विशेष : राष्ट्रपती भवनात १११ व्यंगचित्रकार!
मुखपृष्ठ >> लेख >> विशेष : राष्ट्रपती भवनात १११ व्यंगचित्रकार!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

विशेष : राष्ट्रपती भवनात १११ व्यंगचित्रकार! Bookmark and Share Print E-mail

प्रशांत कुलकर्णी, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

राष्ट्रपती भवनात १११ व्यंगचित्रकार प्रथमच जमले होते आणि आदरांजलीपासून निषेधापर्यंतचे सर्व रंग या भेटीत होते. त्याचा हा वृत्तान्त..
या  वर्षभरात व्यंगचित्रं आणि व्यंगचित्रकार अत्यंत चुकीच्या कारणांसाठी गाजत होते. कुणाच्या तरी व्यंगचित्रांवर मुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेतला. कुठल्या ५०-६० वर्षांपूर्वीच्या व्यंगचित्रांवरून कुणी तरी संपूर्ण देशाचा अमूल्य वेळ वाया घालवला व व्यंगचित्र आक्षेपार्ह ठरवून ती नकोतच अशी भूमिका घेतली, तर कुठल्या तरी व्यंगचित्रकाराला डायरेक्ट तुरुंगातच टाकलं!!

या साऱ्या अत्यंत अप्रस्तुत अशा घटनांमुळे देशभरातील व्यंगचित्रकारांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता पसरली होती. या साऱ्या अस्वस्थतेला गेल्या सोमवारी पूर्णविराम मिळाला.
सोमवार, २९ ऑक्टोबर हा दिवस भारतीय व्यंगचित्रकलेच्या इतिहासातीलच नव्हे, तर राष्ट्रपती भवनाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस मानला पाहिजे. राष्ट्रपती भवनात यापूर्वी एखाद्या समारंभासाठी इतक्या मोठय़ा संख्येने देशभरातील व्यंगचित्रकार कधीही जमले नव्हते. खुद्द राष्ट्रपती भवनात देशभरातील व्यंगचित्रकारांच्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन यापूर्वी कधीही भरलं नव्हतं. खुद्द राष्ट्रपतींवर देशभरातील १११ व्यंगचित्रकारांनी एकाच वेळी अशी व्यंगचित्रं यापूर्वी कधीच काढली नव्हती!
या साऱ्या घटनांमागे मुख्य भूमिका निभावली ती ‘केरळ कार्टून अकादमी’ या केरळमधील व्यंगचित्रकारांच्या संस्थेने. अत्यंत उत्साही आणि कल्पक व्यंगचित्रकारांची ही संस्था सतत निरनिराळे उपक्रम राबवत असते आणि मुख्य म्हणजे त्यांच्या या उपक्रमांना केरळ सरकारही सढळ हस्ते पाठिंबा देत असते.
केरळमधील ज्येष्ठ व्यंगचित्रकार कुट्टी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन अकादमीने केलं. कुट्टी यांना बंगाली भाषा येत नसतानाही ते अनेक वर्षे बंगाली वृत्तपत्रांतून काम करत राहिले आणि ते बंगाली भाषकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरले. विद्यमान राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याशीही त्यांचा स्नेह होता. हाच धागा पकडून कुट्टी यांना ‘ट्रिब्यूट’ म्हणून त्यांच्या निवडक व्यंगचित्रांचं प्रदर्शन राष्ट्रपती भवनात भरवायचं आणि त्याला जोडूनच देशभरातील निवडक व्यंगचित्रकारांनी काढलेल्या राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्यावरच्या अर्कचित्रांचं प्रदर्शन भरवायचं अशी जबरदस्त संकल्पना अकादमीने मांडली आणि ती प्रत्यक्षात आणून दाखवली.
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्यावरच्या या अर्कचित्रांचं एक कॉफीटेबल पुस्तक (कार्टून प्रणाम) राष्ट्रपतींना भेट देण्यात आलं. कुट्टी यांच्या निवडक व्यंगचित्रांचं आणि राष्ट्रपतींवरच्या १११ व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटनही राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. या प्रदर्शनात अक्षरश: काश्मीरपासून केरळपर्यंत, मणिपूरपासून गुजरातपर्यंतच्या व्यंगचित्रकारांनी भाग घेतला आणि भारतातील नव्या व्यंगचित्रकारांमध्ये असलेल्या जबरदस्त ताकदीची चुणूकही दाखवली. विद्यमान राष्ट्रपतींवर सहसा व्यंगचित्र काढू नये असा संकेत अनेक व्यंगचित्रकार पाळताना दिसतात, पण सुरुवातीला उल्लेखिलेल्या घटनांमुळे व्यंगचित्रकारांनी थोडं आक्रमक होऊन आपल्या कलेचं महत्त्व अधोरेखित केलं असं म्हणायला हरकत नाही.
महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रपती भवनातील या कार्यक्रमाला देशभरातून अंदाजे ५५ ते ६० व्यंगचित्रकार आवर्जून उपस्थित राहिले, हीसुद्धा एक अभूतपूर्व अशी घटना मानावी लागेल.
या प्रसंगी राष्ट्रपतींनी अत्यंत समयोचित असं भाषण केलं. या भाषणात त्यांनी लोकशाहीमध्ये असलेलं व्यंगचित्रांचं महत्त्व अधोरेखित केलं. सत्य आणि त्यावरचं भाष्य या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असं ते म्हणाले. त्याचबरोबर अनेक व्यंगचित्रकारांनी माझ्यावर वेळोवेळी काढलेली व्यंगचित्रं माझ्या संग्रहात आहेत हे त्यांनी आवर्जून सांगितलं. लंडनच्या ‘पंच’ मासिकाचे १८५० ते १९२० या दरम्यानचे दुर्मिळ ग्रंथ राष्ट्रपती भवनच्या ग्रंथालयात आहेत आणि त्यांचं जतन केलं जात आहे, असंही ते म्हणाले.
या संपूर्ण कार्यक्रमामध्ये केरळ सरकार मुख्यमंत्र्यांसह आनंदानं सहभागी झालं होतं. त्यांच्याच प्रयत्नाने व्यंगचित्रकार कुट्टी यांच्यावरची विशेष पुस्तिकाही या वेळी प्रकाशित करण्यात आली.
या कार्यक्रमामुळे देशभरातील व्यंगचित्रकारांमधील अस्वस्थता नक्कीच दूर झाली असेल. तसेच खुद्द राष्ट्रपतींनीच या कलेविषयी आत्मीयता दाखवल्याने या कलेविषयी भ्रम, भीती, आकस व अज्ञान बाळगणारे आता थोडं आत्मपरीक्षण करतील, ही अपेक्षा.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो