साखळीचोऱ्यांना प्रतिबंधक ‘उजवा मार्ग’
मुखपृष्ठ >> बातम्या >> साखळीचोऱ्यांना प्रतिबंधक ‘उजवा मार्ग’
 

मुंबई वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

साखळीचोऱ्यांना प्रतिबंधक ‘उजवा मार्ग’ Bookmark and Share Print E-mail

विकास महाडिक - बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२

‘गळ्यात साखळी सोन्याची’ असेल तर बायांनो रस्त्यावर उजव्या बाजूने चाला, असा खात्रीशीर उपाय पोलिसांनी सुचविला आहे. आणि खरेच, हा उपाय अंमलात आणला तर साखळी चोरली जाण्याची धास्ती बरीच कमी होऊ शकते. सोन्याचे भाव कडाडले असल्याने सोनसाखळी चोरीचा ‘धंदा’ही जोरात आहे. भरदिवसासुद्धा गळ्यात खऱ्या सोन्याचे मंगळसूत्र अथवा अन्य आभूषणे घालून मिरवणे म्हणजे आर्थिक नुकसानीबरोबरच जिवाशीसुद्धा खेळ होऊ शकतो. सोनसाखळ्या चोरणाऱ्यांची एक विशिष्ट पद्धत असते. जिच्या गळ्यातील साखळी हिसकावयाची आहे तिच्या मागोमाग थोडे अंतर चालून योग्य संधी येताच त्या महिलेच्या शेजारी येऊन साखळी खेचायची आणि धूम पळत सुटायचे अशी ही पद्धत असते. तोच प्रकार दुचाकीवरून साखळ्या पळविणाऱ्यांचाही असतो. ‘सावजा’चा थोडे अंतर पाठलाग करायचा, हवी तशी परिस्थिती मिळाली की झपाटय़ाने पुढे येऊन साखळी खेचायची आणि सुसाट सुटायचे ही ‘कार्यपद्धती’ साधारणपणे वापरली जाते. ही कार्यपद्धती लक्षात घेऊनच पोलिसांनी ‘उजवा मार्ग’ सांगितला आहे.
रस्त्यावरून चालताना आपण सर्वसाधारणपणे डाव्या बाजूने चालतो. स्वाभाविकच रस्त्यावरील वाहने आपल्या उजव्या बाजूने पुढे जात असतात. तर समोरून येणारी वाहने आपल्या विरुद्ध बाजूला असतात. आपल्या मागून कोणीतरी मोटरसायकलवरून पाठलाग करीत असेल तर ते आपल्याला लक्षात येणे शक्य नसते. परंतु आपण रस्त्याच्या उजव्या फूटपाथवरून चाललो तर चित्र बदलते. आता वाहनांची रहदारी आपल्या डाव्या हाताला येते. मुख्य म्हणजे ही वाहने समोरून आपल्या दिशेने येत असतात. म्हणजेच मागून आपला पाठलाग करणाऱ्याला उलटय़ा दिशेने वाहन चालवावे लागेल. साखळी चोरणारा असा धोका पत्करण्याची शक्यता कमीच. म्हणूनच पोलिसांनी हा नामी उपाय सुचविला आहे.  नवी मुंबईच्या परिमंडळ १ चे उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी हा ‘उजवा मार्ग’ शोधून काढला आहे. दिवाळीत सोनसाखळी चोरण्याचे प्रमाण वाढत असल्याने याच काळात या उपायाचे प्रात्यक्षिक घेण्याचे त्यांनी ठरविले आहे. त्यासाठी वाशीच्या गजबजलेल्या विभागाची निवड करण्यात येणार असून सर्वसाधारपणे डाव्या बाजूने चालणाऱ्या नागरिकांनी उजव्या बाजूने चालण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. हा प्रयोग वाशीतील प्रमुख रस्त्यावर सध्या करण्यात येणार असून तेथील अनुभवानंतर तो संपूर्ण नवी मुंबईत राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.     

सोनसाखळीच्या या वाढलेल्या घटनांनी पोलीसही हतबल झाले आहेत. या प्रकारात कधीकधी नागरिकांचा नाहक जीवही जातो. बाजारभावापेक्षा कमी किंमतीत हा माल मिळत असल्याने काही नवोदित सोनारांनी हा मुख्य धंदाच केला आहे. सोने वितळविण्यात हे सोनार माहिर असून राजस्थान व गुजरातमधील मंडळी यात आघाडीवर आहेत.  

 सोनसाखळी चोऱ्यांचे प्रमाण शहरी भागात लक्षणीय आहे. तुलनेत सोपा, कमी धोक्याचा आणि ‘झटपट’ मामला असल्याने ‘घरफोडी’वालेही आता या धंद्याकडे वळले आहेत. एक (चोरलेलीच) मोटारसायकल आणि एक साथीदार, तोही नसला तरी चालते, एवढेच भांडवल या धंद्याला लागते, अशी ‘मौल्यवान’ माहिती या व्यवसायानिमित्ताने पोलीस कोठडीत ‘मुक्काम’ करणाऱ्या काही ‘व्यावसायिकां’नी दिली आहे. या धंद्यातील काहींचे सूत्र तर ‘एकला चलो रे’ असे असते. हल्ली घरून मिळालेला पॉकेटमनी ज्यांना पुरत नाही, असे हिकमती तरुण, विद्यार्थीसुद्धा या व्यवसायात उतरले आहेत.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो