सागरगड
मुखपृष्ठ >> Trek इट >> सागरगड
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

सागरगड Bookmark and Share Print E-mail

सुधीर जोशी - बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२

मस्त पावसाळी हवा! साहजिकच घरात बसणे अशक्य. पाठीवर सॅक चढवून बाहेर तर पडतोच पण खूप वेळा कोठे जावे, हा प्रश्न सतावतोच. यावर सोप्पे उत्तर आहे सागरगड. आपलं वाहन असेल तर उत्तमच अन्यथा पुणे-अलिबाग बस पकडून अलिबागेच्या अलीकडेच ५ कि.मी. वर असलेल्या खंडाळे या गावी उतरावे. बसमधून उतरतानाच नाकासमोर दिसणाया धबधब्याकडे जाणाऱ्या गाडीरस्त्याने चालू पडावे. आपले वाहन असल्यास दोन-अडीच कि.मी.ची पायपीट वाचेल. थोडय़ाच वेळात आपण पोहोचतो एका खळाळणाऱ्या प्रवाहाशी, पण जरा डुंबण्याचा मोह आवरा. कारण थोडय़ाच अंतरावर मगापासून आपल्याला खुणावणारा जलप्रपात आपली वाट पाहतो आहे. येथे आल्यावर कोणाचे ऐकायची गरजच काय? खुशाल जलक्रीडेला प्रारंभ करा. तुषार स्नानाने थकवा दूर पळतोच आणि शरीर मनात फक्त उत्साहाचाच जल्लोषच जल्लोष. सुमारे १५० फूट सरळ जमिनीवर झेपावणाऱ्या या धबधब्याचे नाव आहे ‘धोंधाणे धबधबा.’ घोंगावणाऱ्या आवाजात धो धो कोसळणाऱ्या या प्रपाताला अगदी साजेसे नावॐ  येथून मग निघावे दाट झाडीतून लपतछपत जाणाऱ्या काहिशा चढाच्या वळणदार वाटेने सिध्देश्वर मंदिराकडे. वाटेतील झाडीत दुर्मिळ कांचन वेल आढळते. हिच्या कानवल्याच्या आकाराच्या मखमली शेंगा येथे पाहायला मिळाल्या. दाट झाडीत कडय़ाच्या टोकावरील मंदिराचे सभागृह चांगलेच प्रशस्त असून बंदिस्तही आहे. बाजूलाच एक स्वच्छ चवदार पाण्याची विहीर आणि शेजारीच एक खळाळता ओढा. हाच ओढा आपल्याला कडय़ावरून लोटून घेतो व धबधबा बनतो. हे सर्व दृष्य पाहून वाटते की शांताबाई
शेळके यांची कविताच आपण प्रत्यक्षात अनुभवत आहोत. मुक्काम करायला आदर्श आणि सुरक्षित जागा. बरोबर आणलेला शिधा वापरून मस्त खिचडी बनवली आणि सर्वजणांनी मनापासून ताव मारला. असे जेवण तुम्हाला कोठेही मिळणार नाही याची खात्री बाळगा.
या नंतर पुढील सर्व प्रवास जवळजवळ सपाटीवरूनच आहे. सर्वत्र हिरव्या रंगाच्या अगणित छटा आढळतात. वाटेत अनेक आगळ्या वेगळ्या वनस्पती आढळतात. आमच्या भाग्याने सोबत उष:प्रभा पागे असल्याने कधी कधी असे वाटले की आम्ही बोटॅनिकल गार्डनची सैर करतो आहोत. उषाताईंनी अनेक झाडांचा त्यांच्या वैशिष्ठयांसहित परिचय करून दिला. येथे वावडिंगाच्या झुडपांवर मोहोर आला होता तर चार-पाच प्रकारची ऑर्किङही पाहिली. शिवाय अनेक वनस्पती विशेष पाहता आल्या. याच पठारी भगात आपल्याला लागते सागरगडमाची गाव यालाच गवळीवाडा असेही म्हणतात. बरोबर शिधा आणला नसल्यास येथे उदरभरणाची सोय होऊ शकते. अर्थात इंतजारके बाद. या पठारावरून भटकत असताना अचानक समोर खूप मोठा पसारा असलेला सागर गड आपल्याला दर्शन देतो. पण हुरळून जाऊ नका. अजून खूप पदभ्रमण बाकी आहे. बाकदार वाटा आपल्याला गडाच्या तटबंदीपाशी आणून सोडतात. गडाला विशाल तटबंदी असून बऱ्याच प्रमाणात ती सुस्थितीत आहे. प्रवेशद्वाराचे केवळ अवशेषच शिल्लक आहेत.
शिवाजी महाराजांनी  मोगलांशी केलेल्या तहानुसार मोगलांना हस्तांतरण केलेल्या तेहेतीस किल्ल्यांत या गडाचा समावेश होता तेव्हा याचे नाव होते खेडदुर्ग. महाराज आगऱ्याहून परत आल्यावर याला परत स्वराज्यात दाखल करून घेण्यात आले व याचे नामकरण ‘सागरगड’ असे झाले. या गडाचा उल्लेख इ.स.१७१३ मध्ये पेशवे व कान्होजी आंग्रे यांच्यात झालेल्या तहातही आहे.
या गडावरून मांदाडच्या खाडीपासून कोरलई किल्ल्यापासून रेवदंडा चौल नागावपासून अलिबाग कुलाबा किल्ला थळ किहीम खान्देरीउन्देरी ते मुम्बइच्या समुद्रावर आणि अष्टागरावर नजर ठेवणे सहज शक्य आहे. त्यामुळे याचे संरक्षणदृष्टया महत्त्व अनन्य साधारण होते व आहे. हा सर्व परिसर सहज न्याहाळता येतो आणि म्हणूनच याचे सागरगड असे नामकरण झाले असावे. गडावरील गडेश्वराचे मंदिर आज भग्नावस्थेत असून जवळच राणीमहालाचे अवशेष आहेत. या बालेकिल्ला सदृश भागाला तटबंदी असावी असे अवशेषांवरून वाटते. एक तलाव आणि पाण्याची टाकीही आहेत. कोठार पडिक अवस्थेत आहे. काही इमारतींची जोतीही आढळतात. गडाच्या उत्तर टोकाच्या कडय़ाखाली आहे एक दगडी सुळका याला म्हणतात वांदरलिंगी. अगदी जीवधनच्या वांदरलिंगीची जुळी बहीणच. पदभ्रमण खूप असले तरी गड खूप सोपा आहे. निसर्गाची विविध रूपे विविध वनस्पती  मनसोक्त जलक्रीडा यासाठी तरी येथे यायलाच हवे. मग निघायचं ठरवताय ना!

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो