रसग्रहण : बहुआयामी व्यक्तित्वाचा वेध
मुखपृष्ठ >> रसग्रहण >> रसग्रहण : बहुआयामी व्यक्तित्वाचा वेध
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

रसग्रहण : बहुआयामी व्यक्तित्वाचा वेध Bookmark and Share Print E-mail

प्रा. रेखा अरुण मैड - रविवार ११ नोव्हेंबर २०१२

मराठी भाषा आणि साहित्याला नव्या वाटावळणांनी समृद्ध करणाऱ्या मराठवाडय़ाच्या प्रतिभासंपन्न भूमीतील ज्येष्ठ लेखक व समीक्षक तु. शं. कुलकर्णी. साहित्याच्या प्रत्येक क्रांतिकारी टप्प्याची डोळस नोंद अधोरेखित करत कथा, कविता आणि समीक्षा प्रांतात त्यांनी आपला वैशिष्टय़पूर्ण ठसा उमटविला. संपादन, अनुवाद क्षेत्रातील त्यांचे प्रभुत्वही लक्षणीय ठरले.

मराठवाडय़ाच्या भूमीत त्यांनी केलेली काव्यविषयक नवजाणिवांची रुजवण व त्यांची प्रयोगशीलता वाङ्मयेतिहासात मात्र पुरेशा आस्थेने नोंदली गेली नाही. या साहित्यपंढरीच्या वारकऱ्याचे बहुलक्ष्यी साहित्य एकत्रितपणे आस्वादता, अभ्यासता यावे यासाठी प्रकाश मेदककर यांच्या संपादकत्वाखाली दर्पण प्रतिष्ठानने ‘निवडक तु. शं.’ हा ग्रंथ सादर केला आहे. तु. शं.चे निवडक साहित्य, त्यांच्या साहित्याचा र्सवकष आढावा घेणारी प्रस्तावना, भाषणे, मुलाखती आणि त्यांच्या कथा-कवितासंग्रहांना लाभलेल्या वा. ल. कुलकर्णी, नरहर कुरुंदकर आदी समीक्षकांच्या मर्मग्राही प्रस्तावना यांतून त्यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व उलगडले आहे.
तु. शं.नी १९५१ पासून लेखनास सुरुवात केली. औरंगाबादेतील पाच दशकांच्या वास्तव्यात त्यांनी विविधांगी आणि विपुल लेखन केले. या ग्रंथात लेखकातील अंतर्बाह्य़ ‘मी’चा शोध घेत त्यांच्या बहुआयामी व्यक्तित्वाचा वेध घेतलेला आहे.
मर्ढेकर, जी. ए., बी. रघुनाथ, नरहर कुरुंदकर यांच्या वाङ्मयीन जाणिवांचे खोल संस्कार तु. शं. यांचा प्रातिभधर्म घडवत गेले. असे असले तरी एका विशिष्ट वळणावर स्वत:चा अंत:सूर पकडत स्वत:चे वेगळेपणही त्यांनी सिद्ध केले. महानगरातला अस्वस्थ, एकाकी, उसवलेला, मूल्यऱ्हासाच्या जाणिवेने धास्तावलेला, क्षुद्रत्वाच्या जाणिवेने पछाडलेला आणि असंज्ञ स्तरावर भरकटलेला माणूस ही नवकथेची आशयसूत्रे. या सूत्रांसाठी तु. शं.नी निवडलेली पाश्र्वभूमी मात्र नवकथेपेक्षा वेगळी होती. निजाम राजवटीत त्यांनी अनुभवलेलं जितंजागतं वास्तव त्यांच्या अंतर्यामातील खळबळींसह त्यांच्या कथेतून अभिव्यक्त झालं.
तु. शं.ची कविता स्थूलमानाने रेगे, मर्ढेकरांशी नाते असलेली, असे म्हणत असतानाही ‘निवडक तु. शं.’मधील अनेक कवितांपाशी आपण थबकतो व नव्या प्रयोगशीलतेच्या प्रत्ययाने भारावून जातो. भावनिक क्षुब्ध प्रतिक्रिया आणि तटस्थ भावनिक समतानता ही त्यांच्या कवितेची वैशिष्टय़ं त्यांच्या कवितेबाबत सजग कुतूहल जागे करते.
या ग्रंथातील तु. शं.ची समीक्षा ही त्यांच्या चतुरस्र व्यासंगाची साक्ष होय. उर्दू, इंग्रजी आणि मराठी साहित्याच्या चिंतन-मननाने समृद्ध झालेले त्यांचे मन व्यापक जीवनजाणिवांसह त्यात अभिव्यक्त होते. मराठीतील कलामूल्यांनी विनटलेल्या साहित्यकृती, लेखकाच्या मनावर गारूड केलेले व आस्थाविषय झालेले प्रतिभावंत आणि समकालीन बंडखोर साहित्यकृती अशा तीन प्रकारांत त्यांनी समीक्षालेखन केले आहे. या त्यांच्या समीक्षालेखनाला समीक्षाप्रकारांच्या काटेकोर फूटपट्टय़ा लावता येणार नाहीत, पण त्यांच्या समीक्षालेखनाने एकंदर समीक्षा- व्यवहाराला नवी डूब देण्याचे, नव्या पाऊलखुणांचे निर्देश करण्याचे काम निश्चितच केले आहे. मर्ढेकर, बी. रघुनाथ, नरहर कुरुंदकर, जी. ए. यांच्या साहित्याची चिकित्सा करताना त्यांची लेखणी प्रगल्भतेचा वेगळाच प्रत्यय देते. ‘माहीमची खाडी’, ‘चक्र’, ‘वैतागवाडी’ इ. साठोत्तरी, बहुचर्चित कलाकृतींवर लिहिताना केवळ गोडवे न गाता त्यांतील कलामूल्ये, सौंर्दयमूल्ये यांची परखड चिकित्सा त्यांनी केली आहे. ‘प्रतिष्ठान’, ‘स्वातंत्र्योत्तर मराठी कविता’ इ. संपादनांतून त्यांनी नव्या पिढीतील कवींचा चोखंदळ वृत्तीने घेतलेला शोध ही त्यांच्या विचक्षण संपादनाची साक्ष होय. उर्दू व इंग्रजीतील कलाकृतींचे, त्यांतील प्रतिभावंतांच्या जीवनजाणिवांचे त्यांनी केलेले मराठी अनुवादही उत्कट उतरले आहेत. ‘निवडक तु. शं.’मधील प्रत्येक दालनात एक नितळ, पारदर्शी, परखड व कलानंदाचा ध्यास घेतलेला कलावंत उलगडत जातो.
या ग्रंथाला लाभलेली प्रकाश मेदककर यांची प्रस्तावना कलानंदाची रेखीव मांडणी करते. तु. शं.च्या वाङ्मयीन प्रवासातील विकाससूत्रे समोर ठेवते आणि त्यांचा प्रातिभधर्म अधोरेखित करते.   
‘निवडक तु. शं.’,
संपादक- प्रकाश मेदककर,
 दर्पण प्रतिष्ठान, नांदेड.
पृष्ठे -३८५, किंमत- ५५० रु.

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो