अग्रलेख : नवनैतिकवादाची नशा
मुखपृष्ठ >> अग्रलेख >> अग्रलेख : नवनैतिकवादाची नशा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अग्रलेख : नवनैतिकवादाची नशा Bookmark and Share Print E-mail

शुक्रवार, २ नोव्हेंबर २०१२
भारतास सध्या नवनैतिकवादाने ग्रासलेले असून त्याचा विळखा अधिकच प्रखर होईल अशी लक्षणे आहेत. नवनैतिकवादाचे प्राथमिक लक्षण म्हणजे याने ग्रासलेली व्यक्ती तिचे विहित कार्य करीत नाही आणि निवृत्ती घेऊन वा अन्य कारणाने त्या कार्यातून मुक्त होऊन समाजातील इतर घटकांना कर्तव्याचे धडे देऊ लागते. या व्याधिग्रस्तांच्या यादीतील विद्यमान भर म्हणजे अरविंद केजरीवाल. आपल्या आरोप मालिकेत त्यांनी काल दुनिया मुठ्ठी में घेऊ पाहणाऱ्या रिलायन्स उद्योगसमूहाने काँग्रेस पक्षास खिशात घातल्याचा आरोप केला.

या उद्योगसमूहास दुनिया कितपत मुठ्ठीत घेता आली हा प्रश्न असू शकेल. कारण जेथे नियामक व्यवस्था चोख आहेत तेथील दुनिया मुठ्ठी में घ्यायचा प्रयत्न या समूहाने क्वचितच केला असेल. परंतु भारतीय व्यवस्था त्यांच्या मुठ्ठी में जाण्यापासून किती वाचली याविषयी शंका घेण्यास बराच वाव आहे. तेव्हा या कंपनीविषयी आरोप करताना ही माहिती आपण जणू काही नव्यानेच शोधून काढल्याचा आव केजरीवाल यांनी आणला. वस्तुत: औद्योगिक आणि आर्थिक विषयांवर नजर ठेवून असणाऱ्या अनेकांनी अशा उद्योगसमूहांच्या उद्योगांबाबत अनेकदा लिहिले आहे वा जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा केजरीवाल यांनी जी काही नाटय़पूर्ण कागदपत्रे सादर केली, त्यांवर आधारित तपशीलवार वृत्तांत अनेक जागरूक पत्रकारांनी आतापर्यंत अनेकदा लिहिले आहेत. परंतु आपल्याकडे आर्थिक साक्षरता ही महागाई आणि भ्रष्टाचाराचे आरोप यापुरतीच सीमित असल्याने या प्रकरणांचा गंध अनेकांना नव्हता. तो केजरीवाल यांच्यामुळे अनेकांना आला. ते एका अर्थाने बरेच झाले. कोणाहीमुळे का असेना काही काळापुरता तरी अज्ञानाचा अंधार दूर होणार असेल तर त्याचे स्वागतच करावयास हवे. परंतु केजरीवाल यांना नवनैतिकवादाची व्याधी जडली नसती तर बुधवारी जो काही ज्ञानप्रकाश त्यांनी दाखवला तो त्यांना कित्येक वर्षांपूर्वीच झाला असता. याचे कारण असे की, केजरीवाल हे भारतीय महसूल सेवेत उच्च पदावर कार्यरत होते. पुढे ते आयकर खात्यातही गेले. देशाच्या महसुलाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे कार्यालय. या कार्यालयात वरिष्ठ पदावर असणारे देशाचे अनेक मार्गानी भले करू शकतात. कुबेरालाही लाजवेल अशी श्रीमंती, परंतु आयकर मात्र भरायची गरज नाही अशी नियमांची चतुर व्यवस्था आयकर खात्याने धनाढय़ांच्या सोयीसाठी केलेली आहे. पगारदारांच्या मुंडय़ा आयकरासाठी आवळायच्या आणि धनाढय़ांना मोकाट सोडायचे ही आपली उज्ज्वल परंपरा आहे. त्यामुळे पत्नीच्या वाढदिवसास विमानाची भेट देऊ शकणाऱ्यांचा आयकर हा मध्यमवर्गीय नोकरदारापेक्षाही कमी असतो आणि त्या विमानासाठी जकात भरायचीही त्यांची तयारी नसते. अशा मंडळींना आपल्या व्यवस्थेत काही होत नाही, हा अनेकांचा अनुभव आहे. वास्तविक त्यांच्याकडून चोख आयकर आदी कर वसुली झाली तर त्याचा विनियोग अनेक चांगल्या कामांसाठी करता येऊ शकेल. ती संधी केजरीवाल यांना सेवेत असताना होती. परंतु त्यांनी सरकारी सेवेचा राजीनामा न देता भलतेच उद्योग सुरू केले आणि त्यासाठी अखेर सरकारला नुकसानभरपाई मागण्याचा दणका त्यांना द्यावा लागला. तेव्हा मुद्दा हा की, सेवेत असताना केजरीवाल यांनी किती करबुडव्यांकडून किती कर वसूल केला? वा देशाचा महसूल वाढावा म्हणून काय प्रयत्न केले, याची उत्तरे त्यांनी द्यायला हवीत.
गेल्या काही दिवसांत या नवनैतिकवादाची लागण झालेल्यांनी उच्छाद मांडलेला आहे. अण्णा हजारे यांच्या आसपास अशांचा मोठा गोतावळा जमलेला आहे. त्यात अनेक आजीमाजी अधिकारी, लष्करप्रमुख, इतकेच काय पत्रकारही आहेत. सेवेत असताना या पत्रकार- संपादकांनी सिनेमा-नाटके लिहिली, पदाची दहशत दाखवत अनेकांच्या गळ्यात ती मारली, तेजस्वी परंपरेचा उपयोग परदेशवाऱ्यांची खोटी बिले भरण्यासाठी केला आणि वर सेवेतून मुक्त झाल्यानंतर हेच समाजास उपदेशामृत पाजण्यास मोकळे. त्यातही परत यांची पुणेरी कातडीबचावगिरी अशी की, अण्णांसाठी ही मंडळी स्वत: भूमिका घेणार नाहीत. परंतु इंटरनेटच्या माहिती महाजालात अदृश्य राहून अण्णांच्या खांद्यावरून नेमबाजी करणार. माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग हेही अशांतलेच. लष्करप्रमुख या सर्वोच्च पदावर राहूनही यांनी उद्योग काय केला? तर स्वत:च्या वयासाठी भांडण्याचा. हा यांचा शूरपणा. ज्या महालेखापालांच्या अहवालांवरून हे सिंग महाशय निवृत्तीनंतर सरकारवर बेफाम आरोप करीत सुटले आहेत, त्याच महालेखापालांच्या अहवालात सिंग यांनी लष्कर साहित्याची अनावश्यक खरेदी कशी केली याबद्दल ठपका ठेवण्यात आला आहे. त्या मुद्दय़ास सिंग हे सोयीस्कररीत्या बगल देत आहेत. निवृत्तीनंतर हे सिंग सरकारी घरात राहणार, याच व्यवस्थेकडून सुरक्षा यंत्रणा स्वीकारणार, देशभर हिंडण्याचा मोबदला सरकारकडून वसूल करणार आणि तरीही दुगाण्या झाडण्यास हेच लष्करप्रमुख तयार. वय चोरूनही सिंग यांना हवी होती तशी मुदतवाढ मिळाली असती तर व्यवस्था बदलण्याच्या गमजा त्यांनी मारल्या असत्या का, हा प्रश्न आहे आणि तो किरण बेदी यांनाही विचारता येऊ शकेल. सरकारी सेवेत असताना बेदी त्यांच्या पदोन्नतीबाबत नाराज होत्या आणि काही विशिष्ट ठिकाणचे पोलीस प्रमुखपद मिळण्याबाबत त्या आग्रही होत्या. सरकारच्या मनात अन्य विचार होता. एरवी घटनेच्या नावाने कर्तव्याचे उमाळे या मंडळींना येत असतात. परंतु स्वत:वर कथित अन्याय झाल्यास त्यांना त्या घटनेचा विसर पडतो. कोणत्या कर्मचाऱ्यास कोठे नेमावे हा व्यवस्थापनाचा अधिकार आहे. तो बेदीबाईंच्या मनासारखा वापरला गेला नाही म्हणून बाई संतापल्या आणि त्यांनीही व्यवस्था बदलण्याची भाषा सुरू केली. पुढे ही व्यवस्था अण्णांच्या मार्गाने बदलायची की केजरीवालांच्या मार्गाने याचा गोंधळ उडाल्याने त्यांनी आहे त्याच व्यवस्थेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यात आपले हित आहे, हे मान्य केले आणि कामाला लागल्या. परंतु त्यांच्याही बाबतीत मुद्दा तोच. सेवेत असताना त्या ज्या उत्तम कार्यासाठी ओळखल्या जात होत्या ते सोडून नवनैतिकवादाचा झेंडा हाती घेऊन त्यांनी देशाचे काय भले केले? महाराष्ट्रात ही परंपरा अविनाश धर्माधिकारी यांनी सुरू केली. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक असताना सरकारला महिला धोरणच नाही याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करण्याचा शहाजोगपणा त्यांनी केला. त्यावर मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी त्यांना त्याच खात्यात पाठवले. तेव्हा नाराज होऊन धर्माधिकारी सेवेतून बाहेर पडले आणि प्रशासकीय सेवेच्या शिकवण्या घेण्याचे स्वत:चे धर्मपीठ तयार केले. त्याआधी भाजप ते शिवसेना या टप्प्यांत राजकीय पुनर्वसन होते का याची चाचपणी त्यांनी केलीच होती. ते जमले नाही. आता स्वत:स जे जमले नाही ते इतरांनी कसे करावे याचे शिक्षण ते देतात.
ज्या समाजाची वैचारिक समज भाबडी आहे, त्या समाजात अशा बोलक्या राघूंची काही काळ चलती असते. परंतु या मंडळींच्या बोलघेवडेपणातून व्यवस्था बदलत नाही. त्यासाठी तेथे राहूनच काम करावे लागते आणि प्रत्येकाने आपले नियत काम प्रामाणिकपणे, राजकीय पदाची अभिलाषा न बाळगता केले तर आहे ती व्यवस्था बदलण्याची गरजही लागणार नाही, इतकी ती उत्तम काम करेल. तेव्हा ही नवनैतिकवादाची नशा आपल्या समाजाच्या मानगुटीवरून लवकरात लवकर उतरवण्याची गरज आहे. हे विचारांचे काम आहे. त्यावर भावनिक  प्रतिक्रिया देऊन चालणार नाही.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो