पहिल्या महाराष्ट्रीय महिला इंग्रजी कादंबरीकार वेणू चितळे
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पहिल्या महाराष्ट्रीय महिला इंग्रजी कादंबरीकार वेणू चितळे Bookmark and Share Print E-mail
रविवार विशेष
अरविंद व्यं. गोखले
इंग्रजी भाषेचे दालन भारतीय लेखकांनी फार पूर्वीच ठोठावले आहे. त्यात त्यांनी उत्तमपैकी लिखाणही केले आहे. इंग्रजीत लिहिणाऱ्या अनेक महिलाही होऊन गेल्या, पण एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात फार थोडय़ा मराठी महिलांनी इंग्रजीतून लिहून नाव कमावले आहे. ‘द स्टोरी ऑफ माय लाईफ’ लिहिणाऱ्या दोसेबाई का़वसजी जेस्सावाला या मुंबईच्या, मोठय़ा बंडखोर लेखिका. त्यांच्या या पुस्तकालाही पुढल्या वर्षी बरोबर शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. शोभा डे, नमिता गोखले, शशी देशपांडे ही काही वानगीदाखल लेखिकांची नावे. या सर्व लेखिका इंग्रजी उत्तम लिहितात, त्यांचे नावही होत असते. मला असेच एक नाव शोधता शोधता मिळाले. त्या आहेत वेणू चितळे. त्यांनी लिहिलेल्या ‘इन ट्रान्झिट’ या कादंबरीने त्या काळात भरपूर नाव कमावले होते. या कादंबरीला गेल्याच महिन्यात बरोबर पन्नास वर्षे पूर्ण झाली.
वेणू चितळे हे त्यांचे नाव तसे लक्षवेधक, पण परिचयाचे नाही, तरीही त्यांचे नाव ऐकलेले. विसाव्या शतकातले दुसरे वा तिसरे दशक. म्हणजे लोकमान्यांनंतरचा कालखंड. पुणे शहर तेव्हा कसे होते, इथला मध्यम वर्ग कसा होता, त्याने बदल स्वीकारला होता का, आदी बरेच विषय उत्सुकतेचे होते. त्याचेही कारण असे की, माझ्या मित्राने पाठवलेली एक कादंबरी वाचताना मती गुंग होत होती.
म्हणूनच माझी उत्सुकता शिगेला पोहोचली. वेणू चितळे या कोण त्याचा मी शोध घेऊ लागलो. गुगल हे सर्च इंजिन आवडणारे, त्यावर शोध घेतला, तेव्हा लक्षात आले की, वेणू चितळे या बी.बी.सी.वर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वृत्तनिवेदिका होत्या. त्यावेळी मुल्कराज आनंद आणि जॉर्ज ऑर्वेल त्यांच्याबरोबर होते. सांगायचा मुद्दा हा की, एक मराठी मुलगी स्वातंत्र्यपूर्व काळात युद्धाच्या बातम्या सांगत होती.
या कादंबरीत त्या काळच्या सदाशिव पेठी ब्राह्मण कुटुंबाचे वर्णन आहे. तीन पिढय़ांचे हे वर्णन त्यांनी अतिशय खुसखुशीतपणे केले आहे. त्या काळचा इतिहास, त्या काळचे पुणे ज्यांना माहीत करून घ्यायचे असेल, त्यांनी ही कादंबरी वाचायला हवी. त्या काळचे लग्नसमारंभ, निघणाऱ्या वराती, घरातल्या कुजबुजी, असे बरेच काही त्यात आहे. ‘हो, मला माहीत आहे की, माधवनेही आम्हाला गृहीत धरले आहे. सराफांच्या घरात आम्ही पुण्याला राहायला जाणार हे त्यानं गृहीत धरलंय. आया, युसुफ आणि मांजरीची पिल्लं आम्ही घेऊन जाणार, असं त्याला वाटतंय,’ या अर्थाची काही वाक्ये त्यात सापडतात किंवा ‘एकदा आम्हाला आमचे राजकीय अधिकार मिळाले की ब्राह्मण मंडळी आम्हाला अस्पृश्य मानणार नाहीत,’ असेही त्या काळाचे साधम्र्य त्यात आढळते. या कादंबरीचा कालखंड १९१५ ते १९३५ दरम्यानचा आहे. १९१५ मध्ये वेणू चितळे अवघ्या तीन वर्षांच्या होत्या. (निधन १९९५) काळ कसा बदलत असतो, माणसेही कशी परिस्थितीशी जुळवून घेत पुढे जातात याचे अप्रतिम वर्णन या ५०४ पानांच्या कादंबरीत आपल्याला पाहायला मिळते. १९२९ च्या लाहोर काँग्रेसचेही वर्णन यात आहे. या कादंबरीला पुणे विद्यापीठाचे तेव्हाचे कुलगुरू बॅ. एम.आर.जयकर यांची प्रस्तावना आहे. या कादंबरीची मध्यवर्ती भूमिका ही स्वातंत्र्यपूर्व काळ रेखाटणारी आहे, माणसेही कशी प्रगत बनतात ते सांगणारी आहे. त्या काळचे मराठी कुटुंब कसे राहायचे याचे उत्कृष्ट वर्णन आपल्याला अन्य कुठे पाहायला, वाचायला मिळणार नाही. त्या काळचे राजकारणही आपल्याला यात वाचायला मिळते. बापू, दादा, माई, आबा, मोहना, बाळ, बबन, पद्मावती, बाबासाहेब अशी काही पात्ररचना यात आढळते. तेव्हाच्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधीजींनी अस्पृश्यता जगण्यापेक्षा हिंदुत्ववाद मेलेला मला आवडेल, असे जे मत व्यक्त केले होते तेही यात संवादरूपाने आले आहे. त्या काळचा सत्याग्रहही यात व्यवस्थित चितारण्यात आला आहे. राजकारणाचा बदलणारा पोत यात ठळकपणे अधोरेखित करण्यात आला आहे. मुल्कराज आनंद यांनी खास एका पत्राद्वारे एवढी मोठी कादंबरी समर्थपणे पेलल्याबद्दल अभिनंदन केले. ‘हिंद किताब्ज’ या मुंबईच्या प्रकाशकांनी ही कादंबरी प्रकाशित केली होती.
या लेखिकेबद्दल मनात कुतूहल होते. चितळे आडनाव असणारी किती कुटुंबे त्या काळात पुण्यासारख्या शहरात असतील, असा मनातून विचार केला. वेणू चितळे नाव शोधताना असा विचार मनात आला की, त्या भाई चितळे यांच्यापैकी कुणी असतील का ते पाहू आणि आश्चर्य म्हणजे त्या भाईंच्या धाकटय़ा भगिनी असल्याचे समजले. पुण्यात त्या काळात चितळे यांची दहा-वीस घरे असतील असे नाही. कॉम्रेड विष्णुपंत चितळे यांचे घर तेव्हा सदाशिव पेठेत होते. ते फलटणचे. त्यांचे वडील गूळवाले चितळे म्हणून ओळखले जायचे. वेणू चितळे या त्यांच्या कन्या आणि विष्णुपंतांच्या भगिनी. विष्णूपंत हे एकीकडे अध्यात्मवादी आणि दुसरीकडे कट्टर मार्क्‍सवादी विचारवंत. आता प्रश्न पडला तो पुणे वा फलटण सोडून त्या इंग्लंडला का गेल्या़  हाच प्रश्न मी त्यांच्या कन्या ज्योत्स्ना दामले यांना विचारला. दामले या पुण्यात प्रभात रोडवर राहतात. त्यांनी सांगितलेली माहिती थक्क करून सोडणारी आहे. वेणू चितळे यांचे जन्मगाव कोल्हापूर जिल्ह्य़ातले शिरोळ. त्यांचे वडील वैद्य होते. आई लहानपणी वारल्याने शिक्षणासाठी थोरल्या बहिणीकडे पुण्याला त्यांना पाठवायचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीचे त्यांचे शिक्षण हुजूरपागेत झाले. त्यांच्या एका भावाने मुंबईत विलेपार्ले येथे बिऱ्हाड केले होते. त्यामुळे वेणू यांनी मुंबईत जायचा निर्णय घेतला. मुंबईत ग्रँट रोडवर नाना चौकात असणाऱ्या ‘सेंट कोलंबो’मध्ये वेणू चितळे यांना प्रवेश मिळाला. पार्ले ते ग्रँट रोड असा रोजचा प्रवास सुरू झाला. तसा त्या काळी लांबचा वाटणारा हा प्रवास टाळण्यासाठी त्यांना मग होस्टेलवर ठेवण्यात आले. वेणूचे लग्न हे तिच्या बहिणीच्या नवऱ्याला घातक ठरेल, अशी कुणीतरी भीती घातल्याने त्यांचे काय करायचे, असा तिच्या घरच्यांपुढे प्रश्न होता. आता हे सगळे सांगायला त्या काळचे प्रतिनिधी कुणी नसले तरी कादंबरीतल्या काही प्रसंगांवरून हा अंदाज बांधता येतो. तिथे त्यांना शिकवायला विनी डय़ुप्ले या शिक्षिका होत्या. तिथल्या शिक्षणासाठी वेणू यांना शिष्यवृत्ती होती. त्यांच्या नशिबाने त्यांना शिकवायलाही फार मोठी मंडळी लाभली. मादाम मॉन्टेसरी त्यांना शिकवायला होत्या. वेणू यांना आपण लंडनला घेऊन जाऊ इच्छितो, असे डय़ुप्ले यांनी म्हणताच त्यांना आनंदाने परवानगी देण्यात आली. डय़ुप्ले यांनी त्यांचा उत्तम सांभाळ केला. दरम्यान, त्यांनी ‘बीबीसी’त मुल्कराज आनंद ‘जॉर्ज ऑर्वेल’ बरोबर काम केले. दुसऱ्या महायुद्धात त्या ‘बीबीसी’वर वृत्तनिवेदिका होत्या. गोड आवाजाच्या निवेदिका म्हणून त्या प्रसिद्धीस आल्या. जॉर्ज ऑर्वेल यांच्या युद्धकाळातल्या आठवणींचा, लेखांचा जो संग्रह प्रसिद्ध झाला, त्यात वेणू चितळे यांचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे. ‘बीबीसी’वर सेंट मॅथ्यूज यांच्या गॉस्पेलच्या दुसऱ्या प्रकरणाचे वाचन त्यांनी केले, याचाही उल्लेख ‘बीबीसी’च्या कागदपत्रांत सापडतो. जॉर्ज ऑर्वेल यांच्या आग्रहावरून त्यांनी डेस्मंड हॉकिन्स यांच्या साहित्यविषयक कार्यक्रमांतही भाग घेतला होता. ऑर्वेल, मुल्कराज आनंद, बलराज सहानी, झेड.ए.बुखारी यांच्या बरोबरीने काम करायची संधी आणि त्यांच्या बरोबरीने केला जाणारा उल्लेख ही त्यांची सर्वात मोठी झेप मानली जायला हवी. युद्धानंतर वेणू चितळे यांनी लंडनमध्येच ‘इंडिया लीग’चे काम केले. लंडनमध्ये त्यांची आणि विजयालक्ष्मी पंडित यांची गाठ पडली. विजयालक्ष्मी यांनी त्यांना आपल्या सचिवपदावर नेमून त्यांच्या भाषाशैलीचा आणि नेतृत्वगुणांचा गौरव केला. विजयालक्ष्मी जेव्हा महाराष्ट्रात राज्यपालपदी आल्या तेव्हा आपल्याला मराठीतून भाषण करायचे असल्याचे त्यांनी सांगताच वेणूताईंनी ते त्यांना लिहून देऊन त्यांची शाबासकी मिळवली. व्ही.के.कृष्ण मेनन, के.आर.नारायणन, एम.सी.छगला हे त्यांचे व्यक्तिगत मित्र होते.
वेणू चितळे यांचा विवाह त्यांच्या वयाच्या चाळिशीत झाला. गणेश खरे हे त्यांचे पती. खरे यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. आधीच्या दोन मुलांचा सांभाळ त्यांनी लीला गणेश खरे म्हणून उत्तम केला. त्यांच्यापैकी बाबल्या हा पुढे गेला, तेव्हा त्याच्यावरही त्यांनी एक पुस्तक लिहिले, त्याचे नाव बाबल्या. वेणू चितळे यांच्या एका बंधूंनाही (यशवंत) बाबल्या म्हणत असत, त्यांना त्यांनी ‘इन ट्रान्झिट’ ही कादंबरी समर्पित केली आहे. ‘इन ट्रान्झिट’ लिहून त्या थांबल्या नाहीत. लग्नानंतरही त्यांनी ‘इन कॉग्निटो’ ही दुसरी कादंबरी लिहिली. ती मात्र त्यांनी नुसतीच वेणू या नावाने लिहिली. लिखाण आणि वाचन हा त्यांचा ध्यास होता. मराठी पताका चक्क इंग्लंडमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात फडकवणारी ती पहिली महाराष्ट्रीय कादंबरीकार होय.
 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा. 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो