रुपांतरण : ऑफिस पार्टी संकेत वागण्याचे!
मुखपृष्ठ >> लेख >> रुपांतरण : ऑफिस पार्टी संकेत वागण्याचे!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रुपांतरण : ऑफिस पार्टी संकेत वागण्याचे! Bookmark and Share Print E-mail

गौरी खेर,सोमवार,५ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

दि वाळीची चाहूल लागताच उत्साहाचे वातावरण पसरायला वेळ नाही लागत. आणि मग साहजिकच हा उत्साह आपल्या ऑफिसच्या वातावरणातही रेंगाळतो. अनेक कंपन्यांमध्ये सणासुदीच्या वेळी ऑफिस सजवायची प्रथा असते आणि वर्षांतून एकदातरी सर्वानी एकत्र येऊन मौजमजा करावी म्हणून ऑफिस पार्टीही असते. अर्थात, सणाच्या व्यतिरिक्तही पार्टी करण्याची अनेक निमित्ते असू शकतात म्हणा! उदा. पुरस्कारांचे वितरण, कंपनीला १०, २०, २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पार्टी इ..
नोकरीवर नव्याने रुजू झालेल्यांना ऑफिस पार्टीचे अप्रूप वाटणे साहजिकच आहे. या पार्टीबद्दल सर्वाच्याच मनात उत्सुकताही असते. ज्यांना पार्टी कल्चरची सवय नसते, त्यांच्या मनात या पार्टीच्या निमित्ताने अनेक प्रश्नही निर्माण होऊ शकतात. पार्टीला जाण्याआधी कुठल्या गोष्टी माहीत असाव्यात, हे आपण पाहू या-  
ग् पेहराव - आमंत्रणावर बऱ्याचदा ‘ड्रेस कोड’ लिहिलेला असतो. दिवाळी पार्टीला पारंपरिक पोशाख अगदी योग्य ठरतो, पण जिथे ‘इन्फॉर्मल’ असेल तिथे काय घालून जावे? अशावेळी हे ध्यानात ठेवायला हवे की इन्फॉर्मल  असले तरीही ऑफिसची पार्टी असून, आपण मित्र-मत्रिणींबरोबरच्या पार्टीला घालू तसे सगळ्याच तऱ्हेचे कपडे घालणे योग्य ठरणार नाही. असे अयोग्य पेहराव म्हणजे फाटक्या, कमरेखाली घरंगळणाऱ्या जीन्स, शॉर्ट टॉप्स, पारदर्शक अथवा तोकडे कपडे. फॉर्मल कपडय़ांचा ताठपणा कमी करणारे कपडे सर्वात उत्तम.
ग् जावे की न जावे? - काही जणांना पार्टी हा प्रकारच आवडत नाही किंवा सहकाऱ्यांबरोबर पार्टीच्या वातावरणात मिसळायला आवडत नाही. पण जर का वरिष्ठांनी ही पार्टी आयोजिली असली तर त्यांचा मान राखण्याकरिता अशा पाटर्य़ाना जरूर उपस्थित राहावे- निदान थोडय़ा वेळाकरिता तरी. याच अनुषंगाने पारितोषिक वितरण समारंभ, निवृत्तीनिमित्त होणाऱ्या समारंभांनाही उपस्थित राहावे. अशा छोटय़ा गोष्टींतूनही आपल्या सहकाऱ्यांसोबतचे संबंध सुधारतात.
ग् आमंत्रणात लिहिले असले तरच सोबत मित्र-मत्रीण, अथवा घरच्या मंडळींना घेऊन जावे - नसेल तर एकटय़ाने उपस्थित राहणे उत्तम.
ग् वरिष्ठांनी सुरुवात केल्याशिवाय किंवा त्यांनी आग्रह केल्याशिवाय जेवायला सुरुवात करू नये.
ग् ज्या समारंभात मद्यपानाची सोय केली जाते, तिथे सतर्कता बाळगण्यात शहाणपण आहे. फुकट मिळते म्हणून बेलगाम पिणाऱ्या अनेकांचा स्वत:वर ताबा राहत नाही. जीभ सल झाली की नको त्या व्यक्तीसमोर नको ते बोलले जाते, नाहीतर भान हरपून सोफ्यावर लोळण घेतली जाते. अशा वर्तनाचे परिणाम नंतर वरिष्ठांच्या टोमण्यातून, सहकाऱ्यांच्या टीकात्मक शेऱ्यांतून नाहीतर कनिष्ठांच्या चेष्टेतून भोगावे लागतात. मदिरा सेवन न करणाऱ्यांना इतरांच्या आग्रहाचा त्रास / चेष्टा सोसावी लागते. म्हणूनच अपेयपान केल्यानंतर  ज्यांचे पाय लटपटतात, त्यांनी फळांचा रस घेणं इष्ट.
ग् कर्मचाऱ्यांसाठी आयोजिलेल्या पारिवारिक स्नेहसंमेलनात काही गोष्टी लक्षात ठेवाव्या : सजावटीसाठी लावलेली फुले किंवा फुगे तोडू नये. मुलांनी त्यासाठी कितीही हट्ट केला तरी. समारंभाच्या खोलीत लहान मुलांना बेलगाम पळायला परवानगी देऊ नये, त्यांच्या खाण्या-पिण्यावरही लक्ष असलेले बरे. आपल्या अर्धागिनीने इतरांच्या अर्धागिनीबरोबर ‘ऑफिस गॉसिप’ करू नये, हे आधीच सांगितलेले बरे.
ग् काय बोलावे? : कामाव्यतिरिक्त इतरांशी बोलताना काही जणांना अवघडल्यासारखे होते. एका कोपऱ्यात बसून राहण्यापेक्षा, मोठय़ा संधीचा फायदा घेऊन, जुजबी विषयांवर बोलायला सुरुवात होऊ शकते. ‘नो शॉप टॉक’ हा पार्टीचा नियम असतो तेव्हा आपले संभाषणचातुर्य असे दर्शवता येते.
ग् कोणाशी बोलावे? : शक्यतो सर्वाशी. इतर डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांबरोबर मिसळायला ही एक उत्तम संधी असते. आपण स्वत:हून ओळख करून घ्यावी. अशा वेळी झालेली ओळख पुढे आपल्याच कामी येऊ शकते.
ग् निरोप घ्यायला विसरू नये : ऑफिसचे जवळजवळ सर्व समारंभ हे वरिष्ठांच्या संमतीने होतात. काही हौशी वरिष्ठ पुढाकार घेऊन त्याचे नियोजन करतात. असे असते तेव्हा निघायच्या वेळी वरिष्ठांचा निरोप घेऊन, त्यांचे आभार मानूनच निघावे.
ऑफिस पार्टी ही नात्यांच्या बांधणीची अमूल्य संधी असते. त्याचे सोने कसे करावे, हे आपल्याच हातात असते आणि आपल्याला जर ते मौजमजा करताना जमले तर खूपच छान!

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो