किरण नगरकर यांना सर्वोच्च जर्मन नागरी पुरस्कार प्रदान
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर >> किरण नगरकर यांना सर्वोच्च जर्मन नागरी पुरस्कार प्रदान
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

किरण नगरकर यांना सर्वोच्च जर्मन नागरी पुरस्कार प्रदान Bookmark and Share Print E-mail

प्रसिद्ध उद्योगपती बाबासाहेब कल्याणी यांचाही पुरस्काराने सन्मान
प्रतिनिधी, मुंबई
‘सात सक्कं त्रेचाळीस’ या दमदार कादंबरीतून मराठी साहित्यविश्वात आपली स्वतची वाट आखणारे चतुरस्र साहित्यिक किरण नगरकर आणि प्रसिद्ध उद्योगपती बाबासाहेब कल्याणी यांना बुधवारी एका शानदार समारंभात जर्मनीच्या ‘ऑर्डर ऑफ दी मेरीट’ हा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आपल्या कामातून भारत आणि जर्मनी यांच्यातील सांस्कृतिक व औद्योगिक संबंध दृढ करण्यात हातभार लावल्याबद्दल नगरकर आणि कल्याणी या दोघांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. जगात ज्या मराठी साहित्यिकांचे नाव आदराने घेतले जाते अशा मोजक्या सर्जनशील साहित्यिकांमध्ये नगरकर यांची गणना होते. ‘सात सक्कं त्रेचाळीस’, ‘रावण आणि एडी’, ‘ककोल्ड’, ‘गॉड्स लिटल सोल्जर’ या नगरकर यांच्या काही गाजलेल्या साहित्यकृती. त्यांचे नुकतेच प्रसिद्ध झालेले ‘द एक्स्ट्रॉज’ हे पुस्तक सोडून सर्व कादबऱ्यांचे जर्मनीत भाषांतर झाले आहे. त्यांच्या ‘गॉड्स.’ या पुस्तकाने तर जर्मनीत विक्रीचा उच्चांक गाठला
आहे.
मुंबई-पुण्यात शिकलेल्या नगरकर यांचा मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांवर प्रभुत्व आहे. नगरकर यांच्या साहित्यकृती जर्मनीत चांगल्याच गाजल्या आहेत. नगरकर यांच्या बरोबरच बाबासाहेब कल्याणी हे प्रसिद्ध उद्योगपतीही जर्मनीशी व्यवसायाच्या माध्यमातून जोडले गेले आहेत.
नगरकर यांच्या ‘सात सक्कं त्रेचाळीस’ या कादंबरीच्या गेल्या सत्तावीस वर्षांत मोजक्याच प्रती विकल्या गेल्या, पण मराठी साहित्यावर या कादंबरीने विलक्षण छाप पाडली.
कठोर समीक्षेमुळे या कादंबरीला फारसा वाचकवर्ग लाभला नाही, पण इंग्रजी अनुवादाला मात्र काही विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात स्थान मिळाले. ही त्यांची पहिली कादंबरी १९६७-६८च्या सुमारास ‘अभिरूची’मध्ये प्रसिद्ध झाली होती. १९७४ मध्ये ‘मौज प्रकाशन’ने ती प्रकाशित केली. नंतर थेट २००४ मध्ये या कादंबरीची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली.
नगरकर यांच्या ककोल्ड या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांची द एक्स्ट्राज ही कादंबरी अलीकडेच प्रसिद्ध झाली आहे. मोजक्या कादंबऱ्या लिहूनही स्वतचा असा वाचकवर्ग तयार करणारे साहित्यिक म्हणून नगरकरांना साहित्यविश्वात वेगळे स्थान प्राप्त झाले आहे.
जर्मनीचे राजदूत मायकेल स्टेनर यांच्या हस्ते नगरकर आणि कल्याणी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘जर्मनीचे भारताशी असलेले संबंध कुठल्याही राजकीय संबंधांच्या पलिकडे आहेत.  कला, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, व्होकेशनल ट्रेनिंग या क्षेत्रात भारत-जर्मनीने सौदार्ह आणि मैत्रीचे संबंध दृढ केले आहेत,’ असे उद्गार स्टेनर यांनी यावेळी काढले.  

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो