‘ब्रह्मकमळ’ पुस्तकाचे प्रकाशन शैलजा नामजोशी यांच्या ‘ब्रह्मकमळ’ या पुस्तकाच्या प्रकाशन पुण्यातील विद्यार्थी सहाय्यक समितीच्या मोडक सभागृहात अलीकडेच पार पडले. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. पुष्पा लिमये उपस्थित होत्या.
प्रा. प्रभाकर पुजारी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. शैलजा नामजोशी यांनी विविध नियतकालिके तसेच वर्तमानपत्रांमध्ये लिहिलेल्या कथा, कविता आणि लेखांचा या पुस्तकात समावेश आहे. ठाणे हे शैलजा नामजोशी यांचे माहेर. लेखनाची प्रेरणा त्यांना वडिल कै. वि. चिं. फडके यांच्याकडून मिळाली. वडिलांच्या व्दितीय स्मृतिदिनानिमित्त लेकीचे पुस्तक प्रकाशन करून फडके कुटुंबियांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. वर्धापनदिन सोहळा ठाणे- येथील प्रदीप वाचनालयाचा वर्धापन दिन सोहळा शनिवार, ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रदीप सोसायटी, एस.ई.एस हायस्कूलजवळ, पाचपाखाडी, ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या वेळी डॉ. यशवंत पाठक ‘अध्यात्म आणि विज्ञान’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे. अविस्मरणीय संध्याकाळ डोंबिवली- दि शामराव विठ्ठल को-ऑपरेटिव्ह बँक, डोंबिवली पूर्व शाखेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता येथील संत नामदेव पथ येथील शाखेत ‘एक अविस्मरणीय संध्याकाळ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कविता, गाणी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- २४२६५७८/ ९८६७४९३४९१. चंद्रशेखर ठाकूर यांचे व्याख्यान कल्याण- बुधवार ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० प्लॅटिनम सभागृह, भानुसागक सिनेमा, कल्याण (प.) येथे सीडीएसएल गुंतवणूक शिक्षण विभागाचे प्रमुख चंद्रशेखर ठाकूर यांचे शेअरविषयक माहितीवर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- चंद्रशेखर ठाकूर ९८२०३८९०५१. सायकल रॅली ठाणे- दरवर्षीप्रमाणे यंदाही साईभक्तांसाठी साईराम मित्र मंडळाच्या वतीने ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत ठाणे ते शिर्डी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नावनोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- ९८६७६७२४४४. शताब्दी सोहळा ग्रॅंट रोड येथील डी.जी.टी विद्यालयाला येत्या ५ डिसेंबर रोजी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन येत्या ८ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८१९५८९९१५/९८३३३१२६४०/९३२४७२५०५० या क्रमांकावर संपर्क साधावा. गुणवंत विद्याथ्यांचा सन्मान ‘आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान’ तर्फे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात राहणाऱ्या सातारकर नागरिकांचा मेळावा नुकताच परळ येथील दामोदर हॉल येथे आजोजित करण्यात आला होता. आमदार नरेंद्र पाटील, युवा नेते मनोज व्यवहारे, मुंबै बँकेचे उपाध्यक्ष अनिल गजरे, माजी आमदार बाबूराव माने आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. |