येस, आय अ‍ॅम..
मुखपृष्ठ >> बालमैफल >> येस, आय अ‍ॅम..
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

येस, आय अ‍ॅम.. Bookmark and Share Print E-mail

मेघना जोशी - रविवार ११ नोव्हेंबर २०१२

नीनाआजीच्या ‘नाचू आनंदे’ शिबिरात आज फारच लगबग चालली होती. १४ नोव्हेंबर म्हणजे बालदिनानिमित्त शिबिरात आज धमाल कार्यक्रम होणार होते. त्यासाठी सारी बच्चेकंपनी नटूनथटून आनंदात, उत्साहात कधीचीच हजर होती. त्यात हसरी मीरा होती, अवखळ रोहीत होता, उत्साही मैत्रेयी होती, शहाणा कार्तिक होता, तसाच रडका राहुल होता. दंगेखोर नीरज होता. चिडचिडी आदिती होती, तक्रारखोर मधुरा होती आणि सतत मागे मागे राहणारा चिनूही! नीनाआजीचं हेच वैशिष्टय़ होतं, ती प्रत्येकाला अगदी त्याच्या गुणदोषांसह ओळखत असे. तिच्या दृष्टीने आजचा कार्यक्रम चिनू आणि त्याच्या मम्मी-पप्पांसाठीच होता. खरं तर चिनूकडे अनेक चांगले गुण होते पण तो आणि त्याचे आई-बाबा सर्वाचाच समज होता की, चिनूला काहीच येत नाही. या समजामुळे आत्मविश्वासच नव्हता चिनूमध्ये! सतत मागेच राहायचा तो. त्यामुळे कोणी सामावूनही घेत नसे त्याला. नीनाआजीने आजची नाटिका चिनूसाठीच बसवली होती. त्यामुळे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीपासूनच तिचं चिनूवर सारं लक्ष होतं. मागे बसलेला, काळवंडलेल्या चेहऱ्याचा, माझ्यात काहीच अर्थ नाही, मला काहीच येत नाही असा विचार मनातल्या मनात करणारा चिनूही आत्ताही तसाच बसला होता, खांदे पाडून!
इतक्यात, स्टेजवर नाटिका सुरू झाली. इतर सर्वाप्रमाणे चिनूही तल्लीनतेने ती पाहू लागला. छोटी मृण्मयी, काळ्या रंगाचा मेकअप करून काळ्या मातीची पणती बनून स्टेजवर आली. खरं तर बंगल्याच्या अडगळीच्या खोलीत ठेवलेल्या बॉक्समध्ये अनेक पणत्या होत्या. छोटय़ा, मोठय़ा, रंगीत, मणी, खडे, आरसे यांनी सजलेल्या त्यातलीच ही इटुकली पिटुकली काळ्या रंगाची अजिबात लक्ष वेधून न घेणारी पणती! बॉक्समधल्या इतर सगळ्या तिला हसायच्याच. कोणी रंगरूपावरून, कोणी चणीवरून, कोणी आकारावरून, तर कोणी इतर कशावरून. लाल रंगाची, पाच वातींची, खडे- मण्यांनी सजलेली ती मोठ्ठी पणती तर सतत टोमणेच मारायची. त्या लाल पणतीची जागा बंगल्याच्या प्रवेशद्वारावर असायची ना! त्यामुळे तिचा खूपच तोरा होता. येणारा-जाणारा प्रत्येकजण माझ्याकडे कसा निरखून पाहतो, माझी कशी स्तुती करतो, माझ्या सौंदर्याची कशी तारीफ करतो, हे ती बॉक्समध्ये वर्षभर सांगायची. बाकीच्या साऱ्याही तिच्याभोवती गोळा व्हायच्या. स्वत:चंही गुणवर्णन कारायच्या. त्यामुळे ही काळी, इटुकली- पिटुकली विझूनच जायची. ‘माझ्याकडे काहीच चांगलं नाही का गं?’ थोडय़ाशा मोठय़ा निळ्या पणतीला तिनं विचारलं. त्यावर ‘तेलात कधी चेहरा पाह्य़लास का?’ असं ती निळी पणती फणकाऱ्यानं म्हणाली आणि ही काळी पणती फारच हिरमुसली. तेव्हापासून ती सतत एकटी एकटी बसू लागली, अबोल झाली, इतरांमध्ये मिसळेचना. बॉक्सच्या तळातल्या कोपऱ्यात चिडीचूप बसू लागली. मनातल्या मनात स्वत:ला दोष देऊ लागली. ‘मला कोण विचारतंय, माझ्याकडे रंग ना रूप, मी वाईट्टच आहे, काहीही चांगलं नाहीये माझ्यात.’ असाच विचार करू लागली. आणि त्यामुळे अधिकाधिक मलूल झाली. आधीच इवलीशी ती एकदम बिच्चारीच झाली. खाकी आणि पिवळ्या पणत्यांनी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न एकदोनदा करून पाह्य़ला. पण छे, तिचा काहीही प्रतिसाद नाही म्हणून शेवटी त्यांनी नादच सोडून दिला आणि ही पणती एकटी पडली, अगदी एकटी..
आज दिवाळीची तयारी करताना बंगल्यातील नोकरांनी तो बॉक्स काढून सगळ्या पणत्या बाहेर काढल्या. मालकिणीबरोबर ते कुठली पणती कुठे लावायची याची  चर्चा करत होते. साहजिकच लाल पणती प्रवेशद्वारावर, निळी पोर्चमध्ये, नारिंगी पायरीवर, पिवळी कुंपणावर, जांभळी हॉलमध्ये, सप्तरंगी रांगोळीच्या मधोमध, चमकीने नटलेली देवापाशी, आरसेवाली तुळशीपाशी, इतर साऱ्या बाल्कनीच्या कठडय़ावर असं ठरत होतं. ही काळी, छोटुकली कान देऊन ऐकत होती. पण छे, नोकराने तिच्याबद्दल काही न बोलताच तिला बाजूला ठेवलं आणि तो उरलेल्या पणत्यांबद्दल बोलू लागला. या पणतुलीला फारच दु:ख झालं, खूप रडू आलं. आपला उपयोग नसेल तर पुन्हा मातीच होऊन जावं, असं वाटलं आणि वाहणारे डोळे, रडून लाल झालेलं नाक घेऊन ती झटक्यात बंगल्याबाहेरच पडली.
बाहेर पडता पडता गेटवरच तिला हसण्याचा आवाज आला. तिने पाहिलं तर रस्त्यावरचा हॅलोजन लॅम्प आणि गेटवरचे दिवे हसत होते; कसले खिदळतच होते. ‘हसणारच ते मला, मी कुठे कुठल्या वाटसरूला वाट दाखवतेय की बंगल्याची शोभा वाढवतेय.’ तिच्या मनात विचार आला आणि तिला जोराचा हुंदकाच फुटला. त्या हुंदक्यामुळे तोल जाऊन ती गटारातच पडणार होती, पण थोडक्यात वाचली. हे सारं पाहून गालातल्या गालात डोळे मिचकावून हसणाऱ्या निऑन साइन्स तिला दिसल्या. टय़ुब्सही हसतच होत्या. ते पाहून तिला फारच वाईट वाटलं आणि तिनं वेग वाढवला. वेगात चालताना ती अडखळली, ठेचकाळली, पण थांबली नाही. एका घरासमोरच्या निरांजनानं तिला म्हटलंही,  ‘राणी, सावकाश जा, पडशील बेटा’, पण तिने त्याकडे लक्षच दिलं नाही. एका टॉर्चने तिचा पाठलाग करायचा प्रयत्न केला तर ही रस्त्याच्या कडेने धावतच सुटली. बैलगाडीच्या कंदिलाने तिला धावताना पाहून मानही हलवली, गाडय़ांच्या हेडलाईटस्नी जाता जाता तिच्याकडे कटाक्षही टाकला. एका छोटय़ा मंदिरातल्या समईने आणि लामणदिव्याने तिला जोरजोरात हाकाही मारल्या. पण छे, ते ऐकून न ऐकल्यासारखं करत ती धावतच होती, जोरजोरात धावत होती. शेवटी ती एवढी थकली की, तिचं एकही पाऊल पुढे पडेना. तेव्हा गलितगात्र होऊन एका घराच्या कुंपणाशेजारी पडली आणि गाढ झोपूनच गेली. तशीच रात्र चढत गेली आणि उतरलीही. सकाळी सूर्य वर येताच सारे-निरांजन, समई, टॉर्च, कंदील, बल्ब, टय़ुब शांत झाले. ही पणती खूप दमल्याने गाढ झोपेतच होती. इतक्यात कुंपणाशी कचरा काढणाऱ्या वरदच्या आईला ती दिसली. बघताक्षणी ती पणती एवढी आवडली की तिला पटकन उचलून घेत आईने छोटय़ा वरदला हाका मारत म्हटलं, ‘शेजारी विचार बरं वरद, कोणाची ही पणती?’ वरद सगळ्यांना विचारून आला. कोणाचीच नव्हती ती. ‘आई, ही कोणाचीच नाहीय्. आपणच वापरूया ना.’ आईला लाडीगोडी लावत पणती कुरवाळत तो म्हणाला. त्या स्पर्शाने पणतुली जागी झाली. ‘कित्ती सुंदर आहे ना गं ही’ वरदचं हे वाक्य ऐकून ही दचकलीच. काल खूप खूप चालल्याने ती दमली होती, मळली होती. वरदने तिला स्वच्छ धुऊन कोरडय़ा फडक्याने पुसली. ‘मला हिचा काळा रंग खूपच आवडला’. वरदच्या ताईच्या या वाक्यावर पणतुलीचा विश्वासच बसेना. संध्याकाळी तिच्यात वात घालून आजीने तिला तुळशी वृंदावनापाशी ठेवलं आणि ही कित्ती कमी जागेत मावते, असा कौतुकाचा वर्षांव केला. या पणतीतून तेल पाझरत नाही, हे ताडून आईने तिला देवापाशीही लावलं. धनत्रयोदशी दिवशी धनेगुळाच्या ढीगावर ती ताठ मानेनं बसली. नरकचतुर्दशीच्या पहाटे आईने तिची वात दक्षिणेकडे येईल अशी तिला ठेवून यम म्हणजे मृत्यूच्या देवतेला वंदन केलं तेव्हा ती शहारलीच. लक्ष्मी-पूजनाच्या दिवशी लक्ष्मी कुबेराच्या पूजनाच्या त्या सर्वात काळ्या रात्री ती रात्रभर तेवत होती म्हणून दुसऱ्या दिवशी तिच्यावर कौतुकाचा सडाच पडला. वरदच्या ताईने काढलेल्या छोटय़ा रांगोळीच्या मधोमध बसून ती उजळून टाकत तिने कुंपणावरच्या दिव्यांकडे हसरा कटाक्षही टाकला. आयुष्यात पहिल्यांदाच तिला समजलं की आपल्यातलं तेल पाझरत नाही, आपला आकार सुबक आहे, आपण तासन् तास तेवू शकतो, आपल्या प्रकाशामुळे सुंदर गोष्टींच्या सौंदर्यात भर पडते. आपण अनेकांना आनंद देऊ शकतो.. आणि तो अत्युच्य कोटीचा क्षण तिच्या आयुष्यात आला. वरदच्या बाबांनी त्यांच्या लहानपणीची आठवण म्हणून तिला आकाशकंदिलात बसवलं तो क्षण! त्यावेळी तिच्यापासून पडणारा रंगीबेरंगी प्रकाश पाहून तिचा आनंद गगनात मावेनाच. तिला काय करू नि काय नको असं होऊन गेलं. आकाशकंदिलात बसल्या बसल्या तिच्याकडे पाहून डोळे मिचकावत हसणारी चंद्रकोर तिला दिसली आणि तिचा उत्साह द्विगुणीत झाला. ती आनंदाने जोरजोरात ओरडली, ‘येस, आय अ‍ॅम  स्पेशल!’
नाटिका संपली, पडदा पडला. त्याबरोबरच पुढच्या ग्रिटिंग्ज बनविण्याच्या खेळाची अनाउन्समेंट झाली. ती ऐकून सगळ्यात आधी उठलेली चिनू आणि लाडाने त्याचा चेहरा कुरवाळणारी त्याची आई पाहून नीनाआजीला आजचा बालदिन सत्कारणी लागला, हे जाणवलं. सर्वाच्या नकळत तिने डोळे टिपले आणि सगळ्यांसोबत कवी मंगेश पाडगावकरांच बोलगाणं ती म्हणू लागली..
ज्याच्या घरी अंधार असेल, अश्रूंवाचून काही नसेल
त्याच्या घरी एकदा तरी एक दिवा लाव.
तेल नाही, वात नाही, आधाराचा हात नाही
त्याच्या घरी एकदा तरी एक दिवा लाव.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो