नितीनभौ काय करून राह्यले..
मुखपृष्ठ >> अग्रलेख >> नितीनभौ काय करून राह्यले..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

नितीनभौ काय करून राह्यले.. Bookmark and Share Print E-mail

बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
जिभेचा सर्वार्थाने सैल वापर हे नितीनभौ गडकरी यांचे जुने दुखणे आहे. यापूर्वीही महाराष्ट्रात मंत्रिपदी असताना अनेक सरकारी बैठकांचा इतिवृत्तांत त्यांच्या ज्वालाग्राही भाषेत जळून खाक झाल्याचा इतिहास आहे. ज्या शब्दांचा उच्चार मनातल्या मनात करायचा झाला तरी एखादी व्यक्ती दहा वेळा विचार करेल ते शब्द नितीनभौंच्या तोंडून सटासट कसे सुटतात याचा अनुभव अनेकांना आहे.

हे त्यांच्या मोकळ्याढाकळ्या स्वभावाचे निदर्शक आहे. परंतु उच्चपदी गेल्यावर या स्वभावास मुरड घालायची असते. ज्यास नेतृत्व करावयाचे आहे त्याच्या जिभेवर खडीसाखरेने कायमस्वरूपी वसतीस असावे लागते. एरवी गोडधोडाचे प्रेमी असणाऱ्या नितीनभौंना गोड भाषेचे तेवढे वावडे आहे. त्यामुळेच मागचा पुढचा कोणताही विचार न करता ते विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम हे दोन्ही नावे एकाच वाक्यात घेऊ शकले. त्यांच्याकडून जे काही घडले ते भाजपच्या सद्यस्थितीचे निदर्शक आहे. या पक्षाचे नियंत्रण सध्या नक्की कोणाच्या हाती आहे, हे कळावयास मार्ग नाही. पक्षात अटलबिहारी वाजपेयी यांच्या युगाचा अस्त झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांचा कालखंड सुरू होईल असे मानले जात होते. तसे झाले नाही. अडवाणी कराचीच्या कात्रीत सापडले आणि स्वत:च नेतृत्व शर्यतीतून कापले गेले. त्याचे शल्य त्यांच्या मनातून अद्याप गेलेले नाही आणि ते साहजिकच म्हणावयास हवे. त्यामुळे त्यांच्यानंतर भाजपच्या नेतृत्वफळीत अचानक मोठा खड्डा पडला आणि आता सगळेच समवयस्क तू पुढे का मी मागे हे ठरवण्यात मग्न आहेत. देशउभारणीसाठी पुढच्या पन्नास वर्षांचे नियोजन करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही एका अर्थाने हे अपयश म्हणावयास हवे. संघाने कितीही नाकारले तरी भाजपचा नेतृत्वपुरवठा संघाकडूनच होतो, हे सत्य आहे. संघाला बाजूला सारून थेट जनतेपर्यंत पोहोचावयाची धमक असलेले अटलबिहारी वाजपेयी हे जोपर्यंत कार्यरत होते तोपर्यंत त्यांचे थेट पंख कापण्याची हिंमत संघाला झाली नाही. वाजपेयी यांच्या काहीशा उदारमतवादी दृष्टिकोनास चाप लावण्याचा प्रयत्न त्याही वेळी दत्तोपंत ठेंगडी वा माजी सरसंघचालक के. सुदर्शनजी यांनी करून पाहिला. परंतु वाजपेयी यांची लोकप्रियताच एवढी की त्यांनी या मंडळींना अजिबात जुमानले नाही आणि आपल्याला हवे तसेच केले. अडवाणी यांना ती संधी मिळाली नाही. वाजपेयी कार्यरत होते तोपर्यंत अडवाणी यांना एक तर त्यांच्या छायेखालीच राहावे लागले आणि नंतर संधी मिळाली तेव्हा ते कराची कल्लोळात सापडले. त्यांच्यानंतर भाजपत आता समवयस्कांचेच रान माजले आहे. अरुण जेटली हे सुषमा स्वराज यांना पाण्यात पाहतात आणि सुषमाताइरे या अरुणभाईंचा रागराग करतात. हे दोघे मिळून मग उत्तर प्रदेशचे राजनाथ सिंग यांना विरोध करतात. राजनाथ सिंग यांना उत्तर प्रदेशचे कलराज मिश्र आणि लालजी टंडन आदी आव्हान देऊ पाहात असतात. या तिघांतील संघर्षांस पुन्हा राजपूत आणि ब्राह्मण अशीही किनार आहे. बिहारात भाजपने जनता दलाच्या नितीशकुमार यांच्यापुढे दुय्यम भूमिका स्वीकारली आहे. वास्तविक भाजपला गेल्या विधानसभा निवडणुकीत बिहारात घवघवीत यश लाभले, परंतु त्यास नितीश यांच्या मागेच सध्या तरी राहावे लागणार. त्यातही भाजपचे तेथील नेते सुशील मोदी हे स्वपक्षीयांपेक्षा नितीशकुमार यांच्याच अधिक प्रेमात आहेत. शिवाय सी. पी. ठाकूर आणि अन्य यांच्यातही संघर्ष आहे. भाजपचे बिहारी मोदी निदान सुशील तरी आहेत. परंतु दुसरे मोदी, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, यांच्याबाबत तसेही म्हणता येणार नाही. ते फक्त स्वत:लाच मानतात. नेतृत्वाच्या बाबतीत आपण आत्मनिर्भर आहोत याची त्यांना पूर्ण खात्री आहे आणि त्यांना वेसण घालायची ताकद आज भाजपत कोणाकडेही नाही. राजस्थानात भाजपच्या सर्वेसर्वा वसुंधराराजे यांचे रुसवेफुगवे अद्याप संपलेले नाहीत. यामुळे दक्षिणेकडे नेतृत्व द्यावे तर वेंकय्या नायडू हे फक्त एकवाक्यी प्रतिक्रिया देण्यापुरतेच उरले आहेत की काय, असा संशय यावा. तामिळनाडूत भाजपस काही लक्षणीय स्थान नाही. तेव्हा तिकडचे काही नेते पक्षाने तोंडी लावण्यापुरते वापरून पाहिले, पण त्यातून फारसे काहीही साध्य झाले नाही.
जना कृष्णमूर्ती वगैरेही भाजपचे अध्यक्ष होऊन गेले ते भाजपच्या आजच्या नेत्यांनाही सांगावे लागेल. शेजारील कर्नाटकात येडियुरप्पा यांनी खणलेल्या खदाणीत भाजपच अडकलेला आहे. अशा परिस्थितीत या सगळ्याला बाजूला सारून संघाने महाराष्ट्रातील नितीनभौंना अध्यक्षपदाच्या घोडय़ावर बसवले. त्यांना अधिक काळ त्यावर राहता यावे म्हणून पक्षाचे नियमही बदलले. परंतु दोन वर्षांनंतर अजूनही त्यांची मांड पक्की बसली आहे, असे त्यांनाही म्हणता येणार नाही.
म्हैसकर यांच्या आयडियल प्रेमातून ते अजून पूर्ण सावरत नाहीत तोच त्यांच्या जिभेने पुन्हा एकदा उसळी खाल्ली आणि भाजप आणि संघास प्रात:स्मरणीय असलेल्या विवेकानंदांच्या बुद्धय़ांकाची तुलना त्यांनी थेट दाऊद इब्राहिम याच्याशीच केली. हा सैल जिभेचा आजार गडकरी यांच्याबाबतीत अधिक बळावलेला असला तरी अन्यांनाही त्याची बाधा झालेली नाही, असे म्हणता येणार नाही. गेल्याच आठवडय़ात नवमंत्री शशी थरूर यांच्या पत्नीबाबत नरेंद्र मोदी यांनी काही असभ्य उद्गार काढले. त्याचीच री मुख्तार अब्बास नक्वी, या टीव्ही चॅनेल्स सोडले तर काहीही आगापिछा नसलेल्या नेत्याने ओढली आणि थरूर यांची लव्हगुरू अशी हेटाळणी केली. हे चूक होते. तरी कोणीही त्यांचे कान उपटले नाहीत. भाजप हा काही चारित्र्याच्या बाबतीत सरसकट धुतल्या तांदळासारखा आहे असे म्हणता येणार नाही. तेव्हा अशा प्रकारची भाषा या मंडळींनी वापरणे हे सभ्यतेला धरून नव्हते आणि त्याचा निषेध होणे आवश्यक होते. परंतु भाजपतील एकाही नेत्याने याबाबत चकार शब्दानेही दिलगिरी व्यक्त केली नाही. कशी करणार? कारण पक्षाध्यक्षच जिभेचा वापर सर्वार्थाने सैलपणे करण्यासाठी विख्यात असताना तो इतरांना कोणत्या शब्दात जीभ आवरा असे सांगणार? एरवी अत्यंत मोजूनमापून बोलण्या-खाण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांचा घात या जिभेनेच केला. त्यामुळे ते कराचीकात्रीत तर सापडलेच, परंतु नंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत मनमोहन सिंग यांच्यावर असभ्य भाषेत हल्ला केल्याबद्दलही त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले. याचा कोणताही धडा गडकरी यांनी घेतला नाही.   त्यात आता महेश जेठमलानी आणि नंतर राम जेठमलानी यांनी गडकरी यांच्या विरोधात उघड बंड करून वारे कोणत्या दिशेने वाहू लागतील याचा अंदाज दिला आहे. वास्तविक जेठमलानी पितापुत्र चारित्र्यसंपन्नतेसाठी ओळखले जातात असे नाही. परंतु त्यांनीही अध्यक्षांच्या विरोधात बोलावे इतका सैलपणा भाजप पक्ष संघटनेस आला आहे. अशा वेळी नितीनभौंनी अधिक सावध असावयास हवे होते. परंतु ते आपल्या वऱ्हाडी मस्तीत चालले गेले आणि नितीनभौ काय करून राह्य़ले, असा प्रश्न विचारण्याची वेळ समस्त भाजपवर आली.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो