गडकरींवरील आरोपांमुळे विरोधकांची रणनीती संकटात
मुखपृष्ठ >> महाराष्ट्र >> गडकरींवरील आरोपांमुळे विरोधकांची रणनीती संकटात
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

गडकरींवरील आरोपांमुळे विरोधकांची रणनीती संकटात Bookmark and Share Print E-mail

हिवाळी अधिवेशनातील आखणीबाबत संभ्रम
खास प्रतिनिधी

नागपूर
पुढील महिन्यात येथे होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे वेध लागले असतानाच भाजपाध्यक्ष नितीन गडकरींवरील आरोपांच्या सावटामुळे विरोधकांच्या रणनीतीपुढेच संकट निर्माण झाले आहे. कोटय़वधींचा सिंचन घोटाळा हिवाळी अधिवेशनात गाजणार हे गृहीत धरण्यात आले आहे. परंतु गडकरी सध्या आरोपांच्या फेऱ्यात अडकल्याने सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी डावपेचांची कशा पद्धतीने आखणी करावी याबाबत विरोधी नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
 गडकरी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी असले तरी त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावरील प्रभाव कायम आहे. गडकरींच्या आक्रमक नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी सरकारची कोंडी केल्याचे अनेक प्रसंग घडले आहेत. परंतु यावर्षी परिस्थिती बदलली आहे. गडकरींना अध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळेल वा नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. डिसेंबरमध्ये याचा फैसला होणार असून, भाजपतील गडकरी विरोधकांनी अचानक डोके वर काढल्याने महाराष्ट्रातील गडकरी समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शिवाय गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील निवडणुकांचेही निकाल तोवर जाहीर झालेले असतील. या धकाधकीत हिवाळी अधिवेशनातील मुद्दय़ांची आखणी आणि रणनीती यात लक्ष घालण्यासाठी गडकरींना कितपत वेळ मिळेल, याबाबत शंका आहे. त्यामुळे दुसऱ्या फळीतील नेतृत्वालाच विधिमंडळात किल्ला लढवावा लागणार आहे. यात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, प्रदेश महासचिव देवेंद्र फडणवीस, अतुल भातखळकर, राज पुरोहित, किरीट सोमय्या यांना घेऊनच काँग्रेस विरोधाची आखणी करावी लागणार आहे.
जलसंपदा विभागाची श्वेतपत्रिका विधिमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी येईल, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले असले तरी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निर्णयावर श्वेतपत्रिकेचे भवितव्य अवलंबून आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी श्वेतपत्रिका काढण्यात न आल्यास विरोधकांच्या हाती सिंचन घोटाळ्याबरोबरच आयते मोठे कोलीत मिळणार आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये याबाबत सावध पावले उचलली जात आहेत. जलसंपदा विभागातील कोटय़वधी रुपयांच्या घोटाळ्यांचे विजय पांढरे यांनी रहस्योद्घाटन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यापूर्वीच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जलसंपदा विभागाच्या कारभाराबाबत श्वेतपत्रिका काढण्याचे जाहीर केले होते, परंतु ती अद्याप काढण्यात आलेली नाही.
 १९९५ पासून चौकशी करण्याचे आव्हान फडणवीसांना सरकारला दिले असले तरी यात भाजप-शिवसेना गोत्यात येण्याची शक्यता आहे. राजकीय लाभासाठी गडकरी भाजपाध्यक्षपदावर असलेले काँग्रेसला हवेच आहेत, त्यामुळे गडकरींच्या राजीनाम्याची मागणी भाजपातूनच होत असली तरी काँग्रेसने त्याबाबत चुप्पी साधली आहे.    

काळ्या- पांढऱ्या श्वेतपत्रिकेचा वाद
अजित पवार यांनी पुन्हा मंत्रिमंडळात परत यावे याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही मागणी होत नाही, त्यामुळे श्वेतपत्रिका निघेपर्यंत काहीच होणार नाही, असेच चित्र आहे. श्वेतपत्रिका काढून त्यात सर्व सिंचन घोटाळ्यातील सर्व लेखाजोखा जाहीर केला नाही, तर भाजपतर्फे काळीपत्रिका जाहीर करून ती जनतेसमोर जाहीर करण्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे काळ्या-पांढऱ्या श्वेतपत्रिकेचा वाद हिवाळी अधिवेशनापूर्वीच रंगू लागला
आहे.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो