चित्ररंग : हलकीफुलकी रुचकर पाककृती
मुखपृष्ठ >> रविवार वृत्तान्त >> चित्ररंग : हलकीफुलकी रुचकर पाककृती
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

चित्ररंग : हलकीफुलकी रुचकर पाककृती Bookmark and Share Print E-mail

सुनील नांदगावकर

चित्रपटाच्या नावावरून चिकनबद्दलच सारे काही असणार अशी अटकळ बांधून चित्रपटगृहात गेलात तर हिरमोड होण्याची शक्यता आहे. चिकनच्या पाककृतीविषयी चित्रपटात बरेच काही असले तरी त्यापलिकडे बरेच काही प्रेक्षकाला गवसते. ढोबळ मानाने विनोदपट असला तरी एका सर्वसामान्य तद्दन पंजाबी कुटुंबातील नातेसंबंध, त्यातला संघर्ष, त्यांच्यावर आलेले प्रसंग, त्यातून घडणारा विनोद मांडत, नकळतपणे भाष्य करीत दिग्दर्शक चित्रपटाची पाककृती एकदम चवदार करतो हे नक्की. हे ‘चिकन..’ फक्कड जमले नसले तरी रूचकर नक्कीच आहे.
ओमी खुराना (कुणाल कपूर) हा आपल्या आजोबांना दारजी (विनोद नागपाल) यांना फसवून, त्यांच्याकडचे पैसे लुटून लंडनला निघून जातो. तिथे लबाडी करून जगण्याचा प्रयत्न करतो. अखेरीस एका गुंडाकडून घेतलेले पैसे परत देता येत नाहीत म्हणून त्याला दहा-बारा वर्षांनी नाईलाजास्तव पंजाबमधल्या आपल्या खेडय़ात परतावे लागते. आजोबांकडचे पैसे घेऊन गुंडाचे देणे परत करायचे आणि पुन्हा लंडनला परतायचे असे ओमी ठरवतो. एकदम दहा-बारा वर्षांनी घरी परतल्यामुळे घरचे लोक काय म्हणतील, आपल्याला स्वीकारतील की नाही अशी भीती त्याला आहे.
आई-वडील लवकर निधन पावल्यामुळे दारजी आणि ओमीचे काका आणि काकू हेच ओमीचा सांभाळ करतात. ओमीचा चुलत भाऊ जीत (राहुल बग्गा) आणि काका-काकू आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दारजी आजोबा आपले स्वागत कसे करतील या विवंचनेत ओमी गावी पोहोचतो. आईसारखे प्रेम करणारी काकू आणि चुलतभाऊ जीत हे दोघेही ओमीला पाहून आनंदून जातात. ज्या दारजींकडून पैसे घेऊन गुंडाला परत द्यायचे अशा इराद्याने ओमी घरी येतो खरा पण त्या दारजींना मात्र विस्मरणाचा आजार झालाय.
ते कुणालाच ओळखत नाहीत. दारजींची ओळख ‘चिकन खुराना’ या पाककृतीसाठी पंचक्रोशीत असते. त्यांच्या खुराना ढाब्यावर ‘चिकन खुराना’ खाण्यासाठी खव्वयेमंडळी आवर्जून जात. परंतु, आता दारजींच्या आजारपणानंतर तो ढाबा बंद करावा लागलाय. ओमीच्या काकाला ‘चिकन खुराना’ची पाककृती माहीत नसल्यामुळे ढाबा बंद पडतो हे वास्तव ओमीला घरी परतल्यानंतर समजते. मग तो गुंडाचे पैसे देण्यासाठी ‘चिकन खुराना’ची पाककृती बनवून ढाबा पुन्हा सुरू करतो किंवा नाही यावर चित्रपट बेतलेला आहे.
लंडनला पळून जाण्यापूर्वी हरमन (हुमा कुरेशी) हिच्याशी ओमीचे प्रेम जुळलेले असते. परंतु, आता तो परततो तेव्हा हरमनचे लग्न ओमीचा भाऊ जीतशी होणार हे त्याला समजते. हरमन या लग्नाबाबत फारशी खुश नाही. एका पंजाबी कुटुंबाची सरळसाधी गोष्ट असे चित्रपट पाहतानाही वाटते. जीतचा मामा टिटू मामा (राजेश शर्मा) या व्यक्तिरेखेने चित्रपटात धमाल केली आहे. बावळट आणि वेडा असल्याचा बहाणा करून टिटू मामा आपल्या बहिणीकडे कायमचा राहतो. बिनकामाचे फक्त जेवणे, खाणे, रेडिओ ऐकणे आणि मजेत राहणे एवढेच ठाऊक असलेला टिटू मामा हा ओमीचा मित्र बनतो.
आपण लंडनमध्ये वकिली करीत असल्याची थाप ओमी मारतो पण टिटू मामाला मात्र हे पटत नाही. खुराना घरातले वातावरण, सुखवस्तु नसले तरी खाऊन पिऊन सुखी असलेल्या या कुटूंबात ओमी सुरुवातीला रमत नाही. पैसे चोरून गुंडाला द्यायचे आणि लंडनला परतायचे हा एकच त्याचा इरादा आहे. पण दारजी अचानक वारल्यानंतर ओमीला समजते की दारजींनी ढाबा आपल्या नावावर केलाय. मग ढाबा पुन्हा सुरू करून गुंडाचे पैसे फेडायचे असे तो ठरवितो. फारसा जीव नसलेले कथानक असले तरी दिग्दर्शकाने पडद्यावर ही गोष्ट मांडताना छोटय़ा-छोटय़ा बारकाव्यांतून प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात यश मिळविले आहे. एका तासात सांगता येईल अशी गोष्ट सव्वा दोन तास सांगण्याचा प्रयत्न केल्यामुळे चित्रपट काहीसा कंटाळवाणा होतो. पण टिटू मामा, त्याच्या गमती, दारजींच्या अभिनयातून निर्माण होणारा विनोद, ओमी-हरमन यांच्यात फुलणारे प्रेमाचे नाते यामुळे चित्रपट रंजक ठरतो, प्रासंगिक विनोदांमुळे प्रेक्षकाची हसवणूक करतो.
दिग्दर्शकाने चित्रपटात ‘बॉलीवूडी मेलोड्रामा’ फाम्र्युला फारसा वापरलेला नाही. त्यामुळे चित्रपट भडक न होता, अगदी सहजपणे प्रेक्षकाचे रंजन करतो.
लव शव ते चिकन खुराना
निर्माते - अनुराग कश्यप, रॉनी स्क्रूवाला, सिद्धार्थ रॉय कपूर
दिग्दर्शक - समीर शर्मा, लेखक - समीर शर्मा, सुमीत बाठेजा
छायालेखक - मितेश मिरचंदानी, संगीत - अमित त्रिवेदी
कलावंत - कुणाल कपूर, हुमा कुरेशी, राजेश शर्मा, डॉली अहलुवालिया, विपिन शर्मा, विनोद  नागपाल, राहुल बग्गा, राजेंद्र सेठी, मुनीष माखिजा, अनंग्शा बिस्वास, सीमा कौशल व अन्य.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो