जमात-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना जलालुद्दीन शुक्रवारी नागपुरात
|
|
|
|
|
नागपूर / प्रतिनिधी जमात-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना सय्यद जलालुद्दीन उमरी यांचे ९ नोव्हेंबरला नागपुरात आगमन होणार आहे. या निमित्ताने मोमिनपुरातील मुस्लिम फूट बाल ग्राऊंडवर शुक्रवारी रात्री ९ वाजता जन संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनाला ते संबोधित करणार आहेत.
७७ वर्षीय मौलाना सय्यद जलालुद्दीन उमरी इस्लामी शिक्षणात विभूषित आहेत. इस्लामी क्षेत्रामध्ये ते मुख्यत: मार्गदर्शक आहेत. जमाते इस्लामी हिंदच्या नीतीचे पालन करून त्यांनी देशात विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांमध्ये मोठे योगदान दिले आहे. देशात बंधुभाव, एकता व शांततेसाठी ते कार्य करीत आहेत. या संमेलनाला जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्रचे लातूर येथील प्रांतीय अध्यक्ष इंजिनिअर तौफिक असलम खान उपस्थित राहणार आहेत. संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन जमाते इस्लामी हिंद नागपूर जिल्हा अध्यक्ष अजीजुर्रहमान खान यांनी केले आहे. |