पुराणपुरुष
मुखपृष्ठ >> अग्रलेख >> पुराणपुरुष
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पुराणपुरुष Bookmark and Share Print E-mail
बुधवार, २१ एप्रिल २०१०
मराठी साहित्यातील सर्व वादांचा आणि वितंडवादांचा, प्रयोगांचा आणि सर्जनशीलतेचा, झळाळीचा, ऱ्हासाचा आणि ऊर्मीचा सुमारे पाऊण शतकाचा साक्षेपी साक्षीदार आपल्यातून गेला आहे. केवळ वयाच्या हिशेबात म्हणायचे तर मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे शतकाचे साक्षीदार होते. अतिशय तरल, तल्लख आणि चिकित्सक, पण तितकाच प्रसन्न असा हा रसिक टीकाकार तसा सभा-संमेलन-सोहळय़ात कधीच दिसत नसे. साधारणपणे २२-२३ वर्षांपूर्वी त्यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली तेव्हाही त्यांचे कुठे जंगी सत्कार-सोहळे झाले नाहीत. त्यांना तसे सन्मान-पुरस्कारही मिळाले नाहीत. एखाद्या अस्सल ब्रिटिश स्कॉलरप्रमाणे ते साहित्याच्या झगमगाटापासून आणि वादळांपासून दूर असत. काही वर्षे वृद्धत्वामुळे त्यांचा साहित्यसंपर्क क्षीण झाला असला तरी अगदी अलीकडेपर्यंत ते एखाद्या गुप्तहेराप्रमाणे साहित्यावर नजर ठेवून असत. असा गुप्तहेर तर अतिशय महत्त्वाचा साक्षीदार असतो. ‘साहित्य सहवासा’त राहूनही बहुसंख्य साहित्यिकांच्या प्रत्यक्ष सहवासात नसलेला हा साक्षीदार समाजकारण आणि राजकारणावरही नेमकी नजर ठेवून असे. ती नजर केवळ ‘तटस्थ’पणाची नव्हती. ती त्यांची भूमिका असे. त्यांचे स्वत:चे विश्लेषण आणि मत असे. हे सर्व त्यांनी अहमहमिकेने कधीही मांडले नसले तरी त्यांच्याशी बोलताना त्याचा प्रत्यय येत असे. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे अरेरावी आणि आग्रहीपणा यातील फरक बहुतेकांना समजत नाही, त्याचप्रमाणे भूमिका असणे आणि तरीही ‘बायस’ किंवा पक्षपात नसणे यातील फरकही कळत नाही. ‘मंवि’ त्यांच्या भूमिकेबद्दल स्पष्ट असत, मग विषय मर्ढेकरांचा असो वा मंडल आयोगाचा! ‘दोन्ही बाजूंमध्ये तथ्य आहे’, असा संधिसाधू विचार ते करीत नसत. समीक्षक हा सर्जनशील कवी वा लेखकापेक्षा ‘कमी’ दर्जाचा असतो असे त्यांना कधीही वाटले नाही. समीक्षा हाही एक सर्जनशील आणि बुद्धिप्रामाण्यवादी साहित्याविष्कार आहे असे त्यांचे मत होते. समीक्षकाला साहित्यविषयकच नव्हे तर जीवनविषयक दृष्टिकोन असावा लागतो. समीक्षा परप्रकाशी नसते तर तिला एक स्वयंप्रकाशी प्रतिमा असते. कित्येकदा, विशेषत: युरोपियन साहित्यविश्वात, समीक्षेला मूळ कलाकृतीपेक्षाही अधिक महत्त्व दिले जाते. समीक्षकाला साहित्यिकापेक्षाही अधिक व्यापक भान असावे लागते. त्या कसोटीवर विचार करता मंगेश विठ्ठल हे युरोपियन-ब्रिटिश ‘क्रिटिकल ट्रॅडिशन’मध्ये वावरणारे, पण पक्के मराठी समीक्षक होते. ते स्वाभाविकही होते. सुमारे ३५ वर्षे ते इंग्रजीचे प्राध्यापक होते. भाषा आणि विचार या दोन्हींच्या आविष्काराबद्दल ते काहीसे कठोर भासले तरी वागण्या-बोलण्यात ते अगदी मृदू होते. पर्यायी दृष्टिकोन वा पूर्णपणे वेगळे व विरोधी मत ऐकण्याची त्यांची तयारी असे. नुसती तोंडदेखली तयारी नव्हे तर समजून घेण्याची! ते समजून घेता घेताच ते सावकाशपणे त्यांची भूमिकाही अधोरेखित करीत असत. खरे म्हणजे ‘मंविं’चा काळ घणाघाती वादविवादांचा होता, बंडखोरीचा होता, प्रयोगशीलतेचा होता आणि लेखणी हातात घेऊन लढण्याचा होता. ते जेव्हा इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून प्रथम रुजू झाले तेव्हा, म्हणजे १९३६ साली, स्वातंत्र्य चळवळ एकदम जोमात आली होती. त्याच वर्षी काँग्रेस पक्षाचे फैजपूर अधिवेशन झाले. त्या अधिवेशनापासून स्वातंत्र्य चळवळीला नेहरूवादाचे परिमाण मिळाले. जरी स्वत: नेहरू हे गांधीवादी असले तरी ‘नेहरूवादा’ची ओळख वेगळी होती. आधुनिकता, प्रगल्भ कलास्वाद, सामाजिक न्याय आणि वैश्विकतेचे परिमाण असलेला राष्ट्रवाद ही त्या ‘नेहरूवादी’ विचारसरणीची चतु:सूत्री होती. ‘मंवि’ त्या काळच्या राजकीय मतप्रणालींपासून अलिप्त राहिले नाहीत. ते स्वत:ला कट्टर ‘नेहरूवादी’ म्हणवून घेत असत. साहित्याच्या, समीक्षेच्या, कलेच्या क्षेत्रात वावरणाऱ्यांनी राजकीय भूमिका घेण्याचे काय कारण, असा तुच्छतावादी पवित्रा त्यांनी घेतला नाही. विशेष म्हणजे, स्वत:ला राजकारणापासून ‘अलिप्त’ व ‘तटस्थ’ समजणारे लेखक/कवी चलाखीने कधी हिंदुत्ववादी/ संघवादी वा समाजवादी असत. अगदी थोडे ‘प्रखर कलावाद’ मांडत, पण जसजसे राजकीयीकरण एकूण समाजविश्व व मानसविश्व व्यापू लागले, तसतसे ते तथाकथित कलावादी (स्वयंभू आनंदवादी!) साहित्यिकही राजकीय भूमिका घेऊ लागले. साहित्यातील वाद-संवाद हा सामाजिक उदारमतवादाचा साहित्यिक आविष्कार आहे, असे मानणाऱ्या राजाध्यक्षांना तत्कालीन जागतिक विचारप्रवाहांचेही विलक्षण भान होते. त्यांच्या समीक्षा मांडणीत ते दिसेल वा न दिसेल, पण साहित्याविष्कारातील तत्कालीन वाद इंग्लंडमधील चर्चा-संवादाने प्रभावित झाले होते आणि त्या वाद-संवादांचा पाया युरोपियन-ब्रिटिश उदारमतवाद हा होता. ‘मंविं’नी तसे एकूण साहित्य कमी लिहिले असले तरी वर म्हटल्याप्रमाणे ते मराठी साहित्याच्या विसाव्या शतकातल्या चढउतारांचे साक्षीदार होते. त्यांनी पारंपरिक कथा-कादंबऱ्या पाहिल्या आणि त्यांना नवकथेने-नवकवितेने-नवकादंबऱ्यांनी दिलेले आव्हानही पाहिले. गंगाधर गाडगीळ हे त्यांचे समकालीन! त्या काळी जेव्हा मर्ढेकरांना साहित्यातील खलनायक ठरवायचा परंपरावाद्यांचा प्रयत्न झाला, तेव्हा गाडगीळ तर खरोखरच तलवारीप्रमाणे लेखणी परजून उभे होते. मनोविश्लेषणात्मक नवकथेचा ‘बचाव’ करण्यासाठी गाडगीळ असेच ढाल-तलवार घेऊन उभे राहिले होते. साहित्यातील या सुसंस्कृत (कधी कधी अगदी असंस्कृत) यादवीत नवसाहित्याच्या बाजूने उभे असत ‘अभिरुची’ आणि ‘सत्यकथा-मौज.’ ‘मंविं’चे लेखन सुरू झाले तेच ‘अभिरुची’तून! त्यांच्या स्तंभाचे नावच होते- ‘वाद संवाद’ आणि ‘मंवि’ म्हणजे निषाद! ‘पाच कवी’ हा त्यांचा ग्रंथ १९४६ साली प्रसिद्ध झाला. केशवसुत, ना. वा. टिळक, विनायक, गोविंदाग्रज आणि बालकवी या पाच कवींच्या कविता व त्यातील स्पष्ट-अस्पष्ट भावार्थ त्यांनी उलगडले. नवकविता जेव्हा रुजू लागली तेव्हा पाश्चिमात्य तत्त्वज्ञानातही खळबळ चालू होती. तिचा परिणाम तेथील साहित्यावर आणि नंतर मराठी कवितेवर होत होता. उदाहरणच द्यायचे झाले तर सिग्मंड फ्रॉईडच्या मनोविश्लेषणशास्त्राचा दबदबा नसता तर मर्ढेकरांची कविता वा गाडगीळ-गोखलेंच्या कथा लिहिल्याच गेल्या नसत्या. इहवाद म्हणजे ‘मटीरिअ‍ॅलिझम’ हा आधुनिक उदारमतवादाचा (आणि समाजवादाचाही!) वैचारिक पाया होता. गूढवादानेही अनेकांना झपाटलेले होते. कधी कधी एकाच साहित्यकृतीत या सर्व विचारांचे मिश्रण व प्रभाव दिसत असे. ‘मंविं’नी आधुनिक मराठी साहित्याचा आढावा घेताना विविध विचारांचा व शैलींचा वेध घेतला. नव्या साहित्याचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे अंतर्मुखता, मनातील बहुरंगी-बहुढंगी आंदोलनांतून तयार झालेले संज्ञाप्रवाह आणि समाजाकडे वा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन! निखळ कलावाद, नुसती सामाजिक बांधीलकी, केवळ आदर्शवाद किंवा नंतरच्या काळात आलेला ‘अस्तित्ववाद’ यांच्या संकुचित चौकटीबाहेर जाऊन कवितास्वाद घ्यायला हवा असे राजाध्यक्षांना म्हणायचे होते. त्यांची स्वत:ची मांडणी मात्र त्या काळातील समीक्षेच्या परिभाषेनुसार ‘अ‍ॅकॅडमिक’ होती. त्यांच्या ‘अम्लान’ या तुलनेने बऱ्याच वर्षांनंतर, १९८३ साली प्रसिद्ध झालेल्या समीक्षाग्रंथातून त्यांचा साहित्याकडे पाहण्याचा प्रगल्भ व ‘मॉडर्न’ दृष्टिकोन स्पष्ट लक्षात येतो. त्यांच्या सर्व लेखनाचा आढावा घेण्याची ही जागा नव्हे. पण १९८८ साली एक अभिनव प्रयोगही त्यांनी केला होता. पु. ल. देशपांडे आणि रा. वा. अलुरकर यांच्याबरोबर (एकत्रितपणे!) त्यांनी ‘पुरुषराज अळूरपांडे’ या एकदम वेगळय़ाच नावाने लेखन केले. त्यापैकी ‘पुरुष’ आणि ‘पांडे’ म्हणजे अर्थातच पुलं, ते स्वत: राज आणि अळूर म्हणजे अलुरकर! ‘भाषाविवेक’ हे  साप्ताहिक सदर त्यांनी जून १९९५ ते मे १९९६ या काळात ‘लोकसत्ता’साठी लिहिले. अगदी वयाची ऐंशी ओलांडली असतानाही त्यांची चिकित्सावृत्ती तरतरीत होती. रविकिरण मंडळ (आज ते अगदी प्राचीन वाटते!) ते नवकविता ते दलित कविता ते आजची कविता हा सगळा प्रवास त्यांनी त्या साहित्यप्रवाहाच्या काठावर बसून विचारशीलतेने पाहिला आहे. आता बरेच काही बदललेले असले तरी जे काही उभे आहे ते त्याच पूर्वसूरींच्या म्हणजे पुलं, कुसुमाग्रज, विंदा, श्री. पु, गाडगीळ आदींच्या खांद्यावर उभे आहे. कोणतीही गोष्ट पूर्णपणे नवी कधीच नसते. तिला इतिहास असतो, अनुभव असतो आणि शैलीही! त्या जुन्यातून नवे निर्माण होताना सुमारे सात दशके सजग असलेला साक्षीदार आपल्यातून गेला आहे. आमची श्रद्धांजली!   
 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो