गणिताच्या आकाशातला तेजस्वी मराठी तारा निखळला
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> गणिताच्या आकाशातला तेजस्वी मराठी तारा निखळला
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

गणिताच्या आकाशातला तेजस्वी मराठी तारा निखळला Bookmark and Share Print E-mail

मंगला नारळीकर
१९७४-७५चे वर्ष असावे. प्रसिद्ध गणिती श्रीराम अभ्यंकर सहकुटुंब मुंबईत टाटा मूलभूत संस्थेत (T.I.F.R.) काही दिवसांसाठी आले होते. आम्ही दोघे मुलींना घेऊन १९७२ मध्ये भारतात स्थायिक होण्यास आलो व  T.I.F.R.  मध्ये स्थिरावलो होतो. लवकरच आमची ओळख झाली. १०० सदनिकांची भास्कर नावाची मोठी इमारत त्या वेळी तिथे होती. लहान मुलांची संख्या भरपूर, त्यामुळे प्रत्येक वयोगटाच्या मुलांना खेळायला सवंगडी अनेक होते. अभ्यंकर पती-पत्नी एका संध्याकाळी ओळख करून घ्यायला मुलांना घेऊन आले. त्यांचा हरी गीताच्या बरोबरीचा, तर काशी गिरिजापेक्षा थोडी लहान. आम्ही आमच्या मुलींना संध्याकाळी संस्कृत श्लोक म्हणायला शिकवतो हे समजताच श्रीराम उत्साहाने, ‘‘चला परवचा म्हणू या’’ असं म्हणून रुंद कोचावर चक्क मांडी घालून बसले व त्यांनी मुलींच्या ‘शुभंकरोति’मध्ये सूर मिळवला. मग काही श्लोक सगळ्यांनी मिळून म्हटले, मुलींनी शंकराचार्याचे महागणेशपंचरत्न स्तोत्र तर त्यांना न येणारी भीमरूपी महारुद्रासारखी स्तोत्रं फक्त श्रीराम स्पष्ट आवाजात म्हणत होते. श्लोकपठणात असे उत्साहाने भाग घेणारे काका मुलींनी प्रथमच पाहिले. श्रीरामांच्या पत्नीशी, उषाशी (पहिले नाव इवॉन) ओळख झाली. त्या मूळच्या जर्मन अमेरिकन असून मराठी लिहिणे-वाचणे शिकल्या आहेत, मराठीत बऱ्यापकी संभाषण करतात हे पाहून सकौतुक आश्चर्य वाटले. मराठी भाषेचा, भारतीय संस्कृतीचा श्रीरामना वाटणारा अभिमान व प्रेम उघड होतं. मुलांची नावंदेखील जरा जुन्या काळातील निवडणारे, त्यांना मराठीतून काही वष्रे तरी शिक्षण मिळावे, म्हणून मुद्दाम पुण्यात काही काळ राहण्याचा बेत करणारे हे प्रसिद्ध गणिती विरळाच होते. मी ७-८ वर्षांचा खंड पडल्यावर पुन्हा गणिताचा अभ्यास चालू करायच्या प्रयत्नात होते. श्रीरामांची व्याख्याने ऐकायला जात होते. बीजगणितातील स्वत:च्या विषयावर अधिकार, श्रोत्यांना समजेल अशी स्पष्ट मांडणी, त्यांनी प्रश्न विचारण्यास पूर्ण मुभा, यामुळे त्यांच्या व्याख्यानांना बरेच लोक येत. उत्तम संशोधक हा उत्तम व्याख्याता असतोच असं नाही. मात्र श्रीरामांच्या जवळ दोन्ही गुण होते. ळ.क.ा.फ. मधील गणित विभागात अमराठी लोक प्रामुख्याने होते. त्यांना श्रीरामांचा मराठीचा अभिमान व पत्नी व मुलांना चांगलं मराठी आलं पाहिजे हा त्यांचा प्रयत्न जरा अतिरेकी वाटत असे. वीस-पंचवीस वष्रे महाराष्ट्रात राहूनही मराठी न येणाऱ्या लोकांना अमेरिकेत राहणाऱ्या प्राध्यापकांचा हा हट्ट कसा समजणार?
उषाताईंच्या मराठीच्या उच्चारांमुळे माझा एक गोंधळ उडाला, त्याची गंमत सांगते. एकदा त्या म्हणाल्या की, त्यांना अचानक पुण्याला जाणे आवश्यक होते. मी कारण विचारले तर त्या म्हणाल्या, ‘‘रामच्या आयचे ऑपरेशन पुण्यात आहे. अचानक ठरले आहे.’’ मी समजले की श्रीरामांच्या डोळ्याचे ऑपरेशन असावे. मी विचारले, ‘‘त्यांना डोळ्याचा त्रास आहे का?’’ तर त्या म्हणाल्या, ‘‘नाय, त्याच्या आयच्या पोटाचे ऑपरेशन आहे.’’
   पुढे पुण्यात आल्यावर एरंडवनातील त्यांच्या घरी जाऊन भेटण्याचा, त्यांनाही आयुकात बोलावण्याचा योग आला. आम्ही दोघे हरीच्या विवाह प्रसंगास उपस्थित होतो.
   काही वर्षांपूर्वी आमची धाकटी कन्या लीलावती सांगत होती. ती तेव्हा डय़ूक युनिव्हर्सटिीमध्ये अभ्यास करत होती. कल्ल३ी१ल्ली३ वरून लीलावती नारळीकर हे तिचं नाव व फोन नंबर घेऊन श्रीरामांनी तिला ऑफिसमध्ये फोन केला. त्या वेळी नेमके आम्ही तिच्या घरी होतो. फोनवरून ते तिची चौकशी करत होते. ती जयंत नारळीकरांची मुलगी आहे ना, तिचे आई-बाबा कसे आहेत, इत्यादी. स्वत:चे नाव त्यानी ‘अभ्यंकर’ सांगितले ते ऐकून तिला वाटले की, ती आमचे लंडनचे मित्र मधू अभ्यंकर यांच्याशी बोलते आहे. मधू मुलींशी थट्टामस्करी करत असे, त्यामुळे त्याच्या उगीच चांभारचौकशा चालल्या आहेत असे वाटून ती रागाने ‘‘होऽऽऽय! मी लीलावतीच आहे.
आई-बाबा आहेत घरी. त्यांच्याशी बोल.’’ असं म्हणाली. श्रीरामांनी त्यांचा फोन नंबर देऊन आम्ही फोन करावा असं सुचवलं तेव्हा तिच्या लक्षात आलं की, ती वेगळ्याच अभ्यंकरांशी बोलते आहे. तिने घरी आल्यावर ही कहाणी सांगितली. मी श्रीरामांना फोन लावून, ‘‘तिच्या उद्धटपणासाठी क्षमा करा, तिची गरसमजूत झाली होती,’’ असं सांगायचा प्रयत्न केला तर ते म्हणाले, ‘‘अहो कित्येक वर्षांनी असा रागाचा का होईना, स्पष्ट ‘होऽऽऽय’ ऐकला आणि खूप बरं वाटलं.’’ आमचं टेन्शन केव्हाच पळालं. त्यानंतर त्यांच्या पुण्याच्या घरात भेट झाली होती. उषाताई आजारातून सावरत होत्या. यावर्षी डिसेंबरमध्ये दोघेजण पुन्हा येणार असं समजलं होतं, पण त्या आधीच श्रीरामांचा मृत्यू झाल्याची बातमी आली. गणिताच्या आकाशातला तेजस्वी मराठी तारा निखळला.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो