भावनांचं बेट : मुलांची खोली मौजमजा आणि उत्साह
मुखपृष्ठ >> लेख >> भावनांचं बेट : मुलांची खोली मौजमजा आणि उत्साह
 

वास्तुरंग

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

भावनांचं बेट : मुलांची खोली मौजमजा आणि उत्साह Bookmark and Share Print E-mail

alt

पर्सी जिजिना , शनिवार , १० नोव्हेंबर २०१२
विक्री संचालक - सजावट
जोतून इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
मुलांमुळे घराला एक जागतेपण येतं..  सध्या मुलांची स्वतंत्र खोली ही संकल्पना रुळते आहे. ही खोली कशी असावी, त्यात कोणत्या गोष्टी आवर्जून असाव्यात, याविषयी.. निमित्त आहे, १४ नोव्हेंबर या बालदिनाचे..
लहान मुलांची खोली म्हणजे त्यांचं स्वत:चं असं छोटंसं विश्वच!  जिथे तो दिवसभराचा बहुतांश वेळ घालवितात. भरपूर मस्ती, खेळणं,  गृहपाठ करणं, पुस्तकं वाचणं, चित्र काढणं आणि रंगविणं या कामात ते दंग असतात. इथे ती स्वत:च्या काल्पनिक जगात दिवसभर रममाण होतात. मुलांच्या आयुष्याला वळण देण्यात विशेषत: त्यांच्या वाढीच्या वयात मुलांच्या खोलीची किती महत्त्वाची आहे, यावर अनेक बालतज्ज्ञांनी आपली मते मांडलेली आहेत.
मुलांची खोली रंगवण्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या तर तुमच्या मुलाची खोली रंगवणं, हे अजिबातच पेचात टाकणारं काम नाही. तुमच्या मुलाच्या खोलीत जिवंतपणा आणताना काही सूचना आणि क्लृप्त्या तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि हे करताना हा अनुभव दीर्घकाळ स्मरणात राहील, याचीही व्यवस्था करू शकता.
सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य रंगांची निवड! कारण ‘रंग’ मुलांवर मानसिक आणि शारीरिकपरिणाम करतात. गरजेचे आहे ते थोडेसे व्यवस्थापन आणि आपल्या मुलाच्या खोलीला कोणता रंग योग्य ठरेल याबद्दलचे थोडेसे मूलभूत ज्ञान. वेगवेगळ्या रंगांना वेगवेगळे अर्थ असतात. तुमच्या मुलाच्या व्यक्तिमत्त्वाचा कल लक्षात घेऊन रंगाची निवड करणे खूप गरजेचे आहे. तसे बघता, लहान मुलांना उजळ रंग आवडतात आणि बहुतेककरून त्यांचा ओढा पिवळा, नािरगी आणि लाल यासारख्या रंगांकडे असतो. उजळ रंगांमुळे सकारात्मक कंपने निर्माण होऊन वातावरणात alt
अधिक ऊर्जा येते, जे मुलांकरता महत्त्वाचे आहे. तुम्ही खोली रंगवायचे मनसुबे आखत असाल तर खोलीचा आकार याबाबत विचार करणेही महत्त्वाचे ठरते. उष्ण रंगांच्या छटांमुळे मोठय़ा खोलीला आरामदायी फील येतो. आणि शीत रंगाच्या छटा वापरल्या की छोटी झोपायची खोली मोठी भासते. तुमच्या मुलांच्या खोलीचा रंग निश्चित करताना तुम्हाला प्रकाशयोजना हा घटकही ध्यानात घ्यावा लागेल, कारण त्यामुळेच रंगाला योग्य उठाव मिळतो.
तुमच्या मुलांची खोली सजवण्याची आणखी एक सर्जनशील पद्धत म्हणजे त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि आवडीनिवडी लक्षात घेऊन ती अ‍ॅनिमेटेड थीम्सने सजवणे. उदा. खोलीत मस्त्यालयात फेरफटका मारण्याचा अनुभव हवा असेल तर िभती निळ्या रंगात रंगवून त्या मासे, पाणवनस्पती आणि िशपले यांच्या स्टेन्सिल्सनी सजवणे. अंतराळात फेरफटका मारण्याचा अनुभव हवा असेल, तर िभती गडद निळ्या रंगात रंगवून त्यावर ग्रह, ताऱ्यांचे स्टेन्सिल्स चिकटवणे. थीमची निवड करताना तुमच्या मुलाच्या व्यक्तिमत्त्वाबरोबरच त्यांचे भविष्याबद्दलची स्वप्ने, मनसुबे ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. तुमचे मूल या थीम्सशी स्वत:ची सांगड घालू शकेल आणि त्याच्या/ तिच्या स्वत:च्या सर्जनशील जगात आपलेपणाची भावना येईल.
रंगाचा उपयोग करून तुमच्या मुलाची खोली सजवताना करायची आणखी एक कल्पना म्हणजे तुमचे मूल मोठे होत असताना खोलीत प्रेरणादायक सुविचार लिहिणे. त्यामुळे ते विचार तुमच्या मुलाला प्रेरणा देत वर्षोनुवष्रे त्याच्या खोलीत राहू शकतात. तुमच्या मुलाची खोली रंगवताना आरोग्य आणि हित या गोष्टीही ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.     नुकताच रंग देऊन झाल्यावर मूल आजारी पडू शकते. किंवा रंगांमधील मोठय़ा प्रमाणावर असलेले शिसे आणि त्यातून निघणाऱ्या वाफांमुळे खूप काळानंतर, कधीकधी खूप वर्षांनंतर मूल आजारी पडू शकते. त्यासाठी नसíगक घटकांनी बनवलेली alt
आणि चटकन उडून जाणारी सेंद्रिय संयुगे (व्हीओसी) असलेली (किंवा व्हीओसीमुक्त असलेली) इको-फ्रेंडली उत्पादने वापरणे गरजेचे आहे. मुलाच्या खोलीतल्या िभतींवर काहीतरी खरडून ठेवणे, डाग पडणे हे होतच असते, त्यामुळेच िभतींचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी जलावरोधी उत्पादने वापरणे योग्य होईल.
मुलाच्या खोल्यांकरिता वापरण्याजोगे रंग तुम्हाला मुलगा असो वा मुलगी, पिवळा हा तुमच्या मुलाच्या खोलीकरता उत्तम रंग आहे. हा अनेक छटांमध्ये उपलब्ध असल्याने मुलाच्या व्यक्तिमत्त्वानुसार सौम्य किंवा गडद रंगात खोली रंगवता येईल.
निळा हा आकाशाचा तसेच समुद्राचाही रंग आहे, ज्यातून शांतता प्रतीत होते. हा शीत, शमनकर्ता आणि व्यवस्थितपणाचा अनुभव देणारा रंग आहे. निळ्या रंगामुळे आपल्या मनाला शांतता प्रदान करणारा रंग आहे. हा रंग मेंदू शांत करण्यास मदत करतो व त्यामुळे झोप लागण्यास मदत होते.
मुलीची खोली रंगविताना लोकांच्या मनात पहिला विचार येतो तो गुलाबी रंगाचा. ही जुनी संकल्पना असली तरी तरुण मुलींच्या खोलीकरितासुद्धा हा खूप योग्य रंग ठरू शकेल.
बऱ्याच जणांचे असे मत आहे, की पांढरा रंग हा मुलांच्या खोलीकरिता अयोग्य रंग आहे. यावर सहजपणे डाग पडू शकतात. पण उजळ पांढरी खोली वेगवेगळ्या रंगांनी व्यवस्थितरीत्या रंगवून काढली तर तुमच्या मुलांकरिता उत्तम ठरू शकेल.
आपल्या मुलाची खोली रंगविण्याचे ठरविण्याआधी सुरू  आपल्या मुलाचे वय, तुमचे अंदाजपत्रक आणि तुमच्या मुलाचा आवडता रंग आणि उपक्रमांनुसार खोलीचा चेहरामोहरा पुन्हा बदलणार आहात का, या गोष्टींचा विचार करण्यासाठी थोडी सवड काढा. योग्य रंग आणि थीम निवडण्याने ही पूर्ण प्रक्रिया मजेदार आणि अर्थपूर्ण होऊन जाते. तेव्हा तुमच्या मुलाच्या खोलीला योग्य रंगांनी रंगवा आणि हल्लागुल्ला, मौज आणि उत्साह यांचे स्वागत करा...

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो