घडामोडी- औरंगाबाद : प्रताप मंत्र्यांचा!
मुखपृष्ठ >> मराठवाडा वृत्तान्त >> घडामोडी- औरंगाबाद : प्रताप मंत्र्यांचा!
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

घडामोडी- औरंगाबाद : प्रताप मंत्र्यांचा! Bookmark and Share Print E-mail
प्रमोद माने
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
गेल्या रविवारी काँग्रेसचे अन्न व नागरी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अशोभनीय असे वर्तन केले. माझे तिकिट का नाकारले असा जाब विचारणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांला त्यांनी शिवीगाळ करून लाथांनी तुडविलेही. हा सारा प्रकार अनुचित असाच होता. सत्तेचा माज अब्दुल सत्तार यांच्या नसानसात भिनला आहे. लाल दिवा मिळाल्यानंतर त्यात आणखीनच वाढ झाली आहे. भारतीय राजकारणाचे हे अवमूल्यन आहे. मंत्र्यांसाठी वागण्या-बोलण्याची एक आचारसंहिता असते. या आचारसंहितेचे पालन करून त्यांनी समाजात वावरावे अशी अपेक्षा असते. अब्दुल सत्तार यांनी या सर्व मर्यादांचे आणि आपल्या पदाचे उल्लंघन केले. ‘मला कोणी शिवीगाळ करत असेल, मला माझ्या आईसारख्या असलेल्या काँग्रेसला शिव्या देत असेल मी शांत का बसू’ अशी उर्मट भाषाही अब्दुल सत्तार यांनी मारहाण केल्यानंतर वापरली. त्या कार्यकर्त्यांची चूक एवढीच होती की सर्वासमोर विशेषत: प्रसिद्धी माध्यमांसमोर दुसऱ्याला तिकिट देऊन माझे तिकिट का कापले हे विचारण्याची. शिवीगाळ करून कार्यकर्त्यांवर हल्ला करताना अब्दुल सत्तार कॅमेऱ्यात टिपले गेले ते प्रसिद्धी माध्यमांसमोर. वाहिन्यांनी दोन दिवस मंत्र्यांचा हा प्रताप दाखविला. मात्र या प्रकरणात सरकारने विशेषत: काँग्रेसने सारवासारवीची भूमिका घेतली. अब्दुल सत्तार यांचा इतिहास ज्यांना माहिती आहे त्यांना त्यांच्या या कृत्याचे मुळीच आश्चर्य वाटले नाही. सिल्लोड विधानसभा मतदारसंघात गेल्या दशकभरापासून अब्दुल सत्तार यांची माजखोरी चालू आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसच्या एका मेळाव्यात औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार चंद्रभान पारखे यांनाही अब्दुल सत्तार यांनी शिव्यांची लाखोली वाहिली होती. दस्तूरखुद्द मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्या वेळी उपस्थित होते. चंद्रभान पारखे यांनी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे परवानगीही मागितली होती अर्थात ही परवानगी त्यांना मिळाली नाही. अब्दुल सत्तार यांना वाचविण्याचा प्रयत्न औरंगाबाद पोलिसांनीही केला आहे. घटनास्थळी मी पाय घसरून पडलो माझी कुणाविरुद्ध तक्रार नाही अशी कबुली ज्या कार्यकर्त्यांला मारहाण झाली त्या मुश्ताफ अहमद ऊर्फ मुश्तू याच्याकडून पोलिसांनी अर्जाद्वारे मिळविली आहे. या अर्जाच्या आधारे पोलिसांनी गृहखात्याला दिशाभूल करणारा अहवालही पाठविला आहे. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ - अब्दुल सत्तार यांच्यातही खातेअंतर्गत अधिकार देण्यावरून जुंपली होती. मराठवाडय़ातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकार राज्यमंत्र्यांना द्या, अशी मागणी अब्दुल सत्तार यांनी केली होती. त्यावर छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त करून मुख्यमंत्र्यांना याची माहिती दिली होती. ‘काँग्रेस कार्यकर्त्यांला मारहाण करण्यात आपली चूक नाही आपल्याला त्याचा पश्चातापही नाही’ अशी भाषा अब्दुल सत्तार यांनी वापरली. या झालेल्या प्रकाराबद्दल अब्दुल सत्तार यांनी मुळीच माफी मागितली नाही अथवा खेदही व्यक्त केला नाही.
काँग्रेसचे नेते आणि वरिष्ठांनी हा सारा प्रकार पक्षांतर्गत बाब असल्याचे म्हटले आहे. अब्दुल सत्तार यांनी मंत्री म्हणून असलेल्या पोलीस संरक्षणाच्या बळावर हे कृत्य केले. त्यांची ही दादागिरी साऱ्या प्रसिद्धी माध्यमांनी याची देही याची डोळा पाहिली. सत्तार माफी मागायला तयार नाहीत आणि त्यांच्या चुकांवर मुख्यमंत्री पांघरून घालत आहेत असाच संदेश या निमित्ताने गेला. त्यांच्या गुंडागिरीकडे कानाडोळाच करण्यात आला. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी औरंगाबादमध्ये जे झाले ते योग्य नाही. हा प्रकार दुर्दैवी आहे, असे सांगितले. आता ज्यांनी मार खाल्ला आहे त्या मुश्तूने अब्दुल सत्तार यांनी मारहाण केली नाही अशी कबुली दिली आहे. या कबुली जबाबावरून राज्यमंत्र्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल होणार नाही. मात्र अशा मनोवृत्तीचे मंत्री महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आहेत हीच शोकांतिका म्हणावी लागेल.
 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो