मद्यधुंद महिलेच्या ‘बीएमडब्ल्यू’ने तिघांना उडवले; एक अत्यवस्थ
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> मद्यधुंद महिलेच्या ‘बीएमडब्ल्यू’ने तिघांना उडवले; एक अत्यवस्थ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मद्यधुंद महिलेच्या ‘बीएमडब्ल्यू’ने तिघांना उडवले; एक अत्यवस्थ Bookmark and Share Print E-mail

तपासादरम्यान पोलिसांशी असहकार
प्रतिनिधी, मुंबई
मद्यधुंद अवस्थेत बीएमडब्ल्यू गाडी चालवणाऱ्या एका महिलेने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. यातील एक  महिला अत्यवस्थ आहे. गुरूवारी पहाटे साडेचारच्या सुमारास सायन-पनवेल महामार्गावरील मानखुर्द येथे ही घटना घडली.
पहाटे साडेचारच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू (एम एच ०४- इटी- ६६६६) क्रमांकाच्या गाडीने वाशी नाका येथे एका रिक्षाला जोरदार धडक दिली. ही गाडी आरती संतोष शेट्टी (३२) ही महिला चालवत होती. या धडकेत रिक्षात बसलेले मोहम्मद हुसेन अली सय्यद (३५) मोहम्मद राजा सैय्यद, (१९) नासिर अबुबकर सैय्यद (४०) यांच्यासह मोबीना जाहिरा हुसैन (३३) ही महिला जखमी झाली.
या प्रकरणी आरतीला घटनास्थळावरून अटक करण्यात आली. ती मद्याच्या नशेत असल्याचे आढळून आले. अपघातात तीही किरकोळ जखमी झाली आहे. या घटनेतील तिघांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर गंभीर जखमी असलेल्या मोबीना हिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या डोक्यावर गुरुवारी शस्त्रक्रिया करण्यात आली.
या प्रकरणी बेदरकारपणे गाडी चालविणाऱ्या आरती शेट्टी हिची १० हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली. ही महिला तपासात सहकार्य करीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.    
गाजलेले ‘हिट अ‍ॅण्ड रन’
२८ सप्टेंबर २००२ रोजी अभिनेता सलमान खान याने मद्यधुंद अवस्थेत आपल्या लँड क्रुझर या गाडीने वांद्रे येथील ‘अमेरिकन एक्स्प्रेस बेकरी’समोरील पदपथावर झोपलेल्यांना चिरडले होते. या अपघातात एकाचा मृत्यू, तर तिघे जखमी झाले होते. या प्रकरणी सलमानविरुद्ध दाखल असलेला ‘हिट अ‍ॅण्ड रन’चा खटला गेल्या दहा वर्षांपासून वांद्रे महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर प्रलंबित आहे. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार असलेल्या सलमानच्या अंगरक्षकाचाही खटल्यादरम्यान मृत्यू झाला. त्या पूर्वी तो अचानक बेपत्ता झाला होता.
 ९ एप्रिल २००६ रोजी अभिनेता जॉन अब्राहम याने रात्री साडेअकराच्या सुमारास कार्टर रोड येथे ‘धूम-स्टाईल’ मोटारसायकल चालवून दोघांना धडक दिली होती. या प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने जॉनला १६ दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र अपघातानंतर जॉनने दोघा जखमींना रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे वर्तन लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. परंतु भविष्यात या कृत्याची पुनरावृत्ती केल्यास जामीन रद्द करून शिक्षा भोगावी लागेल, असेही बजावले होते.
 नोव्हेंबर २००६ मध्ये अ‍ॅलिस्टर परेरा या गर्भश्रीमंत तरूणाने मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडले होते. या अपघातात सातजणांना जीव गमवावा लागला होता, तर बरेचजण जखमी झाले होते. त्याला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द करीत ती तीन वर्षे केली होती. तर सर्वोच्च न्यायालयानेही ही शिक्षा कमीच असल्याचे नमूद करीत त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी आणखीन कठोर शिक्षा द्यायला हवी होती, असे स्पष्ट केले होते.
 मद्यधुंद अवस्थेत ओमान येथील मनोरुग्णतज्ज्ञ अस्मा मादा हिने कॅडेल रोड येथे दोघांना चिरडले होते. त्यात दोघांचाही मृत्यू झाला होता. अपघातानंतर अस्मा पळून गेली. मात्र नंतर तिला अटक करण्यात आली. तिच्याविरुद्धचा खटला प्रलंबित आहे.
 २० जानेवारी २००८ रोजी सिव्हिल इंजिनीअरचा मुलगा संकेत सोनावणे याने वांद्रे-कुर्ला संकुल येथे निष्काळजीपणे गाडी चालवून दोघांना चिरडले होते. त्याच्याविहरुद्धचा खटला प्रलंबित आहे. विशेष म्हणजे २००५ मध्ये त्याला मद्यधुंद अवस्थेत गाडी चालविण्याच्या आरोपाप्रकरणी एक हजार रुपयांचा दंड झाला होता.
 २८ ऑक्टोबर २०११ रोजी अभिनेता रोनीत रॉय याने आपल्या मर्सिडीजने व्ॉगनॉर गाडीला धडक दिली होती. या अपघातात चौघे जखमी झाले होते. त्यातील दोघांना गंभीर दुखापत झाली होती. रोनीत अपघातानंतर पळून गेला होता. मात्र नंतर त्याला अटक करण्यात आली.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो