ठाण्यात नवा ‘आदर्श’ घोटाळा!
मुखपृष्ठ >> महत्त्वाच्या बातम्या >> ठाण्यात नवा ‘आदर्श’ घोटाळा!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

ठाण्यात नवा ‘आदर्श’ घोटाळा! Bookmark and Share Print E-mail

बनावट टीडीआर वापरून टोलेजंग ‘देव कार्पोरा’
खास प्रतिनिधी,  मुंबई
प्रशासकीय अधिकारी, राजकारणी आणि बांधकाम व्यावसायिक यांच्या अभद्र युतीतून उदयास आलेल्या आदर्श घोटाळयामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली असतानाच शेजारील ठाण्यातही असाच एक घोटाळा उघडकीस आला आहे.

मास रॅपिड ट्रास्पोर्ट सिस्टीम (एमआरटीएस) साठी आरक्षित असलेल्या जागेचे क्षेत्र वगळल्याचे केवळ नकाशावर दाखवून प्रत्यक्षात ती जागा न वगळताच तिचा विकास हक्क हस्तांतर हक्क  (टीडीआर) घेऊन तब्बल सोळा मजल्याचा भव्य टॉवर उभारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही राजकारणी, महापालिकेतील अधिकारी आणि विकासक यांच्या संगनमताने उभा राहिलेल्या ‘देव कार्पोरा’ टॉवरमधील सहा अनधिकृत मजल्यावर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र या इमारतीत हितसबंध गुंतलेल्यांनी तिला वाचविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
 ठाण्यातील कॅडबरी जंक्शनवर ही सोळा मजल्याची देव कार्पोरा उभारण्यात आली असून त्यात नामवंत कंपन्यांची तसेच ठाण्यातील बडय़ा राजकीय नेत्यांचीही कार्यालये आहेत. त्यामुळे या अलिशान इमारतीवर  खरोखरच पालिकेचा हातोडा पडणार काय याचा निर्णय येत्या २४ नोव्हेंबरला उच्च न्यायालयात होण्याची शक्यता आहे. ज्या भूखंडावर ही इमारत उभारण्यात आली आहे, त्याला लागूनच महापालिकेच्या एमआरटीएस प्रकल्पाच्या स्थानकासाठी आरक्षण आहे. मात्र या इमारतीचे विकासक मे.महावीर असोसिएट यांनी एमआरटीएसची आखणी केवळ नकाशावर दाखवून प्रत्यक्षात मात्र एमआरटीएसचे क्षेत्र न वगळताच इमारतीचे नकाशे मंजुरीसाठी जानेवारी २००७ मध्ये महापालिकेत सादर केले. त्यानंतर वाढीव चटईक्षेत्र निर्देशांकाच्या आधारे सोळा मजल्यापर्यंत सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आला. तिसरा ते सहावा मजला निवासी वापरासाठी तर अन्य मजले वाणिज्यिक वापरासाठी मंजूर करण्यात आले. मात्र ही मंजुरी देताना महापालिका अधिकाऱ्यांनी एमआरटीएस मार्ग आणि स्थानकाची जागा विकास प्रस्तावातून न वगळताच त्याला मंजुरी दिली. एवढेच नव्हे तर याबाबत शासनाकडे झालेल्या तक्रारीवर उत्तर देतानाही तत्कालिन महापालिका आयुक्तांनी १२ जून २००८ रोजीच्या पत्रान्वये प्रस्तावित रिंगरूट स्थानकाचे क्षेत्र वगळून देव कार्पोराचे नकाशे मंजुर करण्यात आल्याचे शासनास कळविले. प्रत्यक्षात मात्र हे क्षेत्र वजा न करताच विकासकाने सादर  केलेल्या प्रस्तावास जुलै २००७ ते डिसेंबर २००९  दरम्यान वेळोवळी मंजुरी देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
त्यामुळे मंजुर विकास नियंत्रण नियमावलीतील नियम ३० च्या तरतुदीनुसार  प्रस्तवित एमआरटीएस मार्ग आणि स्थानकाची जागा वजा न करता चुकीच्या पद्धतीने विकास प्रस्ताव सादर करण्यात आल्याचा ठपका ठेवून महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी या इमारतीच्या वरच्या सहा मजल्यांची परवानगी रद्द करून हे सर्व मजले अनाधिकृत ठरविले आहेत.     
महापालिका बांधकाम तोडणार
हे बांधकाम विकासकाने स्वत: काढून घ्यावे अन्यथा महापालिका हे बांधकाम तोडून टाकील आणि त्याचा खर्च विकासकाकडून वसूल करेल असा आदेशही आयुक्तांनी बजावल्यामुळे संबधितांचे धाबे दणाणले आहे. या इमारतीत ठाण्यातील काही बडय़ा नेत्यांनी कार्यालयांसाठी जागा घेतली. मात्र ही इमारत अनाधिकृत असल्याची बाब उघड होताच एका नेत्याने आपली जागा विकून टाकल्याचे कळते. दरम्यान सर्वप्रकारचे प्रयत्न करूनही आयुक्त ऐकत नसल्याने हवालदील झालेल्या विकासकाने ही इमारत वाचविण्यासाठी अखेरचा पर्याय म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली असून दिवाळी सुट्टी संपेपर्यंत या इमारतीवर पुढील कारवाई करू नका, अशी सूचना देत न्यायालयाने या याचिकेवर २४ नोव्हेंबरला सुनावणी ठेवली आहे. 

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो