फुल टू कल्ला
मुखपृष्ठ >> लेख >> फुल टू कल्ला
 

व्हिवा

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

फुल टू कल्ला Bookmark and Share Print E-mail

alt

प्रियांका पावसकर , शुक्रवार , २ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कॉलेजिअन्स परीक्षा संपताच कॅलेंडरमध्ये दिवाळीच्या रजेचे दिवस मोजायला, दिवाळीच्या सुट्टीतले बेत आखायला लागलेत. कंदील करण्यासाठी रात्रभर जागरण करायचं. फराळावर यथेच्छ ताव मारून पुन्हा एकदा लहान होऊन मनसोक्तपणे दिवाळी साजरी करायचीये. अशा अनेकविध गप्पांनी सध्या कॉलेज कॅम्पस गजबजू लागलाय.. अशा या दिवाळीप्रेमी कॉलेजिअन्ससाठी दिवाळी सुट्टी म्हणजे फुल टू कल्ला करायचा आणि बरंच काही...
दिवाळी सणाची आतुरतेने वाट पाहणारे कॉलेजिअन्स परीक्षा संपताच कॅलेंडरमध्ये दिवाळीच्या रजेचे दिवस मोजायला, दिवाळीच्या सुट्टीतले बेत आखायला लागलेत. कंदील करण्यासाठी रात्रभर जागरण करायचं. नवनवीन ड्रेसेससाठी आईकडे हट्ट धरायचाय.

फराळावर यथेच्छ ताव मारून पुन्हा एकदा लहान होऊन मनसोक्तपणे दिवाळी साजरी करायचीये. अशा अनेकविध गप्पांनी सध्या कॉलेज कॅम्पस गजबजू लागलाय.. अशा या दिवाळीप्रेमी कॉलेजिअन्ससाठी दिवाळी सुट्टी म्हणजे फुल टू कल्ला करायचा आणि बरंच काही..
दिवाळी म्हटलं की घराघरात उत्साह,आनंद आणि जोश! आकाशकंदील, रांगोळ्या, दिवे, फटाके, दिवाळीचा फराळ, नवीन कपडे, शुभेच्छा पत्र, फोन, एसएमएस, ई-मेल्स, हल्लागुल्ला! म्हणूनच दिवाळीला सणांचा राजा म्हणतात. कोणत्याही सणांना इतके महत्त्व असत नाही जितके की आपण या दिव्यांच्या सणाला देतो.अगदी धनत्रयोदशी, वसूबारसपासून ते भाऊबीजेपर्यंत मस्त चार-पाच दिवस चालणाऱ्या या सणादरम्यान कॉलेजिअन्सच्या परीक्षा संपल्याने त्यांच्यातील उत्साह नुसता सळसळत असतो, त्यामुळे दिवाळी म्हंटलं की या कॉलेजिअन्सच्या डोळ्यांसमोर सगळ्यात प्रथम येतं ते म्हणजे दिवाळीसाठी करावयाचं प्लॅिनग. परीक्षेचा शेवटचा पेपर अगदी टाकल्यासारखा लिहिला जाऊन कधी एकदा परीक्षा संपते आणि दिवाळीची सुट्टी जाहीर होते असं या मुलांना झालेलं असतं. त्यांच्यासाठी दिवाळी सुट्टी म्हणजे फुल टू कल्ला करायचा. रात्री उशिरा झोपूनही दिवाळीच्या दिवशी मात्र आईच्या एका हाकेने जागं व्हायचं केवळ पहिल्या आंघोळीनंतर चिराट फोडण्याची मजा लुटायला तसेच अंगाला येणाऱ्या सुगंधी उटण्याचा वास घ्यायला आणि मग नवीन कपडे घालून सज्ज व्हायचं दिवाळी साजरी करायला. घरोघरी जाऊन फराळावर यथेच्छ ताव मारायचा. बहिणीने काढलेली रांगोळी विस्कटायची आणि भावंडांबरोबर दंगा करून घर डोक्यावर घ्यायचं. फुटलेल्या फटाक्यांच्या कचऱ्यात न फुटलेले फटाके शोधायला जायचं आणि लहानग्यांसारखं खटय़ाळ दिवाळी सेलिब्रेशन करायचं. आज्जी-आजोबांसाठी, मित्रपरिवारासाठी हाताने भेटकार्ड बनवायचं, धाकटय़ा भावा-बहिणीची दिवाळी गृहपाल्लाची वही सजवायची तर त्यांच्या हस्तकलेसाठी मिठाईचे बॉक्सही जमवायचे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गड किल्ले बांधण्याची धमाल अनुभवून दिवाळी साजरी करायची. किल्ला करायचा. या किल्ला  प्रकारामुळे या तरुणांच्या क्रिएटिव्हिटीला चालना मिळतेच पण ऑफिशियली चिखलात खेळायला मिळतं ती गोष्ट वेगळी. मामाला फटाक्यांसाठी मस्का लावायचा. फटके मिळाल्यावर एवढेसेच फटाके! म्हणून अन्नत्याग करायचा आणि मग हट्टापायी आणिक जास्त फटाके मिळाल्यावर रुसवा फुगवा सोडून प्रदूषणाची तमा न बाळगता भरपूर फटाके फोडायचे. लवंगीची माळ सुटी करून वाजवायची. नरक चतुर्दशीला सकाळी पहिला फटाका कोण लावणार त्याची स्पर्धा लावायची, फोडलेल्या फटाक्यांच्या कागदाचा धूर करायचा आणि दिवाळीचा मनसोक्त आनंद लुटायचा. फटाक्याच्या बॉक्सवरील रंगीत स्टिकर्स जमवून लहानग्यांमध्ये वाटून टाकायचे आणि मग हे सगळं करता करता दिवाळीची सुट्टी संपली म्हणून आईपुढे खट्ट व्हायचं आणि दुसऱ्या दिवशीच मित्र-मत्रीणींना दिवाळीची धमाल रंगवून सांगण्यासाठी कॉलेज कट्टय़ावर सगळ्यात आधी हजर व्हायचं आणि साऱ्यांनी मिळून म्हणायचं ‘दिन.दिन.दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी.’
दिवाळीच्या दिवसांत जसा फराळ खाण्याचा उत्साह मावळत नाही त्याचप्रमाणे शॉिपगचा उत्साहही मावळूच शकत नाही. दिवाळी ही शॉिपगपासून हॉलीडे-आऊटिंगपर्यंतच्या अनेक गोष्टींसाठी हक्काचं निमित्त. त्यामुळे कॉलेजिअन्सच्या दिवाळी प्लॅिनगमध्ये शॉिपग फंडा हा विशेष भाग असतो. सध्याच्या तरुणाईचा जुन्या-नव्याची सरमिसळ असलेल्या पेहरावाला पसंती देण्यास अधिक कल आहे. म्हणजे बघा हं, एकीकडे पब आणि डिस्कोमध्ये इवले इवले कपडे घालून जाणाऱ्या जनरेशनला दिवाळीच्या वेळी मात्र पक्के ट्रॅडिशनल कपडे हवे असतात. शरारा, साडी आणि चक्क नऊवारीसुद्धा. म्हणजेच शॉिपग प्लॅन करताना एकीकडे नव्याची ओढ असतानाच आपल्या सणांमध्ये जुनं टिकवून ठेवण्याची तरुणाईची धडपड चालू आहे. सातासमुद्रापलीकडे असलेल्या भावंडांना दिवाळीच्या भाऊबीज या एका दिवसासाठी घरी येणं शक्य नसतं म्हणून ऑनलाइन दिवाळी साजरी करण्यासाठी कॉलेजिअन्स नवनवीन ऑनलाइन पर्यायांचा आधार घेऊन आधुनिक पद्धतीने दिवाळी साजरी करणारेत. नटूनथटून आपापल्या संगणकासमोर बसून चॅटिंग किंवा स्काइपवरून थेट गप्पा मारून भाऊ-बहीण दिवाळी साजरी करतील. एकमेकांच्या घरी जाऊन अनेकदा शुभेच्छा देण्यासाठी सवड मिळत नसल्यामुळे कॉलेजिअन्स शुभेच्छांसाठी ट्विटिंगचा पर्याय अवलंबणार आहेत. शे-दोनशे एसएमएस करण्यापेक्षा सोशल नेटवìकग साइटवर मेसेज टाकणं किंवा ट्विटिंग करणं या कॉलेजिअन्सना सहज आणि सोपं, शिवाय ट्रेंडीही वाटतं आणि शुभेच्छापत्रांचा खर्च वाचल्यामुळे दिवाळीही तशी बजेटमध्ये होते. मुळातच ना, आजची तरुणाई उत्साही आहे. त्यांना आनंद समुदायानं व्यक्त करायला आवडतं. म्हणूनच दिवाळीच्या पहिल्या दिवशी किंवा सवडीनुसार घरी किंवा हॉटेलमध्ये पाटर्य़ा करण्याकडे तरुणांचा कल अधिक दिसून येतोय. अशा वेळी भेटीगाठीदरम्यान खास तिखट आणि गोड पदार्थाचे मेन्यू मुलांकडून आधीच ठरवले जाताएत. उच्चभ्रू समाजात असणारा हा ट्रेण्ड कॉलेजिअन्सच्या निमित्ताने का होईना गेल्या काही वर्षांपासून मध्यमवगीर्यामध्येही रुळू लागलाय. दिवाळीच्या दिवसांत हॉटेल्समधील गर्दी भुकेची परीक्षा घेण्यासारखीच असते. टेबल मिळवण्यासाठी हॉटेलबाहेर लागलेल्या रांगा या काळात अधिक दिसतात. म्हणूनच या कॉलेजिअन्सनी यंदा मात्र आपल्या कुटुंबीयांसाठी टेबल आठवडाभर आधीच बुक करून ठेवलं आहे. एवढंच नाही तर फॅमिली गेट-टुगेदरला डिक्टो पार्टीचा लुक येण्यासाठी या तरुणांनी कुटुंबीयांसाठी काही खास ड्रेसकोडही ठेवले आहेत. पणत्या, कंदील आणि झगमगत्या तोरणांचं प्रकाशमय डेकोरेशन या पार्टीची रंगत आणखी वाढवेलच, शिवाय बॅकग्राऊंडला वाजणाऱ्या गाण्यांमुळे डान्सचा माहौलही तयार झालेला असेल. सोबत डिलिशस मेन्यू फुल्ल टू पार्टी मूड बनवेल यात तिळमात्र शंका नाही. काही कॉलेजिअन्स या काळात पिकनिकही प्लॅन करत आहेत. फॅमिली किंवा फ्रेण्ड्सबरोबर एखाद-दोन दिवस फिरून येऊन दिवाळी सेलिब्रेशनचा एक रीफ्रेिशग आनंद काहीजण लुटणार आहेत. कारण काही दिवाळीप्रेमी तरुणांच्या मते सेलिब्रेशन कशाही प्रकारे असलं तरी सगळ्यांना भेटणं या निमित्ताने शक्य होतं. घटका दोन घटका रिलीफ मिळवत पुन्हा नव्या दम्याने सुरुवात करायला मग सगळेच तयार होत असतात.
कॉलेज कट्टय़ावर दिवाळी सेलिब्रेशनच्या गप्पा, प्लॅिनग दिवाळी येईपर्यंत असंच सुरू राहील. पण तोवर दिवाळीसाठी वातावरण निर्मिती झालेली प्रत्येकालाच आढळेल. पिठाच्या गिरण्या डाळीच्या, चकलीच्या भाजण्यांनी गच्च भरून गेलेल्या दिसतील. रस्त्यातून जाताना चकलीच्या खमंग वासाची झुळूक येत असेल. बििल्डगमध्ये कुठूनतरी बेसनाच्या लाडूंचा वास हजेरी लाऊ
लागेल. चकली, शेवया पाडण्याचे यंत्र शेअिरग बेसिसवर आजूबाजूच्या घरांत फिरू लागले असेल. रस्त्यात, दुकानांत रंगीबेरंगी आकाशकंदील,फटाक्यांचे स्टोल दिसू लागले असतील. खरोखरच या दिवाळीप्रेमी कॉलेजिअन्ससाठी दिवाळी म्हणजे थोडक्यात ती संपताक्षणी परत कधी येणार अशी वाट बघायला लावणारा सण. नवीन वर्षांचं कॅलेंडर घरात आल रे आलं की पहिल्यांदा पाहिलं जातं दिवाळी कधी आहे, किती दिवस आहे. ज्यावर्षी अगदी पाच दिवस दिवाळी असेल त्या दिवशी एकदम भारी वाटतं की यंदा खूप दिवस दिवाळी अनुभवायला मिळणार. पण एक आहे, दिवाळीच्या शेवटच्या दिवसाची संध्याकाळ कधीच येऊ नये हे प्रत्येकालाच वाटतं. कारण त्या संध्याकाळी फराळाचे संपत आलेले डबे, फुसके म्हणून उरलेले फटाके, खिडकीतून काढून ठेवलेला आकाशकंदील, शाळा, कॉलेज, ऑफिस चालू व्हायची तारीख असं सगळं नको नको ते चित्र डोळ्यांसमोर दिसू लागतं. पण असो, अजूनतरी त्या दिवसाला पुष्कळ वेळ आहे नाही का! तोपर्यंत आपण सारे जण कॉलेजिअन्सनी प्लॅन केलेली भन्नाट दिवाळी साजरी करून ‘फुल टू कल्ला’ करू या...

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो