो, की संमेलनाचे अध्यक्षीय भाषण दिशादर्शक असावे अशी अपेक्षा केली जाते. हे भाषण मौलिक आणि मराठी भाषेला काहीएक दिशा देणारे असावे, अशी अपेक्षा असते. डॉ. कोत्तापल्ले यांचे भाषण असेच असेल. डॉ. कोत्तापल्ले यांनी या निवडणुकीची सर्व प्रतिष्ठित पथ्ये पाळली. इतर उमेदवारांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आरोप करणे, निवडणुकीचे डावपेच करणे, गटबाजीचे राजकारण करणे, या सर्वातून ते अलिप्त राहिले. त्यांच्या या वर्तनामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा दर्जा निश्चितपणे उंचावला आहे.
वास्तविक मराठी आणि इतर भाषांचा संबंध अधिक दृढ होणे आवश्यक आहे. दुर्दैवाने मराठी रसिकाला पाश्चात्त्य भाषेतील लेखकांची नावे माहिती असली तरी असामिया, मल्याळम अशा भाषेतील महत्त्वाचे लेखक कोण, याची माहिती नसते. साहित्य संमेलनामध्ये इतर भाषक लेखकांच्या वाङ्मयांची देवाणघेवाण घडवून आणली पाहिजे. त्यासाठी अनुवादकांना जास्तीत जास्त महत्त्वही दिले पाहिजे. इतर भाषेतील अनुवादामुळे वाचकाच्या अभिरुची आणि लेखकाच्या लेखनालाही नवी दिशा मिळते. साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट यांनी केलेले प्रयोग अभिनंदनीय असले तरी ते पुरेसे नाहीत. हे कार्य विद्यापीठीय आणि साहित्य संस्कृती संस्थांमार्फत होत राहिले पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता साधण्याचा हा सर्वात उत्तम मार्ग आहे. पण दुर्दैवाने साहित्याशी निगडित असणारे याकडे लक्ष देत नाहीत. डॉ. कोत्तापल्ले यांचा प्रशासकीय अनुभव मोठा असून ते भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांनी या उपेक्षित कार्याला गती मिळवून द्यावी, अशी अपेक्षा आहे. करता येण्यासारखे पुष्कळ आहे. तंत्रज्ञानाच्या अंगानेही मराठी पुढे सरकायला हवी. एखाद्या विद्यार्थ्यांने उत्तम अनुवाद केला तर त्याला ‘पीएच.डी.’सारखी पदवी द्यायला काय हरकत आहे? विद्यापीठ स्तरावर आपल्याकडे परदेशी भाषा शिकविल्या जातात. पण देशांतर्गत भाषांचे विभाग सुरू करणे आवश्यक आहे. अंतर्गत सांस्कृतिक विकासाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मराठीच्या अशा विकासासाठी त्यांचे अध्यक्षपद नक्कीच दिशादर्शक ठरेल.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो