सुरेख भेटवस्तू, खुलवी प्रियजनांची वास्तू!
मुखपृष्ठ >> लेख >> सुरेख भेटवस्तू, खुलवी प्रियजनांची वास्तू!
 

वास्तुरंग

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सुरेख भेटवस्तू, खुलवी प्रियजनांची वास्तू! Bookmark and Share Print E-mail

 

alt

प्रणोती प्रकाश , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दीपावली म्हणजे वर्षांतला सगळ्यात मोठा आनंदाचा, उत्साहाचा सण! नवीन कपडे, छान छान वस्तू, लाडू, चिवडा, चकल्यांची मस्त मेजवानी, फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांची रोषणाई आणि अर्थातच प्रियजनांच्या भेटीगाठी! त्यात या वर्षी तुमचं दिवाळी गिफ्ट हे इतरांच्या गृहसजावटीमध्ये भर घालणारं असेल तर..
आपण भारतीय म्हणजे मुळातच उत्सवप्रिय. त्यातही जर दिवाळीचा सण असेल तर आपल्या आनंदाला उधाणच येतं. दिवाळीत आपण आप्त, मित्रपरिवार यांच्याकडे जातो आणि या प्रेमाच्या भेटींचा आनंद द्विगुणित करण्यासाठी एकमेकांना चविष्ट फराळाबरोबरच भेटवस्तूसुद्धा देतो. मुळात सणाच्या, आनंदाच्या दिवशी एकमेकांना भेटवस्तू देणं हा आपला पूर्वीपासून चालत आलेला रिवाज आहे. शुभदिनाचं औचित्य साधून एकमेकांना भेटवस्तू दिल्या तर आनंदात भर तर पडतेच, शिवाय आपले नातेसंबंध अधिकाधिक समृद्ध, दृढ होण्यासही मदत होते. नात्यातला गोडवा, जिव्हाळा वाढतो. म्हणूनच कदाचित भेटवस्तू देण्याचा हा प्रघात आजही विनाखंड सुरू आहे. मग या वर्षी तुम्ही दिलेली गोड भेटवस्तू एखाद्याच्या घरातील सजावटीत चार चाँद लावणार असेल तर मग क्या बात है!


दसरा-दिवाळीचं औचित्य साधून अनेक जण आपल्या नवीन वास्तूमध्ये राहायला जातात. घर अगदी नवं कोरं असतं. मोजकं फíनचर, जुजबी वस्तू, गरजेचं सामान इतकंच. अशा वेळी मग दिवाळीची तुमची भेटवस्तू त्यांच्या घराच्या सजावटीसाठी साहाय्यभूत ठरू शकते. आज बाजारात अनेक वस्तू अशा आहेत, की ज्या आपण नवीन घरात राहायला गेलेल्या आपल्या जीवलगांना देऊ शकतो. ज्यांचा वापर त्यांना गृहसजावटीसाठी करता येईल.  

कटाक्षाने टाळा
दाराची तोरणं, गणपतीची मूर्ती देणं कटाक्षाने टाळा. कारण या गोष्टी प्रत्येकाच्या घरात असतातच. तुम्ही ज्यांना भेटवस्तू देणार आहात त्यांचा जर वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर डोअर नॉक, देवतांच्या मूर्त्यां या वस्तू देऊ नका. वास्तुशास्त्रानुसार देवतांच्या मूर्त्यां भेट देणं आणि डोअर नॉकची दरवाजावर सतत टकटक होत राहणं चांगलं मानलं जात नाही.
तसंच फेंगशुई, वास्तुशास्त्र मानणाऱ्यांसाठी त्यात सांगितलेल्या शुभ वस्तू देण्याचंही टाळा. कारण त्यासुद्धा त्यांच्या घरासाठी तज्ज्ञाने सांगितलेल्या असल्या पाहिजेत.   
हलल पेपरमॅश, लाकूड यापासून बनवलेल्या नेम प्लेट्स मिळतात. पण ही वस्तूसुद्धा न दिलेलीच बरी. कारण एक तर यासाठी मुख्य दरवाजाचं आकारमान कसं आहे. त्यावर किती आकारमानाची (साइज) नेमप्लेट व्यवस्थित बसेल, याचा अंदाज आपल्याला नसतो. म्हणूनच ही वस्तू देण्याचं टाळावं. घडय़ाळ देण्याचा मोहही आवरा. घडय़ाळ्यांमध्येही खूप सुंदर वैविध्यता दिसून येतेय, पण हा मोह टाळलेलाच बरा.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना आपण अशी भेटवस्तू देण्याचं ठरवलंय त्यांची आवड प्रथम लक्षात घ्या. म्हणजे असं की, अँटिक वस्तूंची आवड असेल तर डोअर हँड्ल्स, नॅपकिन होल्डर, कंदील, कँडल स्टॅण्ड, लामणदिवा, छोटे पणतीसारखे दिवे, समई, एखादं छानसं तबक असे भरपूर प्रकार निवडीसाठी उपलब्ध आहेत. तांबे-पितळ यातील डोअर हँड्ल्स, नॅपकिन होल्डर, लामणदिवे तर खूपच सुरेख दिसतात. यामध्येच एक प्रकार डोअर नॉकचा आहे. सिंह, हत्ती अशा प्राण्यांचा तोंडाच्या आकाराला खाली गोलाकार िरग असते. घराच्या मुख्य दरवाजाला हे लावता येईल. ज्यांना इलेक्ट्रिक डोअर बेल नको असते, त्यांच्यासाठी हा मस्त पर्याय आहे. पण याचाच वापर नॅपकीन होल्डर म्हणूनही करता येईल. बेसीन, किचनमध्ये हा होल्डर तुम्ही बसवू शकता. पितळेचे डोअर alt

हॅण्डल्सही सुंदर दिसतात. मुख्य दरवाजाची शोभा यामुळे नक्कीच वाढेल. तसेच गुजरातची खासियत असलेल्या शंखेडा फíनचरमध्ये कमी उंचीची आसनं, खुच्र्या मिळतात. असं एखादं आसन देता येईल.  अ‍ॅंटिक प्रकारामध्ये राधा-कृष्ण, गणपती, गौतम बुद्ध यांच्या मूर्त्यांही असतात.
याबरोबरच फुलदाण्या, पेपरमॅशच्या वस्तू, ज्यूटपासून बनवलेल्या फ्रेम्स, पेंटिंग्ज, वारली या आदिवासी चित्रकलेतून साकारलेल्या वस्तू हे पर्याय आहेतच. फुलदाण्यांमध्येसुद्धा अनेक प्रकार आहेत. काच, सिरॅमिक, टेराकोटा, मेटल या प्रकारांपासून बनवलेल्या फुलदाण्या लक्ष वेधून घेतात. मेटलवर मिनाकारी केलेल्या फुलदाण्या अँटिक वस्तूंच्या दुकानांमध्ये मिळू शकतात. थोडंसं हटके गिफ्ट द्यायचं असेल तर जर्मन सिल्व्हरच्या वस्तू एकदा नजरेखालून घाला. यातही एखादी युनिक वस्तू मिळून जाईल. जर्मन सिल्व्हरमध्ये तबक, चौकोनी डबे, विडय़ाचे तबक, सुरई, कँडल स्टॅण्ड, छोटय़ा पणत्या, नॅपकीन होल्डर, कप-बश्या, किटली, छोटय़ा आकारातील सायकल, घोडागाडी, बग्गी, रिक्षा अशी वाहनंसुद्धा आहेत.
रॉट आयर्न मटेरिअलपासून बनलेल्या डेकोरेटिव्ह वस्तू, जसे की वॉल हँिगग्जसुद्धा आहेत. थोडंसं क्लासी गिफ्ट हवं असेल तर सिल्व्हर कोटेड भेटवस्तूंची निवड करा. यात शोभेच्या वस्तू आहेतच, शिवाय फोटो फ्रेम्सही मिळतात. दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे अशा वेळेस एखादा डेकोरेटिव्ह लॅम्प सगळ्यांचं मन जिंकेल.
सुरेख कुंडीमध्ये लावलेलं एखादं छोटंसं रोपटंही छान भेटवस्तू ठरू शकतं. हलल टेराकोटा, सिरॅमिकच्या छान रंगसंगती असलेल्या, आकाराने लहान कुंडय़ा मिळतात. त्यात आवडीचं झाड लावून तेसुद्धा देता येईल.
दिवाळीसाठी अतिशय सुरेख वस्तूंची रेलचेल अनुभवायला मिळतेय. आपली कलात्मक दृष्टी, प्रियजनांची आवड यांची योग्य सांगड घातलीत तर तुमचं गिफ्ट हे परफेक्ट दिवाळी गिफ्ट ठरेल, यात शंकाच नाही.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो