युवराज परतणार!
मुखपृष्ठ >> क्रीडा >> युवराज परतणार!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

युवराज परतणार! Bookmark and Share Print E-mail

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाची निवड आज
क्रीडा प्रतिनिधी

मुंबई
गतवर्षी इंग्लिश भूमीवरील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने ०-४ अशा फरकाने मानहानीकारक पराभव पत्करला होता. आता चार कसोटी सामन्यांची मालिका भारतीय भूमीवर आहे. त्यामुळे इंग्लंडच्या पराभवाचे उट्टे फेडण्याची चांगली संधी चालून आली आहे. १५ नोव्हेंबरपासून अहमदाबादला सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड सोमवारी जाहीर करण्यात येणार आहे. यात कर्करोगावर मात करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणाऱ्या युवराज सिंगचा सहाव्या क्रमांकासाठी समावेश जवळपास निश्चित मानला जात आहे. याचप्रमाणे फलंदाजांमध्ये मुरली विजय, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना आणि मनोज तिवारी यांच्यापैकी दोघांना संधी मिळू शकेल. वेगवान माऱ्यासाठी झहीर खानच्या साथीने उमेश यादवच्या नावाला निवड समितीची पसंती मिळू शकेल, तर अशोक दिंडाचाही १४ सदस्यीय भारतीय संघात समावेश होऊ शकेल.
माजी कसोटीपटू संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय क्रिकेट निवड समिती सोमवारी प्रथमच भारतीय संघाची निवड करताना त्यांच्यापुढे अनेक प्रश्न समोर असतील. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गेल्याच आठवडय़ात युवराजच्या तंदुरुस्तीबाबत केलेल्या वक्तव्यानंतरही निवड समिती त्याला कसोटी संघात स्थान नाकारेल, अशी लक्षणे दिसत नाही. वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर ही सलामीची जोडी भारताच्या डावाला खंबीरपणे सुरुवात करण्यात वारंवार अपयशी ठरत आहे. वेगवान गोलंदाज झहीर खानला त्याच्या दर्जाला साजेसे बळी मिळत नाही. या सर्व परिस्थितीत फिरकीला अनुकूल खेळपट्टय़ांवर आर. अश्विन आणि प्रग्यान ओझा याच फिरकी जोडगोळीच्या बळावर अहमदाबादचा किल्ला सर करण्याची योजना निवड समितीने आखल्यास त्यात आश्चर्यकारक असे काहीच नाही.
कर्करोगावरील उपचारानंतर युवराज सिंग श्रीलंकेमधील ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत समर्थपणे खेळला होता. त्यानंतर दुलीप करंडक क्रिकेट स्पध्रेत उत्तर विभगासाठी शानदार द्विशतक झळकावून दिर्घ पल्ल्याचे क्रिकेट खेळण्याचीही आपली क्षमता त्याने सिद्ध केली होती. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात युवराजने आपल्या अष्टपैलू खेळाची चुणूक दाखवली होती. फलंदाजीत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ५९ धावा याचप्रमाणे गोलंदाजीत पाच बळी घेणाऱ्या युवराजचा सहाव्या क्रमांकासाठी भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो. इंग्लंडचा महत्त्वाचा फलंदाज केव्हिन पीटरसन भारतीय मैदानांवर नेहमीच चांगल्या धावा काढतो. पण डावखुरा फिरकी गोलंदाज युवराजचा सामना करणे त्याला जड जाते. या पाश्र्वभूमीवर युवीला संघात घेणे क्रमप्राप्तच ठरते आहे. गेल्या वर्षी कोलकात्यामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध युवराज अखेरचा कसोटी सामना खेळला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय व्ही.व्ही.एस.लक्ष्मणने जाहीर केल्यानंतर त्याच्या जागी एस. बद्रीनाथचा संघात समावेश करण्यात आला होता. बद्रीनाथऐवजी युवराज संघात येऊ शकेल.
न्यूझीलंडविरुद्धच्या कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर राहुल द्रविड आणि व्ही.व्ही.एस.लक्ष्मण यांच्या अनुक्रमे तिसऱ्या आणि पाचव्या स्थानासाठी विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांचे स्थान नक्की असेल. सेहवाग-गंभीर जोडी सातत्याने अपयशी ठरत जरी असली तरी सध्या ती भारतातील सर्वोत्तम सलामीची जोडी असल्यामुळे त्यांना विश्रांती देऊन नवे पर्याय हाताळण्याचा निर्णय घेतला जाणार नाही. पण १४ सदस्यीय संघात मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे यांच्यापैकी एकाची राखीव सलामीवीर म्हणून तर सुरेश रैना किंवा मनोज तिवारी यांच्यापैकी मधल्या फळीतील राखीव खेळाडू म्हणून निवड होऊ शकते. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात भारत अ संघाकडून खेळताना रैनाला अनुक्रमे २० आणि नाबाद १९ धावा काढता आल्या होत्या. त्यामुळे रैनाला संघातील स्थान टिकविणे कठीण जाणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत रैनाने एक अर्धशतक झळकावले होते. पण बाकी दोन्ही डावांमध्ये तो अपयशी ठरला होता.
झहीर खानच्या साथीने वेगवान गोलंदाजीचा भार विदर्भाचा उमेश यादव वाहण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे बंगालचा अशोक दिंडा आणि इरफान पठाण यांच्यापैकी दींडाच्याच नावाला प्राधान्य मिळू शकेल.                                  

सेहवाग आणि झहीरबाबत साशंकता
सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि वेगवान गोलंदाज झहीर खान हे भारतीय संघाचे दोन महत्त्वाचे आधारस्तंभ. पण रविवारी रणजी क्रिकेट सामन्यांमधील या दोघांच्या दुखापतींच्या वृत्तांमुळे खळबळ माजली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पायाला दुखापत झाल्यामुळे २२व्या षटकातील पाचवा चेंडू टाकल्यानंतर झहीर मैदानाबाहेर गेला. त्यानंतर तो दिवसअखेपर्यंत मैदानावर आला नाही. दिवसभरातील झहीरच्या गोलंदाजीचे ११.५-३-२८-१ असे पृथक्करण होते. याबाबत मुंबईचा कर्णधार अजित आगरकरने सांगितले की, ‘‘झहीरच्या पायाला लचक भरल्यामुळे तो मैदानाबाहेर गेला. परंतु सोमवारी तो मैदानावर दिसेल.’’
उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात सेहवागच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे तो सलामीला फलंदाजीला उतरू शकला नाही. परंतु सहाव्या क्रमांकावर तो फलंदाजीला उतरला.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो