संधी मिळाली, तर अभिनयही करणार!
मुखपृष्ठ >> रविवार वृत्तान्त >> संधी मिळाली, तर अभिनयही करणार!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

संधी मिळाली, तर अभिनयही करणार! Bookmark and Share Print E-mail

- रोहन टिल्लू

पडद्यावरच्या नायिकेचा स्वभाव, मूड आणि अभिनय लक्षात घेऊन तिला गाण्यांपुरता आवाज देणारी सुनिधी चौहान आता ‘सन्स ऑफ राम’ या अ‍ॅनिमेशनपटात सीतेच्या पात्राला आवाज देणार आहे. पाश्र्वगायनात सध्याच्या सर्वोच्च गायिकांपैकी एक, अशी कीर्ती मिळवलेली सुनिधी संधी मिळाल्यास अभिनयाकडेही वळण्याची शक्यता आहे. ‘वीक पॉइंट’मध्ये सुनिधीशी मारलेल्या गप्पा..
० अ‍ॅनिमेशनपटात एखाद्या पात्राला आवाज देणे हे पाश्र्वगायनापेक्षा वेगळे आहे. पण यात नेमके वेगळेपण, नेमका फरक तू कसा करतेस?
- तुम्ही एखाद्या चित्रपटासाठी पाश्र्वगायन करता, त्यावेळी तुम्ही एका जिवंत माणसासाठी, त्याच्या एखाद्या भूमिकेसाठी आपला आवाज देत असता. तुम्ही त्या माणसाला भेटू शकता. त्याला समजून घेऊ शकता. आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यासाठी गाता. मात्र एखाद्या अ‍ॅनिमेशनपटातील पात्राला तुमचा आवाज उसना देताना तुमच्यासमोर कोणतीही जिवंत व्यक्ती नसते. ते पात्र केवळ कागदावर अस्तित्त्वात असते. त्यामुळे ते पात्र, संपूर्ण कथा, त्या पात्राची पाश्र्वभूमी या सगळ्याचाच अभ्यास तुम्हाला करावा लागतो आणि ते मोठे आव्हान असते. पण
० सन्स ऑफ राम या अ‍ॅनिमेशनपटासाठी आवाज देण्याची संधी तुला कशी मिळाली?
- या अ‍ॅनिमेशनपटाचे दिग्दर्शक कुशल रुईया यांनी मला या अ‍ॅनिमेशनपटासाठी गाणी गाण्याची संधी दिली. त्यानुसार मी सगळी गाणी ध्वनिमुद्रित केली. त्यानंतर लगेचच त्यांनी मला, तू सीतेच्या पात्रासाठी आवाज देऊ शकशील का, अशी विचारणा केली. त्यांच्या मते मी सीतेच्या पात्राला आवाज दिल्यामुळे ते पात्र वास्तवाच्या अधिकाधिक जवळ जाणारे होते. मलाही तो विचार पटला आणि मी ही संधी स्वीकारली.
० पण या आधी तुला अशा प्रकारे आवाज उसना देण्याची संधी मिळाली होती का?
- हो. मी ‘रिओ’ या चित्रपटासाठी आवाज दिला होता.
० एखाद्या पात्राला चित्रपटात आवाज देण्यासाठी भावभावनांची ओळख असणे आवश्यक असते. अभिनयातही हा गुण महत्त्वाचा असतो. पुढे जाऊन तू अभिनय करताना वगैरे दिसशील का?
- मी नेहमीच प्रवाहासोबत जाते. याआधी मी कधी डबिंग केले नव्हते. पण या चित्रपटासाठी डबिंग केल्यानंतर यापुढे कोणत्याही चित्रपटासाठी कोणत्याही पात्रासाठी डबिंग करण्याचा आत्मविश्वास आता मला मिळाला आहे. त्याचप्रमाणे याआधी मी कधी अभिनय केलेला नाही. पण संधी चालून आल्यास मला अभिनय करायला नक्कीच आवडेल. मी माझ्या अंतप्रेरणेवरूनच निर्णय घेते.
० इंडियन आयडॉल’च्या परीक्षणाचा अनुभव कसा होता? सामान्य माणसासाठी अशा स्पर्धा किती महत्त्वाच्या आहेत, असे तुला वाटते?
- माझ्याबद्दल विचारशील, तर इंडियन आयडॉलसाठी परीक्षण करण्याचा माझा अनुभव खूपच चांगला होता. खूप चांगल्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. संगीत आणि गाणे हे माझे पहिले प्रेम आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना प्रोत्साहन देणे माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे होते. सामान्य माणसासाठी या स्पर्धेचे महत्त्व नक्कीच खूपच मोठे आहे. पण माझ्या मते, सामान्यातल्या सामान्य माणसाला त्याच्यातील असामान्य गुणांची ओळख करून देण्याचे आणि ते गुण जगासमोर आणण्याचे काम या स्पर्धा करतात. त्यामुळे त्या खूप महत्त्वाच्या आहेत.
० रिअ‍ॅलिटी शोजची वाढती संख्या ही चिंतेचे कारण नाहीये का? अशा शोजमध्ये सातत्याने भाग घेतल्याने प्रतिभेचे नुकसान होते का?
- या प्रश्नाचे उत्तर व्यक्तिसापेक्ष आहे. प्रत्येक कलाकाराने याबाबत विचार करायला हवा. एखाद्याला ते चूक वाटेल, तर एखाद्यासाठी आपल्या गाण्याची सातत्याने परीक्षा घेण्याचा तो मार्ग असेल.
० रिअ‍ॅलिटी शो जिंकल्यानंतर पुढची कारकीर्द घडवण्यासाठी गायकाने काय करायला हवे?
- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रियाज. वयाच्या साठाव्या वर्षीही तुमचा रियाज कायम पाहिजे. अनेक गुणी गायक यश मिळाल्यानंतर या तात्पुरत्या यशाला भुलून रियाज सोडतात. पण ते चूक आहे. रियाज कायम ठेवायला हवा. त्याचबरोबर योग्य संधीची वाटही पाहायला हवी. ही संधी काहींना दोन महिन्यांत मिळते, तर काहींना त्यासाठी दोन वर्षे झगडावे लागते. पण गाण्यावरची श्रद्धा आणि रियाज या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.
० तू स्वत रिअ‍ॅलिटी शोमधून आली आहेस. तुझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या दिवसांबद्दल काय सांगशील?
- तो माझ्या आयुष्यातील खूपच भारावलेला काळ होता. त्या काळातली घटका अन् घटका मी खूप आनंदाने उपभोगल्या आहेत. खूप मेहेनत करावी लागली होती, पण आपण काहीतरी नवीन करतोय, हा विश्वास आणि आनंदही होता. पण त्यावेळी केलेली मेहेनत आणि कामावरच्या श्रद्धेमुळे आज मला हे यश मिळाले आहे.
० सध्या चित्रपटसृष्टीत अनेक नवीन कलाकार येत आहेत. या बदलांकडे तू कशी बघतेस? तुला त्यांचे आव्हान वाटते का?
- आव्हान म्हणशील, तर अजिबात नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की, त्यांच्याकडे खूपच चांगली गुणवत्ता आहे. त्यामुळे मी नेहमीच त्यांना प्रोत्साहन देत असते आणि माझ्या शुभेच्छाही त्यांच्या पाठिशी नेहमीच असतील. अशा प्रकारे सशक्त स्पर्धा असेल, तर त्यात चित्रपटसृष्टीचे, संगीताचे आणि पर्यायाने रसिकांचे हित आहे.
० तू दाक्षिणात्य चित्रपटांत गाणी गायली आहेस आणि बॉलिवूडमध्येही. या दोन्ही चित्रपटसृष्टीतील फरक काय आहे?
- गाणे ही माझी नुसती आवड नाही, तर पॅशन आहे. त्यामुळे टॉलिवूड असो किंवा बॉलिवूड, मी सारख्याच श्रद्धेने गाणी गाते. हां, आता एकच फरक आहे. दाक्षिणात्य चित्रपटांच्या गाण्यांची भाषा मला तेवढी चांगली समजत नाही..
० एक व्यक्ती म्हणून सुनिधी कशी आहे? तुझ्या आवडीनिवडी कोणत्या, छंद कोणते?
- एक व्यक्ती म्हणून सुनिधी खूपच फोकस्ड् आहे. माझे लक्ष नेहमी माझ्या ध्येयावर केंद्रीत असते आणि ते गाठण्यासाठी मी नेहमीच मेहेनत करत असते. छंद विचारशील, तर गाणे हा माझा सर्वात मोठा छंद आहे. त्याचबरोबर चित्रपट पाहणे आणि पर्यटन करणे या गोष्टीही मला खूप आवडतात.
० सुनिधीचा वीक पॉइंट कोणता?
- अं.. वीक पॉइंट असा काहीच नाही.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो