दीप उजळत राहो दारी!
मुखपृष्ठ >> लेख >> दीप उजळत राहो दारी!
 

वास्तुरंग

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

दीप उजळत राहो दारी! Bookmark and Share Print E-mail

alt

प्रणोती प्रकाश , शनिवार , ३ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दिवाळी आणि दीप यांचं अतूट नातं.. त्यामुळे दिवाळीत दारात दीप तेवत ठेवण्यालाही खूप महत्त्व आहे. एक छोटासा तेवत राहणारा दिवा सारं वतावरण मंगलमय करून टाकतो. यंदा दिवाळीसाठी बाजारात विविध प्रकारचे दिवे आले आहेत, त्याविषयी..
दीपावली.. मांगल्याचा, आनंदाचा सण! अंध:काराला नष्ट करून सर्वत्र चतन्यदायी आशेचा प्रकाश पसरविणारा सण! दिवाळी म्हणजे उत्साह, आनंद, चविष्ट फराळ, नानाविध नवीन वस्तू, प्रेमाच्या भेटी, नवीन कपडे, फटाके आणि अर्थातच पणत्यांचा तेजोमयी प्रकाश! कारण छोटय़ाशा, नाजुकशा पणत्यांशिवाय हा सण पूर्ण होऊच शकत नाही.
दसऱ्याचे सीमोल्लंघन झालं की बाजारात असंख्य पणत्यांच्या राशीच्या राशी विक्रीसाठी सज्ज होतात. गेल्या काही वर्षांमध्ये पणत्यांचं पारंपरिक रूपडं खूपच आधुनिक, ट्रेण्डी झालंय. पणत्यांचा साजिरा बाज कायम ठेवत त्यांना अधिकाधिक ‘डिझायनर’ करण्यात आलंय. आजही त्यांना असलेली मागणी, त्यांची आवड तिळमात्रही कमी झालेली नाही. म्हणूनच अतिशय छोटीशी असणारी ही वस्तू दरवर्षी आíथक उलाढालही तितक्याच ठसक्यात करत असते.
या वर्षीसुद्धा पणत्यांमध्ये भरपूर वैविध्य पाहायला मिळतंय. यामध्ये पारंपरिक आकारांतील पणत्यांबरोबरच कुयरी, पान, हत्ती, मोर, तुळशी वृंदावन, फुलं, कमळ अशा वेगवेगळ्या आकारातल्या सुरेख पणत्या, दीपमाळ, हँिगग दिवा असे प्रकारसुद्धा लक्ष वेधून घेत आहेत. या पारंपरिक पणत्या, दीपमाळ, दिवे हे साध्या लाल मातीपासून (पाण्याचा माठ ज्या मातीपासून बनवतात ती माती) तयार केले जातात. पण या पणत्यांबरोबरच alt
चिनी माती, प्लॅस्टर ऑफ पॅरिस, टेराकोटा यांपासून बनवलेल्या पणत्यासुद्धा आहेतच. त्यांना नाना रंगांनी, ढंगांनी सजवलेलं आहे. यासाठी मोती, रंगीबेरंगी खडे, मणी, जरदोसी, चंदेरी, सोनेरी लेस यांचा वापर करण्यात आलाय. काही पणत्यांना तर शेिडग करण्यात आलंय. तर काही पणत्यांच्या खोलगट भागाच्या मध्यभागी सुरेख रंगाचा खडा बसवून त्यावर चमचम िप्रकल केलेली आहे.
फ्लोटिंग दिया म्हणजेच पाण्यावरचे दिवे हे या वर्षीसुद्धा स्वत:ची मागणी टिकवून आहेत. मेणाच्या या पणत्या तबकातील पाण्यात सोडून छान सजावट करता येते. मेणाच्या पणत्यांचेही वेगवेगळे आकार, प्रकार आहेत. आकाराने अतिशय लहान असलेली रंगीत मडकी (पोटली), चौकोनी, गोलाकार आकारांच्या मेणाच्या पणत्या यांनाही स्त्रीवर्गामध्ये विशेष पसंती आहे. मेणाच्या पणत्या गेल्या काही वर्षांमध्ये खूपच लोकप्रिय झाल्यायेत, कारण या बराच वेळ तेवत राहतात. तेलाच्या पणत्यांमध्ये सारखं तेल सोडत राहावं लागतं. इतकं लक्ष या मेणाच्या पणत्यांकडे द्यावं लागत नाही. सुंदर रांगोळीच्या बाजूला मेण असलेली रंगीत मडकी ठेवली तर खूप छान दिसतात. मातीच्या पणत्यांमधून तेल गळतं, त्यामुळे रांगोळीवर, जमिनीवर तेलाचे डाग पडतात. तसा प्रकार, टेराकोटा, चिनी मातीच्या, मेणाच्या पणत्यांच्या बाबतीत होत नाही. हेही एक कारण या पसंतीमागे आहे.
या डिझायनर पणत्यांमध्ये या वेळी प्लेट दिया हा एक नवा प्रकार आला आहे. म्हणजे छान मोठय़ा आकाराच्या गोलाकार ताटलीवर छोटय़ा छोटय़ा पणत्यांची सुरेख मांडणी केलेली आहे. ही आगळीवेगळी पणतीसुद्धा सुरेख दिसते. त्याबरोबरच साध्या मातीपासून बनवलेल्या हँिगग पणत्यासुद्धा alt
आहेतच. घराच्या मुख्य दाराबाहेर किंवा गॅलरीत ही हँिगग पणती लावता येईल.
या अतिशय सुरेख, कलात्मक पणत्या बघून तुम्हालाही तुमच्यातल्या सृजनशीलतेला वाव द्यावा, असं वाटत असेल तर तुम्हीसुद्धा अशा पणत्या घरी स्वत: तयार करू शकता. आवडीच्या आकारातील लाल मातीच्या पणत्या आणून त्यावर प्रायमर लावावे. प्रायमरनंतर ऑइलपेंटचा थर द्यावा. हा रंग पक्का झाल्यावर मग फेव्हिकॉलच्या साहाय्याने वेगवेगळ्या मण्यांनी, मोती, खडय़ांनी पणती सजवावी. तसंच फेव्हिक्रीलमध्ये वेगवेगळे रंग, स्पार्कल रंग मिळतात. त्यानेसुद्धा पणत्या सजवता येतात.
दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव! तो पणत्या लावूनच पूर्ण होतो. छोटीशी का होईना, पण दारासमोर पणती तेवत असेल तर ती संपूर्ण वातावरण मंगलमय करते, इतकी ताकद तिच्या त्या शांत, प्रसन्नमयी ज्योतीत आहे. म्हणूनच पणती कोणतीही असो मांगल्याचा दीप सतत उजळत राहो!

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो