स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांचा 'आयक्यू' सारखा - गडकरी
|
|
|
|
|
भोपाळ, ५ नोव्हेंबर २०१२ स्वामी विवेकानंद आणि कुख्यात डाँन दाऊद इब्राहिम यांची बौध्दिक क्षमता (आयक्यू) सारखी आहे, पण विवेकानंद यांनी आपल्या बुद्धीचा वापर समाज आणि देशहितासाठी केला तर दाऊदने आपल्या बुद्धीचा वापर गुन्हेगारी जगतात केल्याचे खळबळजनक वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केले आहे.
"मानसशास्त्रानुसार आपण स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांच्या बौध्दिक क्षमतेची तुलना केली असता दोघांचा आयक्यू सारखा असला तरी विवेकानंद यांनी आपल्या बुद्धीचा वापर समाज आणि देशहितासाठी केला व दाऊदने गुन्हेगारी जगतात", असे गडकरी यांनी स्पष्ट केले मनुष्य आणि स्त्री यांच्यात जात, धर्म, भाषा आणि लिंग यावरून केला जाणारा भेदभाव योग्य नसून दोघांची तुलना त्यांच्या गुणांवरून करावी या विषयावर बोलत असताना गडकरी यांनी सदर उदाहरण दिले. राजकारण हे व्यक्तीकेंद्रीत क्षेत्र असून, त्यांनी साध्य केलेल्या ध्येयांबाबत ते कधीच समाधानी नसतात, असंही गडकरी म्हणाले. |