नाट्यरंग : रसिकानुनयी संगीत मैफल
मुखपृष्ठ >> रविवार वृत्तान्त >> नाट्यरंग : रसिकानुनयी संगीत मैफल
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नाट्यरंग : रसिकानुनयी संगीत मैफल Bookmark and Share Print E-mail

रवींद्र पाथरे

मराठी संगीत रंगभूमीला ललामभूत ठरलेल्या बालगंधर्वाचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मवर्ष. तर त्यांच्या ‘गंधर्व संगीत मंडळी’चे हे शताब्दी वर्ष. हे दोन्ही सुवर्णयोग साधून यंदा त्यांच्या गान-अभिनयाने नटलेली संगीत नाटकं आवर्जून रंगभूमीवर आणली जात आहेत. अशाप्रकारे बालगंधर्वाप्रती आदर व्यक्त करत असतानाच संगीत नाटकाला महाराष्ट्र शासनाने देऊ केलेले घसघशीत अनुदानही याला काही अंशी कारणीभूत आहेच. आधुनिक मराठी नाटकाची वैभवपताका म्हणून जी संगीत रंगभूमी आजवर वाखाणली गेली, तिची आज पार दुरवस्था झाली आहे. या पाश्र्वभूमीवर आपला हा अनमोल ठेवा जतन करणं हे शासनाचं कर्तव्यच आहे. त्यामुळे शासनाने संगीत रंगभूमीला अनुदान देण्यात काहीच अनुचित नाही. परंतु जी मंडळी हे अनुदान घेतात, त्यांनीही काही पथ्यं जरूर पाळायला हवीत. पेन्शनीत निघालेली नटमंडळी घेऊन संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ पुन्हा आणता येणार नाही, हे त्यांनी बरीक लक्षात घ्यायला हवे. आणि शासकीय अनुदानासाठीच जर या मंडळींचे बालगंधर्वप्रेम उतू जात असेल तर त्यांचा हा हेतू ध्यानी घेऊन शासनानेही आंधळेपणानं अशांना अनुदान देऊ नये. मग भले संगीत रंगभूमी अस्ताला गेली तरी चालेल; पण तिचं असं ‘कलेवर’ पाहण्याचं दुर्भाग्य आजच्या पिढीच्या माथी मारू नये. अशानं आधीच संगीत रंगभूमीबद्दल गैरसमज बाळगणाऱ्या या पिढीच्या मनात तिच्याबद्दल अधिकच कटु भावना निर्माण होईल. असो.
तर सध्या दोन-दोन ‘संगीत सौभद्र’ रंगमंचावर अवतरली आहेत. पैकी एक आहे मुंबईच्या ‘ओम नाटय़गंधा’ या संस्थेचं. त्यात विक्रान्त आजगावकर हे बालगंधर्वानी गाजवलेली सुभद्रेची भूमिका साकारतात. बालगंधर्वाच्या काळात स्त्रिया नाटकांतून कामं करत नसल्यानं तेव्हा स्त्री-भूमिकाही पुरुष नटच साकारत असत. त्याचा वानवळा या ‘सौभद्र’मध्ये देण्याचा बऱ्यापैकी यशस्वी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबरीनं संगीत नाटकातील ‘नाटय़’ आणि ‘संगीत’ यांचा तोलही या प्रयोगात सांभाळला आहे.  पुण्यातील ‘राहें’ निर्मित ‘संगीत सौभद्र’मध्ये तगडी गायक कलावंत मंडळी घेऊन ‘सौभद्र’चं प्रमुख आकर्षण असलेली गाणी आणि त्यांचं रसिकांवरचं गारुड पुनश्च आजमावण्याचा प्रयत्न केल्याचं जाणवतं. ‘रसिकानुनयी सौभद्र’ असं या प्रयोगाचं वर्णन केलं तर ते अतिशयोक्त ठरू नये.
‘राहें’ संस्थेच्या ‘संगीत सौभद्र’मध्ये ‘बालगंधर्व’ या अलीकडे गाजलेल्या चित्रपटात ज्यांच्या आवाजात चित्रपटातले बालगंधर्व गायले होते, त्या गायक आनंद भाटे यांनाच कृष्णाच्या भूमिकेत उभं करून रसिकांना संगीत मेजवानी देण्याचा घाट घातलेला आहे. त्यांच्याव्यतिरिक्त यात गायक कलावंतांची मोठीच्या मोठी फौजच आहे.. राहुल देशपांडे, अजय पूरकर, अस्मिता चिंचाळकर, दीप्ती माटे. स्वाभाविकपणेच या ‘संगीत सौभद्र’मध्ये गाण्यांची रेलचेल असणार, हे गृहीतच होतं. तथापि, ‘सौभद्र’चा पहिला संपूर्ण अंक हा संगीत मैफलीसारखा सादर होत असल्यानं त्यात ‘नाटय़’ कुठं आहे, असा प्रश्न सजग प्रेक्षकाला हमखास पडेल. अर्थात् ‘सौभद्र’च्या या प्रयोगाला येणाऱ्या प्रेक्षकांची मानसिकताही आपण नाटय़संगीताच्या मैफिलीलाच आलेलो आहोत, तेव्हा कान आणि मन तृप्त होईतो गाणं ऐकायचं, अशीच असल्यानं त्यांची फर्माईश या ‘सौभद्र’मध्ये यथासांग पुरविली जाते. श्रोत्यांची ‘वन्स मोअर’ची प्रत्येक दाद ‘सर ऑंखों पर’ घेऊन कलावंतांकडून पुनश्च पदं गायली जातात. अशानं नाटकाचा तोल जातो, वगैरे गोष्टी नजरेआड केल्या गेल्या आहेत. प्रेक्षकांनाही याची फिकीर दिसत नाही. दुसऱ्या अंकातही हे ‘फर्माईश’ प्रकरण सुरूच राहत असलं तरी बऱ्याच अंशी या उत्तरार्धात नाटय़ात्म प्रसंग(ही!) रंगतीनं सादर होतात. त्यामुळे ‘सौभद्र संगीत मैफली’ला थोडा चाप बसला आहे.  
बलरामानं आपली बहीण सुभद्रा हिचं तिच्या मनाविरुद्ध दुर्योधनाशी ठरवलेलं लग्न डावपेचानं मोडून, तिनं ज्याला मनोमनी वरलं होतं त्या अर्जुनाशी तिचं लग्न लावून देण्यासाठी कृष्णानं लढवलेल्या नाना हिकमतींची रंजक गोष्ट म्हणजे ‘संगीत सौभद्र’ होय. कृष्णाच्या या ‘नाटका’त ‘भूमिका’ वठविणाऱ्यांना मात्र त्याच्या ‘कृष्णलीलां’(चांगल्या अर्थानं!)चा पत्ता नसतो, ही खरी या नाटकातली गंमत! त्यामुळे ‘संगीता’बरोबरच यातलं ‘नाटय़’ही तितकंच प्रभावी असायला हवं. परंतु ‘राहें’च्या या प्रस्तुतीत हा विवेक हरपल्याचं दिसतं.
सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे या ‘संगीत सौभद्र’चं बलस्थान आहे- त्यातली दादा गायक मंडळी! त्यामुळे नाटय़संगीताच्या चाहत्यांना गाण्यांची अक्षय मैफल अनुभवावयास मिळते. ‘नमुनि ईशचरणा’, ‘नभ मेघांनी आक्रमिले’, ‘राधाधरमधुमिलिंद जय जय’, ‘लग्नाला जातो मी..’, ‘बहुत छळियले नाथा’, ‘वद जाऊ कुणाला शरण गं’, ‘बलसागर तुम्ही वीरशिरोमणी’, ‘जरतारी लाल शालजोडी’, ‘अरसिक किती हा शेला’, ‘नच सुंदरी करू कोपा’, ‘कोण तुजसम मज सांग गुरुराया कैवारी माझा’, ‘पांडुनृपति जनक जया’, ‘बहुत दिन नच भेटलो सुंदरीला’, ‘प्रिये पहा रात्रीचा समय सरूनी..’, ‘व्यर्थ मी जन्मले थोर कुळी’, ‘ज्यावरी मी विश्वास ठेविला’, ‘पावना वामना या मना’, ‘किती किती सांगू तुला’ यासारख्या अवीट गोडीच्या पदांची ही मैफल तशीही कधी संपू नयेसं वाटत राहतं खरं; परंतु आपण ‘संगीत सौभद्र’ नाटक पाहतो आहोत, हे ध्यानी आल्यावर मात्र नाटकाच्या फुटपट्टय़ा लावणं भाग पडतं. आणि त्यांत हा प्रयोग उणावतो. दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी संगीत आणि नाटय़ाचा तोल सांभाळण्याची सख्त ताकीद कलाकारांना द्यायला हवी. कारण या नाटकाची संपादित रंगावृत्तीही त्यांचीच आहे. समांतर रंगभूमीवर काम केलेल्या निपुण धर्माधिकारी यांना असा प्रेक्षकानुनय नक्कीच मान्य नसणार.
करण थत्ते (रंगभूषा) आणि कल्याणी कुलकर्णी (वेशभूषा) यांनी आपली कामगिरी बिनचूक पार पाडली आहे. केवूर गोडसे यांच्या सूचक, सांकेतिक नेपथ्यामुळे ‘सौभद्र’च्या या प्रयोगातील ‘नाटय़ा’चा अभाव विशेष जाणवतो. आदित्य ओक यांनी नाटय़ांतर्गत भावभावना आणि घटना-प्रसंगांतील संघर्षक्षणांना उचित पाश्र्वसंगीताद्वारे उठाव दिलेला आहे.  हे गायक कलाकारांचं ‘सौभद्र’ आहे याची ठायी ठायी जाणीव करून देण्यात आणि रसिकांचे कान अन् मन तृप्त करण्यात यातल्या कलाकारांनी कसलीही कसर सोडलेली नाही. विशेषत: आनंद भाटे यांनी रंगविलेला मिश्किल कृष्ण पूर्वार्धात नाटय़संगीताची मैफल गाजवीत असला तरी दुसऱ्या अंकात नट म्हणूनही त्यांना सूर गवसला आहे. त्यांच्या गाण्याबद्दल आम्ही पामरे काय बोलावे? राहुल देशपांडे यांनी सूत्रधार आणि नारदाच्या भूमिकेत आपल्या हिश्श्याची दाद ठोक वसूल केली आहे. अजय पूरकरांचा अर्जुन पुरेसा छाकटा आहे. ते गातातही आक्रमक! अस्मिता चिंचाळकर यांनी सुभद्रेचं दु:ख, त्रागा, भ्रमनिरास आणि विरक्ती हे सगळे भाव गाण्यांतून मूर्त केले आहेत. दीप्ती माटे यांची रुक्मिणी नाकावर फणकारा असलेली अन् तितकीच लाघवी. त्यांनीही आपल्या वाटय़ाची गाणी चोख वाजवली आहेत. चिन्मय पाटसकर यांनी बलरामाचं भोळेपण आणि कृष्णाच्या चाली न ओळखता येण्यातली हतबलता छान दर्शविली आहे. अनुजा वर्तक (कुसुमावती) आणि तेजस दंडगव्हाळ (घटोत्कच) यांनी त्यांना चोख साथ दिली आहे.
एकुणात, हे ‘सौभद्र’ नाटक म्हणून नसलं, तरीही संगीत मैफल म्हणून आपल्याला नादावतं, नक्की.    

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो