‘केटीएचएम’मध्ये आविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धा
|
|
|
|
|
नाशिक / प्रतिनिधी येथील के.टी.एच.एम. महाविद्यालयात पुणे विद्यापीठाच्या सूचनेनुसार विद्यार्थी संशोधन प्रकल्प स्पर्धा ‘आविष्कार’चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा एक डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत होणार आहे.
स्पर्धा ह्युमनटिझ, लॅग्वेंज, फाइन आर्टस, कमर्शिअल अॅण्ड मॅनेजमेंट, प्युर सायन्स, अॅग्रीकल्चर अॅण्ड अॅनिमल हंबड्री, इंजिनीअरिंग अॅण्ड टॅक्नोलॉजी आणि मेडिकल अॅण्ड फार्मसी या सहा प्रकारात होणार आहे. स्पर्धेत नाशिक विभागातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, निफाड व नाशिक तालुक्यांतील पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये सहभागी होऊ शकतील. स्पर्धेबाबतची सर्व माहिती पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी आपले अर्ज प्राचार्यामार्फत २४ नोव्हेंबपर्यंत आविष्कारचे समन्वयक डॉ. आर. बी. टोचे यांच्याकडे जमा करावेत. तसेच अधिकाधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी केले आहे. |