नाशकात उद्यापासून संभाजी ब्रिगेडचे महाअधिवेशन
मुखपृष्ठ >> नाशिक वृत्तान्त >> नाशकात उद्यापासून संभाजी ब्रिगेडचे महाअधिवेशन
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

नाशकात उद्यापासून संभाजी ब्रिगेडचे महाअधिवेशन Bookmark and Share Print E-mail

०  मराठा आरक्षणसह विविध विषयांवर चर्चासत्र
० ‘शिवाजी अंडरग्राउंड..’चा प्रयोग
नाशिक / प्रतिनिधी
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडतर्फे १० ते ११ नोव्हेंबर या कालावधीत सहाव्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे येथे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन कोल्हापूर संस्थानचे युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने मराठा आरक्षणासह विविध विषयांवर चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून त्या विषयांवर संघटना पुढील वर्षभर काम करणार आहे.
या अधिवेशनाची रूपरेषा व पूर्वतयारीची माहिती ब्रिगेडचे प्रदेश महासचिव मनोज आखरे व जिल्हाध्यक्ष गणेश कदम यांनी गुरूवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ‘व्यवस्था परिवर्तन’ हे अंतिम उद्दीष्ट ठेवून युवकांना प्रेरणा देण्याचे काम या माध्यमातून केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई नाका येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात होणाऱ्या महाअधिवेशन स्थळास ‘समाजभूषण इंजि. एम. पी. देवरे नगरी’ असे नांव देण्यात आले आहे. पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी नऊ वाजता भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. त्यानंतर सकाळी अकरा वाजता महाअधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून बडोदा संस्थानचे महाराजा समरजित गायकवाड, ग्वाल्हेर संस्थानचे ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय गृहराज्यमंत्री प्रतीक पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पहिल्या सत्रात ‘जागतिकीकरण, खासगीकरण, उद्योगीकरण, युवकांपुढील आव्हाने व आजची शिक्षणपद्धती’, दुसऱ्या सत्रात ‘माजी प्रदेशाध्यक्षांचे अनुभव आणि अपेक्षा’, ‘प्रसारमाध्यमांची सामाजिक जबाबदारी’ या विषयावर चर्चासत्र होईल. रात्री नऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमात ‘द शिवाजी अंडरग्राउंड इन भिमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. राजकुमार तांगडे लिखीत हे नाटक असून त्याचे दिग्दर्शन नंदु माधव यांनी केले आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ ते दहा या कालावधीत शाहिरी कार्यक्रम होईल. त्यानंतर सकाळी दहा वाजता चौथे सत्र ‘मराठा आरक्षण - आजचे वास्तव व भूमिका’ या विषयावर होणार आहे. त्यात ब्रिगेडचे कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर, ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रदीप कोंढरे, राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार सहभागी होणार आहेत. पाचव्या सत्रात दुपारी साडे बारा वाजता ‘धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक दहशतवाद’ या विषयावर चर्चा केली जाणार असल्याची माहिती आखरे यांनी दिली.
समारोपाच्या सत्राच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. इंजि. पुरूषोत्तम खेडेकर राहणार आहेत. याप्रसंगी छत्रपती संभाजी राजे गौरव पुरस्कार, मराठा समाज गौरव पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. पुरस्कार्थीची नांवे त्याच दिवशी जाहीर केली जाणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यावेळी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, महाअधिवेशनाच्या यशस्विततेसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. बाहेरून येणाऱ्या कार्यकर्त्यांची निवास व भोजनाची व्यवस्थाही केली जाणार असल्याचे संयोजकांनी म्हटले आहे. महाअधिवेशनात पुस्तक विक्रीसाठी स्टॉलही उभारले जाणार आहेत.   

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो