फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा
मुखपृष्ठ >> लेख >> फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा
 

वास्तुरंग

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा Bookmark and Share Print E-mail

alt

मनोज अणावकर , शनिवार , ३ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
फटाक्यांच्या आतषबाजीशिवाय दिवाळी साजरी केल्यासारखं वाटत नाही. परंतु  आनंदाच्या भरात फटाके वाजवताना त्याचा आपल्या इमारतीला धोको पोहचू नये, याबाबतही काळजी घेणं आवश्यक आहे.
आपण दिवाळी आली की, घराची झाडलोट करतो, कधीकधी रंगरंगोटीही करतो, पडदे बदलतो तसंच गृहसजावटीच्या नवनवीन वस्तू खरेदी करतो. या सर्वामागे आपल्या घराविषयीचा आपल्याला वाटणारा जिव्हाळा असतो. सणाला घरी येणाऱ्या पाहुण्यांना आपलं घर अधिक सुंदर आणि नीटनेटकं दिसावं, हा यामागचा हेतू असतो. पण हे सर्व करत असताना घराची सुरक्षितता बघणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आजच्या दिवसात दिवाळी साजरी करण्याचा आणखी एक अविभाज्य भाग म्हणजे फटाके लावणं. फटाक्यांची आतषबाजी ही नेत्रसुखद असते. पण अशा फटाक्यांमुळे वातावरणावर हवा आणि ध्वनिप्रदूषणासारखे दुष्परिणाम होतातच, पण इमारतीला धोकाही निर्माण होऊ शकतो किंवा काही दुर्घटनाही घडू शकतात. असे परिणाम कोणते किंवा याबाबत कोणती काळजी घेतली पाहिजे ते जाणू घेऊ या-
alt
काही फटाके हे प्रचंड आवाज करणारे असतात. अ‍ॅटमबॉम्बसारख्या किंवा त्याहीपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या नवनवीन फटाक्यांमुळे इमारतीला धोका निर्माण होऊ शकतो. विशेषत: ज्या इमारती जुन्या आणि मोडकळीला आलेल्या आहेत अशा इमारतींना जर मोठे हादरे बसले तर या हादऱ्यांमुळे इमारतीला बारीक तडे जायची शक्यता असते.
alt
 इमारतीला आधीच जर असे बारीक तडे गेले असतील, तर ते अधिक रुंदावण्याचीही शक्यता असते.
alt
 अशा तडय़ांचं एकदा भेगांमध्ये रूपांतर झालं की, त्यानंतर येणाऱ्या पुढल्या पावसाळ्याच्या वेळी त्या भेगांमधून पाणी मुरून िभतींमध्ये ओल येणं, किंवा पाण्याची गळती सुरू होण्यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात.
alt
 अशा भेगा जेव्हा इमारतीच्या स्ट्रक्चरल भागांना म्हणजे बीम, कॉलम किंवा स्लॅब यांना जातात, तेव्हा या भेगांमुळे इमारतीला धोका संभवू शकतो.
alt
 तसंच या भेगांमधून हवेचा शिरकाव झाला की, वातावरणातल्या प्राणवायूचा आतल्या सळ्यांच्या लोखंडाशी संयोग होऊन त्यांना गंज चढण्याची प्रक्रिया सुरू होते.
alt
 पावसाळ्यात या भेगांमधून आत शिरलेलं पाणी जेव्हा या सळ्यांच्या संपर्कात येतं, तेव्हा सळ्या गंजण्याची प्रक्रिया अधिक वेग घेते.
alt
 अशा प्रकारे जर सळ्या गंजल्या, तर वजन तोलून धरण्याची बीम किंवा कॉलमची क्षमता घटू लागते आणि इमारतीसाठी हे अत्यंत धोकादायक ठरू शकतं.
alt
 कधीकधी इमारतीच्या पायाखालची माती ही चिकणमातीमिश्रित वाळूची असेल, आणि इमारतीला जर कमी खोलीचा, फुटिंग या प्रकारातला पाया असेल, तर फटाक्यांच्या आवाजामुळे बसणाऱ्या मोठय़ा हादऱ्यांमुळे ही माती खचू शकते. या खचण्यामुळे तो विशिष्ट पाया आणि त्यावरचा विशिष्ट कॉलमही खचू शकतो. तसं झालं, इतर कॉलम खचलेले नसताना केवळ काही ठराविक कॉलम खचले, तर त्याचा ताण त्यावर रेलून उभ्या असलेल्या बीमवर पडून बीमला तडे जायचीही शक्यता नाकारता येत नाही.
alt
 याव्यतिरिक्त इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी अनेकजण भुईचक्र, अनार यांसारखे फटाके लावत असतात. याच प्रवेशद्वारापाशी विजेचे मीटर बसवलेले असतात. त्यामुळे या फटाक्यांच्या ठिणग्या जर या विद्युत उपकरणांवर पडल्या, तर आगीसारख्या मोठय़ा दुर्घटनाही घडू शकतात. त्यामुळे फटाके लावताना अशा विद्युत उपकरणांपासून ते दूर लावण्याची काळजी घेणं आवश्यक आहे.
alt
 काहीजण गच्चीच्या कठडय़ावरही फटाके लावतात. हेही अत्यंत चुकीचे आहे. कारण जळते फटाके खाली पडले, तर खालून जाणाऱ्या माणसांना इजा व्हायची शक्यता असते.
alt
याबरोबरच हल्ली बऱ्याचदा केबल टीव्हीच्या आणि इंटरनेटच्या केबल्स एका इमारतीच्या गच्चीवरून दुसऱ्या इमारतीच्या गच्चीवर टाकलेल्या असतात. ते चूक की बरोबर हा वादाचा आणि स्वतंत्रपणे चíचण्याचा मुद्दा असला तरी असे जळते फटाके जर या केबल्सवर पडले, वा या केबल्स जळतजळत जर एखाद्याच्या घरात गेल्या, तर टीव्ही, कॉम्प्युटर अशा उपकरणांचे फार मोठे नुकसान होण्याबरोबरच आग लागण्याचीही शक्यता असते.
हे सर्व धोके जर टाळायचे असतील तर त्याकरता आवाज करून हादरे बसवणाऱ्या फटाक्यांचा वापर टाळायला हवा. तसंच केवळ रोषणाई करणारे किंवा बिनआवाजाचे फटाके लावतानाही, ते गच्चीत किंवा इमारतीच्या परिसरातल्या विद्युत उपकरणांजवळ लावू नयेत, तर इमारतीसमोरच्या मोकळ्या आणि सुरक्षित जागेत लावावेत. दिवाळी हा सण आनंदाचा आहे. तो आनंदाने साजरा करण्यासाठी इमारतीची सुरक्षा जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे. केवळ आपलं घरच सणासुदीला सजवणं पुरेसं नाही, तर आपल्या इमारतीचीही काळजी घेणं हेही तितकंच गरजेचं आहे, अन्यथा आपल्याला निवारा देणाऱ्या त्या इमारतीच्या मुळावर उठणं म्हणजे बसल्या फांदीवर घाव घालण्याचा अविचारीपणा करण्यासारखंच होईल. ते टाळायला हवं.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो