रामलीला मैदानावर एफडीआय रॅलीचा धुरळा
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> रामलीला मैदानावर एफडीआय रॅलीचा धुरळा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

रामलीला मैदानावर एफडीआय रॅलीचा धुरळा Bookmark and Share Print E-mail

आमच्याकडे बोटे दाखवणारा भाजप भ्रष्टाचारात आकंठ बुडालेला- सोनिया गांधी
थेट परकी गुंतवणुकीच्या निर्णयावर विरोधकांकडून लोकांची दिशाभूल- पंतप्रधान
नवी दिल्ली, ४ नोव्हेंबर/पीटीआय
alt

भ्रष्टाचाराच्या आरोपांनी प्रतिमा डागाळलेल्या काँग्रेसने आज विरोधकांवर विशेषत भाजपवर हल्लाबोल केले. भाजप हा भ्रष्टाचारात गळय़ापर्यंत बुडालेला पक्ष आहे अशी टीका या वेळी काँग्रेस नेत्यांनी केली. किरकोळ क्षेत्रातील थेट परकी गुंतवणुकीवर यूपीए सरकार अजिबात मागे हटणार नाही, अशा शब्दांत काँग्रेसने आर्थिक सुधारणांवर ठाम असल्याचे संकेत दिले आहेत.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग व राहुल गांधी यांनी आज रामलीला मैदानावर झालेल्या एफडीआय रॅलीचा फायदा घेऊन आर्थिक सुधारणांवर मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री व इतर नेते या वेळी उपस्थित होते. इंधन दरवाढीच्या मुद्दय़ावर विरोधकांनी कितीही आकांडतांडव केले तरी मागे हटणार नसल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
थेट परकी गुंतवणुकीच्या मुद्दय़ावर फेरविचार होणार असल्याचे गैरसमज दूर करताना सोनिया गांधी म्हणाल्या, की देशाला गुंतवणुकीच्या मोठय़ा मात्रेची गरज आहे त्याचाच थेट परकी गुंतवणूक म्हणजे एफडीआय हा एक भाग आहे. या गुंतवणुकीमुळे रोजगार व विकास दोन्ही वाढणार आहे.
जगामध्ये आर्थिक पेचप्रसंग असताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ज्या पद्धतीने नेतृत्व केले त्याची प्रशंसा करताना सोनिया गांधी म्हणाल्या, की इतर अनेक देशांपेक्षा भारताने चांगली कामगिरी केली आहे. प्रत्येक वर्षी नोकरीसाठी येणाऱ्या ८० ते १०० लाख युवकांना सरकारला नोकऱ्या द्याव्या लागणार आहेत.
अनेक घोटाळय़ांबाबत काँग्रेसवर जी टीका झाली त्याचा समाचार घेताना सोनिया यांनी सांगितले, की भ्रष्टाचार हा कर्करोग आहे. तो गरिबांना पोखरतो आहे, जो कुणी दोषी ठरेल त्याची गय केली जाणार नाही.
भाजपवर छुपा हल्ला चढवताना सोनिया गांधी म्हणाल्या, की जे काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत तेच भ्रष्टाचारात गळय़ापर्यंत बुडालेले आहेत. जे लोक दुसऱ्यासाठी खड्डे खणायला जातात, त्यांच्यासाठी खड्डे तयार आहेत, असे त्यांनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भात सांगितले.
माहिती अधिकार कायदा करून कारभारात पारदर्शकता आणण्याचे श्रेय हे काँग्रेसचे आहे. आमच्यासारखे जे लोक भ्रष्टाचार नष्ट करू पाहतात तेच असे कायदे आणू शकतात. आम्ही लोकपाल विधेयक मांडले, पण भाजपने ते राज्यसभेत अडवले, असेही त्या म्हणाल्या.
आमचा सद्सदविवेक स्वच्छ आहे, आमची उद्दिष्टे स्पष्ट आहेत, त्यामुळे काँग्रेसला बचावात्मक पवित्रा घेण्याची काही गरज नाही. उलट विरोधी पक्ष हे लोकशाहीचा पायाच खिळखिळा करायला निघाले आहेत असे सांगून त्या म्हणाल्या, की दोनदा सत्तेवर आलेल्या आमच्या सरकारवर सतत आरोप करून या ना त्या मार्गाने लोकशाहीच कमकुवत करण्याचा विरोधी पक्षांचा डाव आहे. ते सतत संसदेतील कामकाजात अडथळे आणीत आहेत. का? उत्तर सरळ आहे, या लोकांना जनतेच्या कल्याणाचे कायदे संमत व्हायला नको आहेत व त्यांना देशासाठी महत्त्वाच्या बाबींवर चर्चाही नको आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, की पुढचा मागचा विचार न करता विरोधक सरकारने घेतलेल्या निर्णयांवर टीका करीत आहेत. किरकोळ विक्री क्षेत्रातील गुंतवणुकीने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. जेव्हा कारगिलची लढाई झाली तेव्हा आम्ही विरोधात होतो, पण आम्ही एनडीएला त्या वेळी पूर्ण पाठिंबा दिला होता. थेट परकी गुंतवणुकीचा विषय भाजपने पहिल्यांदा आणला, ते कमकुवत मनाचे आहेत आम्ही ठामपणे काम करतो म्हणून आम्ही थेट परकी गुंतवणुकीला परवानगी दिली. जो विषय त्यांनी पहिल्यांदा एनडीए काळात आणला त्यालाच ते आता संसदेत विरोध करीत आहेत.
आर्थिक सुधारणांची पाठराखण करताना राहुल गांधी यांनी सांगितले, की जर गरिबांचा विकास साधायचा असेल तर परकी गुंतवणूक गरजेची आहे. आर्थिक सुधारणा गरजेच्या आहेत. अलीकडेच आमच्या सरकारने काही निर्णय घेतले, पण त्यावर लोकांची दिशाभूल करण्यात आली. सर्व प्रकारच्या अफवा पसरवण्यात आल्या.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विरोधक यूपीए सरकारच्या निर्णयांवर गैरप्रचार करीत असल्याचा आरोप केला. समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी काँग्रेस व सरकार कटिबद्ध आहे. पण हा प्रवास करण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. देशहितासाठी धोरणात बदल करावे लागत असतील तर ते आम्ही निश्चित करणार असे त्यांनी स्पष्ट केले. बहुउत्पादनी किरकोळ विक्री क्षेत्रात परकी गुंतवणूक आणल्याने शेतकऱ्यांना फटका बसेल हा आरोप खोटा आहे. आम्ही समाजात बदल घडवू इच्छितो. त्यासाठी आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतील. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत आठ कोटी लोकांना फायदा झाला आहे. माध्यान्ह आहार योजनेत दोन कोटी मुलांना फायदा झाला आहे. भरभराट व संपन्नता ही सामान्य माणसापर्यंत पोहोचली पाहिजे. नोकऱ्या हव्या असतील तर आर्थिक सुधारणांची गरज आहे. सरकारच्या निर्णयावर लोकांची दिशाभूल केली जात आहे. आम्ही गेल्या आठ वर्षांत बरेच काम केले आहे. थेट परकी गुंतवणूक ही शेतकऱ्यांच्या हिताची आहे असे काँग्रेस व सरकारला वाटते. सर्वानाच त्याचा फायदा होईल. शेतकऱ्यांना त्यांच्या मालास योग्य भाव मिळेल, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. थेट परकी गुंतवणुकीमुळे शेतकऱ्यांना फटका बसेल असे सांगून विरोधक लोकांची दिशाभूल करीत आहेत.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो