वनातलं मनातलं : मानव वन्यजीव संघर्ष.. एक दुखद अध्याय!
मुखपृष्ठ >> विदर्भरंग >> वनातलं मनातलं : मानव वन्यजीव संघर्ष.. एक दुखद अध्याय!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

वनातलं मनातलं : मानव वन्यजीव संघर्ष.. एक दुखद अध्याय! Bookmark and Share Print E-mail

डॉ.बहार बाविस्कर, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२
९९७५६८०३७५

निसर्गाला ओरबाडता ओरबाडता काय घेऊ अन् किती घेऊ, अशी विमनस्क झालेल्या आजच्या माणसाची विचारशक्ती निसर्गावर नियंत्रण कसे ठेवता येईल, यातच खर्ची पडत आहे. प्रचंड मोठाली डोंगरं पोखरून मोठमोठी धरणं बांधायची, या कर्तृत्वपूर्तीच्या अभिमानाने अभिस्नात व्हायचं अन् पुन्हा एकदा दुसऱ्या ठिकाणी निसर्गावर अत्याचार करण्यासाठी नव्या उमेदीनं कामाला लागायचं, ही आपली मानसिकता आपल्यासाठी खूप घातक ठरणार आहे. वातावरणात प्रचंड प्रमाणात कार्बन डॉयऑक्साईड, सल्फर डॉयऑक्साईड यासारख्या विषारी वायूंचे उत्सर्जति करूनही ग्लोबल वाìमगसाठी निसर्गालाच जबाबदार ठरवायचा खोडसाळपणाही आपल्याला सुचत असतो. चहा, ऊस यासारख्या नगदी पिकांच्या शेतीसाठी प्रचंड मोठय़ा प्रमाणात जंगलतोड करून हावरट माणसाची भूक भागवायची अन् वरून शेतात घुसून वन्यप्राणी माणसांवर आणि जनावरांवर हल्ले करतात, अशी चोराची उलटी बोंबदेखील मारायची ही कृती आपली विचित्र मानसिकता दर्शवते.
निसर्गाचा आणि निसर्गाशी समतोल राखत विकासाची पावलं उचलली गेली तर आमची ना नाहीये कारण, विकास आम्हालादेखील हवा आहे, परंतु निसर्गावर आपलाच अधिकार आहे आणि केवळ आम्हीच मानवी भवितव्याचे तारणहार आहोत, अशा आविर्भावात जर माणूस बेताल होऊन वागत असेल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. या मर्त्य मानवाकडे सुहास्यवदनाने बघणारी ही निसर्गदेवता आता कोपत चालली आहे. कारण, निसर्ग आता ऐकण्याच्या परिस्थिती नाहीये.मायेनं या निसर्गानं स्वतवर होणारे अत्याचार कित्येक वष्रे झेलली आहेत. कुंभाराच्या भट्टीतली राख धगधगती असली तरी वरून शांत दिसते तशी अवस्था आपल्या धरणीमातेची झालेली आहे. ही धरणी आतनं खदखदतेय. सहन करण्यापलीकडे परिस्थिती गेली की, मग तो तप्त लाव्हा ज्वालामुखीच्या तोंडातनं बाहेर निसटून मन शांत करायचा प्रयत्न करेन. वन्यप्राण्यांची आश्रयस्थानं असलेली जंगलं माणसाच्या अतिक्रमणामुळे आपलं अस्तित्त्व टिकवायलाच झगडत आहेत. जंगलातल्या माणसाच्या घुसखोरीमुळे, अवैध शिकारीमुळे, वृक्षतोडीमुळे खाद्याची कमतरता जाणवू लागले आहे. जंगल कटाई, बांबू चोरी, अवैध शिकार यामुळे तृणभक्षी प्राण्यांची संख्या कमी होत चालली आहे आणि त्यांनी शेतजमिनीकडे, शहराकडे वळायला सुरुवात केली आहे. थोडक्यात, म्हणजे आपलं निवासस्थान धोक्यात आल्यामुळे वन्यप्राणी शहराकडे वळत आहेत, तर मांसभक्षी प्राण्यांवर उपासमारीची वेळ आल्यामुळे त्यांनी आपला मोर्चा जंगलालगतच्या गावांकडे वळवला आहे. मग कधी कोंबडी पळव तर कधी कोणाची बकरी पळव, अन्नाची खूपच चणचण जाणवली तर गाय, म्हशींवर  आणि वेळ पडली तर माणसावरदेखील हल्ला करून भूक भागवायची.
पाळीव प्राण्यांवरच्या वाढत्या हल्ल्याच्या घटनांनी मग गावकरीदेखील मेलेल्या जनावरावर विषप्रयोग करून बदला घेतात. एखाद वेळी प्राणी चुकून गावात भरकटला तर त्याला काठय़ांनी, दगडांनी ठेचून मारायचे आणि मग छाती फुलवून एखाद्या वीराने रणांगण गाजवल्यावर मिरवावे तसे गावकऱ्यांसमोर  आणि प्रसारमाध्यमांसमोर स्वतला मिरवावे आणि लोकांनी त्याचा उदो उदो करावा, हे चित्र आता सगळीकडे दिसायला लागलं आहे. मुंबईच्या आसपास बिबटय़ांचा मानवी वस्तींमध्ये होणारा वावर वाढत चालला आहे. जुन्नर, संगमनेर या भागात बिबटय़ाच्या वाढलेल्या संख्येने लोकांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे. निसर्ग आणि मानव या दोघांमधील सौहाद्र्र नष्ट होत चालले आहे. मग पकडल्या गेलेल्या बिबटय़ावर िपजऱ्यात रॉकेल टाकून कुठे जाळपोळीची घटना घडते, तर कुठे लोकांनी त्याला काठय़ांनी बदडून मारून टाकल्याची घटना घडते.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातल्या अस्वलांचे माणसांवरील हल्ले वाढत चालले आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या आसपासच्या परिसतरात वाघांनी धुमाकूळ घातला आहे. कधी कोणाचं जनावर मारलं जातंय, तर कधी एखादं लहान मुल पळवलं जातंय. संरक्षित क्षेत्र आणि जंगलाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा संयम ढळत चालला आहे. मनात पहिला विचार येतो, या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण? माणूसच, पण आपल्यासमोर चित्र उभं राहतं ते वेगळंच. आपल्याला आरोपीच्या िपजऱ्यात उभे दिसतात ते वन्यप्राणी आणि खरं तर हे चित्र जाणूनबुजून आपल्यासमोर तयार करण्यात आलेलं आहे. देशभरात खाणीचं साम्राज्य वाढत चाललं आहे. खाणमालकांना त्यांच्या व्यवसायात वन्यप्राणी आणि त्यांचा नसíगक अधिवास हे मुख्य अडथळे ठरत आहेत. शेती करण्याच्या पारंपारिक पद्धतीमध्येदेखील आमुलाग्र बदल घडून येत आहेत. आधुनिक शेतकरी आपल्या नफ्यात वन्यप्राण्यांना वाटेकरी ठेवायला तयार नाही. त्यांनाही वन्यप्राण्यांची ब्याद सोबत नको आहे. राजकारण्यांना तर जिकडे फायदा आणि मतं आहेत तिकडे वळण्याची सवय असल्याने वन्यप्राणी आता दाद मागणार तरी कुठे? एख़ाद्या सांजळलेल्या वेळी मन अस्वस्थ होतं. आपल्याकडनं काय करता येईल हे प्रथम बघितलं तरी मग उत्तर सापडल्यासारखं वाटतं.
मोबाईलच्या टॉवरमुळे चिमण्यांची संख्या कमी झाल्यासारखी वाटतेय ना? मग जरा उरल्यासुरल्या चिमण्यांसाठी पाव किलो बाजरी रोज घराच्या अंगणात टाकली तर काय बिघडतंय? शेती आधुनिक पद्धतीनुसार करायची आहे ना? मग त्याला नसíगकतेची जोड दिली तर काय बिघडतंय? शेतातल्या झाडांवर पक्ष्यांसाठी घरटी बांधून त्यांना राहण्याची जागा दिली तर काय होतंय? धरणं बांधायचीच आहेत तर लहान धरणं बांधून अधिकाधिक भाग सुजलाम् सुफलाम् केला तर काय बिघडतंय? अनेक प्रश्न आहेत, परंतु जितक्या समस्या आहेत तितकीच उत्तरंदेखील आहेत. प्रश्न आहे आपल्याला समस्या कळली आहे का? आणि यावर विचार करायची आपली तयारी आहे का?

पाळीव प्राण्यांवरच्या वाढत्या हल्ल्याच्या घटनांनी मग गावकरीदेखील मेलेल्या जनावरावर विषप्रयोग करून बदला घेतात. एखाद वेळी प्राणी चुकून गावात भरकटला तर त्याला काठय़ांनी, दगडांनी ठेचून मारायचे आणि मग छाती फुलवून एखाद्या वीराने रणांगण गाजवल्यावर मिरवावे तसे गावकऱ्यांसमोर  आणि प्रसारमाध्यमांसमोर स्वतला मिरवावे आणि लोकांनी त्याचा उदो उदो करावा, हे चित्र आता सगळीकडे दिसायला लागलं आहे. मुंबईच्या आसपास बिबटय़ांचा मानवी वस्तींमध्ये होणारा वावर वाढत चालला आहे. जुन्नर, संगमनेर या भागात बिबटय़ाच्या वाढलेल्या संख्येने लोकांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो