आर्मस्ट्राँग पर्वाचा अखेर!
मुखपृष्ठ >> क्रीडा >> आर्मस्ट्राँग पर्वाचा अखेर!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

आर्मस्ट्राँग पर्वाचा अखेर! Bookmark and Share Print E-mail

पराग फाटक - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

टूर डी फ्रान्स हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यासमोर लान्स आर्मस्ट्राँग उभा राहतो. यलो जर्सी परिधान केलेला, डोळ्यावर स्पोर्ट्स गॉगल चढवलेला, आपल्या लाडक्या सायकलवर बसून विजयाचा कैफ व्हिक्टरीने दर्शवणारा आर्मस्ट्राँग आपल्या अजूनही स्मरणात आहे. टूर डी फ्रान्स स्पर्धा आर्मस्ट्राँगच्या आधी आणि नंतरही अनेकांनी जिंकली. पण त्या सगळ्यांना आर्मस्ट्राँगसारखा महिमा निर्माण करता आला नाही. या स्पर्धेने आर्मस्ट्राँगला सारं काही दिलं.. नाव, प्रतिष्ठा, पैसा, प्रसिद्धी, लाखो चाहत्यांच्या  शुभेच्छा आणि बरंच काही.. अंडपेशींच्या कर्करोगाने आर्मस्ट्राँगला आपल्या विळख्यात अडकवले होते. मृत्यू आसपास दबा धरून बसलेला. अशा परिस्थितीतून माणूस जगेल याचीच शंका पण आधुनिक उपचारांच्या मदतीने आर्मस्ट्राँग बाहेर आला तोच आयुष्याशी लढण्याच्या ईष्र्येने.. रुग्णालयातल्या खाटेवरून त्याने आल्प्स पर्वतरांगात सायकल चालवण्याचे स्वप्न बघितले होते आणि हे स्वप्न त्याने प्रत्यक्षात आणले. टूर डी फ्रान्सच्या प्रत्येक जेतेपदाबरोबर आर्मस्ट्राँगचे आख्यायिकेत रुपांतर झाले. कर्करोगाने त्याच्यापासून सारी सुखं हिरावून घेतली होती पण आर्मस्ट्राँगने टूर डी फ्रान्सच्या माध्यमातून त्या साऱ्यावर कब्जा केला.
कालचक्राचा फेरा पुढे सरकला .. आर्मस्ट्राँगला मागे नेण्यासाठी .. आर्मस्ट्राँगच्या महिम्याभोवतीचा पडदा सरला.. जेतेपदासाठी खेळभावनेला दिलेली तिलांजली ..नैसर्गिक शक्तीला कृत्रिम औषधांची दिलेली जोड.. ‘विजयासाठी वाट्टेल ते’ या मनोवृत्तीचा केलेला शिस्तबद्ध प्रचार, खोटं लपवण्यासाठी केलेले आटोकाट प्रयत्न. भुसभुसीत पायावर निर्माण केलेले साम्राज्य उधळू नये यासाठी कधीकाळचे सहकारी, मित्र, संस्था यांना दिलेले आव्हान..
दूरवर गाज घालणारी समुद्राची लाट यावी आणि तिने किनारा नितळ करून जावे अशी पद्धतीने सारं घडलं.. उसाडा अर्थात अमेरिकन उत्तेजक विरोधी संघटनेने आर्मस्ट्राँगचा बुरखा फाडला.. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, प्रत्येक गोष्ट ‘वेगळेपणाने’ करतात.. आर्मस्ट्राँगने नेमकं हेच केले.. पण दुर्देवाने या ‘वेगळेपणाने’ क्रीडा क्षेत्रातलं सगळ्यात कलंकित प्रकरण समोर आणलं.  आर्मस्ट्राँग पडझडीचे अनेक कंगोरे आहेत.. खेळभावना, उत्तेजकं, पैसा, विज्ञान, प्रायोजक, श्रद्धा या सगळ्याला ढवळून काढणाऱ्या प्रकरणाचा घेतलेला परामर्श.
असंख्य प्रतिज्ञापत्रं आणि अनेक किचकट शास्त्रीय चाचण्यांद्वारे आर्मस्ट्राँगने मिळवलेली जेतेपदे केवळ नैसर्गिक क्षमतेच्या जोरावर कमावलेली नसल्याचे स्पष्ट झाले.
संशोधन, शोध यानुसार औषधविज्ञान क्षेत्रात अमूलाग्र क्रांती होत आहे. स्पोर्ट्स मेडिसीन अशा स्वतंत्र शाखेचा विस्तार झाला. पण विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे या निबंधात लिहिले जाणाऱ्या वाक्याचा आर्मस्ट्राँगच्या निमित्ताने प्रत्यय आला.
जिंकण्यासाठी वाट्टेल ते करण्यासाठी संघाचे डॉक्टर तयार होतात. इंजेक्शनच्या सीरिंजचा खांद्यावरला डाग चाचणीत अडचण निर्माण करू शकतो हे लक्षात आल्यावर मेकअपद्वारे तो डाग पुसण्याची किमया करणारी मसाजर हे सारेच आधुनिक विज्ञानाचा स्वार्थासाठी अयोग्य वापर करणारे दूत आहेत. स्वत: ची नसर्गिक ताकद वाढवण्यापेक्षा औषधं, इंजेक्शनं, बाहेरचं रक्त या कृत्रिम साधनांच्या साह्याने शक्ती वाढवून जेतेपदावर कब्जा करणात आर्मस्ट्राँग आणि मंडळींना काही वावगू वाटू नये यातच सारं काही आलं.
आर्मस्ट्राँगच्या अविश्वसनीय यशाने त्याच्याकडे संशयाची सुई वळली होती. यामुळेच उसाडाने चिकाटीने हे प्रकरण मार्गी लावलं. पण सायकलिंगला नेहमीच उत्तेजकांचा अभिशाप आहे. आर्मस्ट्राँगप्रमाणेच अन्य सायकलपटूंनीही विजयासाठी हाच मार्ग पत्करला असेल. कोण जाणे.. तत्कालिन तंत्रज्ञानाला हा अनिष्ट वापर लक्षात आला नसेल, आता येऊ शकतो.. पण प्रश्न हाच आहे की किती मागे जायचं आणि सत्य खणायचं हे कोण ठरवणार. आर्मस्ट्राँगवरच्या आजीवन बंदी आणि टूर डी फ्रान्सची सात जेतेपदे काढून घेतल्यामुळे कोणाला तरी बढती मिळणार आहे. पण त्या सायकलपटूने मिळवलेला विजय उत्तेजकविरहित असेल याची हमी कोण घेणार.. विज्ञानाने हा एक कठीण पेच आपल्यासमोर मांडला आहे.
आपण सगळेच समस्या, प्रश्न यांनी गांजलेले असतो. देव ही आपल्यासाठी गाऱ्हाणे मांडण्याची जागा पण प्रेरणेसाठी आपण मर्त्य माणसांकडेच वळतो. आर्मस्ट्राँग अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरलेला. कर्करोगाशी लढा कसा द्यावा, परिस्थितीला शरण जाण्याऐवजी सतत संघर्ष करण्याचा धडा आर्मस्ट्राँगने जगभरातल्या चाहत्यांना दिला. पण या धडय़ामागचा अन्वयार्थ सुखावणारा नव्हता. आपल्या आयुष्यासाठी, प्रेरणेसाठी, अविरत ऊर्जेसाठी आर्मस्ट्राँगकडे बघणाऱ्या प्रत्येकाचा त्याने विश्वासघात केला आहे. जिंकायचं आहे ना मग कुठल्याही पातळीला जाण्याची तयारी ठेवा हा चुकीचा संदेश आर्मस्ट्राँग प्रकरणाने दिला. या प्रकरणामुळे आता कोणावर विश्वास ठेवायचा हा मूलभूत प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहिला आहे.
आर्मस्ट्राँग अमेरिकेचा- त्याची कहाणी देशवासियांना अभिमान वाटायला लावेल अशी. पण सत्याच्या शोधासाठी जिवंतपणीच दंतकथा बनलेल्या आर्मस्ट्राँग साम्राज्याला घरघर लावण्याचे काम उसाडासारख्या बिगरसरकारी संस्थेने केले. ही संस्था निधीउभारणीसाठी उद्योगजगतावर अवलंबून आहे. यातील काही कंपन्यांचा आर्मस्ट्राँग ब्रँण्ड अ‍ॅमबॅसिडर आहे. आपल्या ‘खपाच्या मुद्दयाची’ लक्तरं वेशीवर टांगणाऱ्या संस्थेवर दबाव आणण्याचे उपायही झाले मात्र उसाडाने सत्यशोधनाची मोहिम थांबवली नाही आणि त्यातूनच क्रीडा क्षेत्राची प्रतिमा मलिन करणाऱ्या प्रकरणाचा उलगडा झाला. उसाडाला आपली मोहिम राबवता आली यामध्ये अमेरिकेच्या स्वतंत्र समाजरचनेचे कौतुक व्हायला हवे. आर्मस्ट्राँग प्रकरण बाहेर आल्यानंतर अमेरिकेच्याही प्रतिमेला धक्का लागणार होता .. हा धक्का पचवू पण अनिष्ट विचारांची कीड नष्ट करू हा निश्चय केला आणि तो पूर्णत्त्वासही नेला.
या निर्णयाविरोधातही दाद मागण्याची संधी आर्मस्ट्राँगकडे आहे.. कालचक्राच्या फेऱ्याचे आणखी एक आवर्तन ..

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो