दोन कोटींचे सोने पुण्यात लंपास
|
|
|
|
|
प्रतिनिधी पुणे रास्ता पेठेतील जे. पी. ज्वेलर्स या दुकानाच्या मागील दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून चोरटय़ांनी साडेसात किलो सोने व रोख ४७ हजार असा एकूण एक कोटी ९७ लाख रुपयाचा ऐवज चोरुन नेला.
दुकानामध्ये चार सीसीटीव्ही कॅमेरे असून त्याचे चित्रीकरण साठविणारे युनिटही चोरुन नेले आहे. गुरुवारी रात्री नऊ ते अकरा दरम्यान हा प्रकार घडला. चोरी करणारी व्यक्ती ही येथील माहिती असणारी असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. काही महिन्यांपूर्वी लक्ष्मी रस्त्यावरील पोरवाल ज्वेलर्सवर दरोडा टाकून दीड कोटीची झालेली चोरी अद्याप उघडकीस आलेली नाही. जे. पी. ज्वेलर्सचे मालक किरण जवेरचंद्र सोनिग्रा यांनी याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चोरांनी दुकानातील शोकेसमध्ये ठेवलेले नेकलेस, कर्णफुले, अंगठय़ा, रिंग असे साडेसात किलोचे दागिने व ४७ हजारांची रोकड चोरले. मात्र, त्यांनी चांदीच्या दागिन्यांना हातही लावला नव्हता. पोलीस अधिक तपास करत आहेत. |