पूर्वपरीक्षेत सचिनला घवघवीत यश!
मुखपृष्ठ >> क्रीडा >> पूर्वपरीक्षेत सचिनला घवघवीत यश!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पूर्वपरीक्षेत सचिनला घवघवीत यश! Bookmark and Share Print E-mail

* अजिंक्य रहाणेनेही साकारले निवड समितीचे लक्ष वेधणारे नाबाद शतक
* रेल्वेच्या निष्प्रभ गोलंदाजीपुढे मुंबईची ४ बाद ३४४ अशी मजल
प्रशांत केणी,मुंबई, शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२

आव्हानात्मक अशा इंग्लिश परीक्षेला सामोरे जाण्याआधीच्या पूर्वपरीक्षेत सचिन तेंडुलकर घवघवीत यश मिळवून उत्तीर्ण झाला. हे समाधान सचिनच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहात होते. वानखेडे स्टेडियमच्या घरच्या मैदानावर सचिनने धडाकेबाज शतक झळकावले आणि अजिंक्य रहाणेच्या साथीने दोनशे धावांची भागीदारीही रचली.

त्यामुळेच रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या पहिल्या दिवसअखेर मुंबईने रेल्वेच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवत ४ बाद ३४४ अशी दमदार मजल मारली. अजिंक्य रहाणेनेही संयमी शतक झळकावले असून तो १०५ धावांवर खेळत आहे.
गेल्याच महिन्यात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सचिनला तिन्ही डावांत मिळून फक्त ६३ धावा काढता आल्या होत्या. याशिवाय या तिन्ही डावांमध्ये किवी गोलंदाजांनी त्याचा त्रिफळा भेदल्यामुळे प्रसारमाध्यमांनी आणि माजी क्रिकेटपटूंनी सचिनवर टीकेची झोड उठवली होती. आता इंग्लंडविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका दोन आठवडय़ांवर येऊन ठेपली आहे. त्या दृष्टीने सराव व्हावा म्हणून तीन वर्षांनी सचिन रणजी क्रिकेटमध्ये खेळला आणि आपल्या कामगिरीने साऱ्यांचीच तोंडे बंद केली.
रोहित शर्माने (१८) रणजीच्या निमित्ताने मिळालेली संधी गमावल्यानंतर रहाणेने सचिनसोबत चांगलीच जोडी जमावली. ३९ वर्षीय सचिनने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरून सुरुवात धिमी केली.
३१व्या चेंडूवर त्याने पहिला चौकार ठोकला. पण नंतर मात्र त्याने रेल्वेच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढवला आणि फक्त १०३ चेंडूंत आपले शतक साजरे केले. मग मात्र त्याने बहारदार फटकेबाजी केली. सचिनने एकंदर २१ चौकार आणि ३ षटकारांच्या साह्णााने १३६ चेंडूंत १३७ धावा काढल्या. वेगवान गोलंदाज अनुरित सिंगच्या गोलंदाजीवर दुसऱ्या स्लिपमध्ये पराग मडकईकरकडे झेल देऊन सचिन माघारी परतला. या शतकी खेळीमुळे इंग्लंडच्या कसोटी मालिकेपूर्वी सचिनचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यातील पहिल्या डावात फक्त चार धावांवर बाद झाल्यामुळे अजिंक्य रहाणे निराश झाला होता. पण गुरुवारी हे नैराश्य झटकून त्याने दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रणजीमध्ये खेळताना आपल्या सातत्यपूर्ण फलंदाजीचा प्रत्यय देत रहाणेने शतक झळकावून निवड समितीलाही विचार करायला लावला आहे. रहाणे ७ धावांवर असताना हार्दिक राठोडच्या गोलंदाजीवर मुरली कार्तिकने दुसऱ्या स्लिपमध्ये त्याला जीवदान दिले होते.
‘‘शतक झळकावल्याचे समाधान नक्कीच आहे. सचिन समोर असल्यामुळे मी त्याला स्ट्राइक देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो. तो मैदानावर असतो तेव्हा अनुभवाचे सल्ले हे मिळतच असतात. त्यामुळे शतकी खेळी साकारताना आत्मविश्वास दुणावत गेला,’’ अशी प्रतिक्रिया सामन्यानंतर अजिंक्य रहाणेने व्यक्त केली.                                 

धावफलक
मुंबई (पहिला डाव) : कौस्तुभ पवार झे. रावत गो. अनुरित सिंग २४, आदित्य तरे त्रिफळा गो. कार्तिक ४७, अजिंक्य रहाणे खेळत आहे १०५, रोहित शर्मा धावचीत १८, सचिन तेंडुलकर झे. मडकईकर गो. अनुरित सिंग १३७, अभिषेक नायर खेळत आहे ०, अवांतर १३, एकूण ९० षटकांत ४ बाद ३४४
बाद क्रम : १-४५, २-१००, ३-१४३, ४-३४३
गोलंदाजी : कृष्णकांत उपाध्याय १८-१-७८-०, हार्दिक राठोड २१-१-६४-०, अनुरित सिंग १७-४-५३-२, संजय बांगर ८-०-४४-०, दिनेश कार्तिक २०-२-५५-१, आशिष यादव ५-०-३३-०, शिवकांत शुक्ला १-०-१३-०.


रणजी राऊंड-अप
हरयाणा ५५ धावांत गारद
रोहतक : उमेश यादवने अवघ्या १८ धावांत ५ बळी घेतल्याने विदर्भाने हरयाणाचा डाव ५५ धावांतच गुंडाळला. संदीप सिंगने ११ धावांत ४ बळी घेत त्याला चांगली साथ दिली. पहिल्या दिवसअखेर विदर्भने २ बाद ७८ धावा केल्या आहेत.    

दिल्लीकर फ्लॉप
गाझियाबाद : इम्तियाज अहमदच्या भेदक गोलंदाजीमुळे सेहवाग, गंभीर, कोहली आणि उन्मुक्त चंदचा समावेश असलेल्या दिल्लीचा डाव २३५ धावांत आटोपला. पुनीत बिस्तने अर्धशतकी खेळी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना उत्तर प्रदेशच्या १ बाद ४० धावा झाल्या आहेत.     

इरफान-आदित्य चमकले
बडोदा : ३ बाद ४० अशा परिस्थितीत खेळपट्टीवर आलेल्या इरफान पठाण आणि आदित्य वाघमोडे यांनी चौथ्या विकेटसाठी २२० धावांची भागीदारी करत बडोद्याचा डाव सावरला. बडोद्याच्या ३०८ धावा झाल्या असून इरफान १०५, तर आदित्य १२१ धावांवर खेळत आहे.     

पार्थिवची दीडशतकी खेळी
इंदूर : कर्णधार पार्थिव पटेलने १६२ धावांची मोठी खेळी करत मध्य प्रदेशविरुद्ध गुजरातच्या डावाला आधार दिला. त्यामुळे गुजरातने पहिल्या दिवसअखेर ५ बाद ३२७ अशी मजल मारली आहे.     

राजस्थानची आगेकूच
कोलकाता : पंकज सिंगच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानने बंगालच्या डावाला खिंडार पाडले. सुभोमय दासने ९५ धावांची एकाकी झुंज दिली. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा बंगालच्या ४ बाद १८७ धावा झाल्या आहेत.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो