पुस्तकाचे पान - रविवार, ९ मे २०१०
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

Bookmark and Share Print E-mail
पुस्तकाचे पान
रविवार, ९ मे २०१०
विधिनाटय़ाचे साक्षेपी संशोधन
‘खं डोबाचे जागरण’ हा ग्रंथ प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्या ‘जागरण : एक विधिनाटय़ इतिहास, वाङ्मय, प्रयोग’ या पीएच.डी.च्या प्रबंधावर आधारित आहे. या प्रबंधास सवरेत्कृष्ट प्रबंधाचा प्रा. अ. का. प्रियोळकर पुरस्कार प्राप्त झाला आहे. खंडोबा आणि त्याच्या परिवार देवता यांचे दैवता वैज्ञानिक इतिहासाचे संशोधन ग. ह. खरे, रां. बा. जोशी, डॉ. रा. चिं. ढेरे, गुन्थर सोन्थायमर आदी मान्यवर संशोधकांनी केले आहे. खंडोबाची पदे वा. दा. गोखले यांनी संकलित केलेली आहेत. खंडोबाचे उपासक वाघ्या-मुरळी याच्या सांस्कृतिक योगदानाविषयीचे संशोधन डॉ. रा. चिं. ढेरे यांनी केले आहे. डॉ. प्रभाकर मांडे यांनी मानववंशीय शास्त्राच्या अंगाने त्यांच्या लोकरंगभूमी आणि गावगाडय़ाबाहेर या ग्रंथांमध्ये वाघ्या-मुरळींविषयी साक्षेपी संशोधन केले आहे, तर डॉ. अनिल अवचट यांनी वाघ्या-मुरळी या पुस्तकात समाजशास्त्रीय अंगाने वाघ्या-मुरळींच्या सामाजिक स्थितीचा आणि दुरवस्थेचा आढावा घेतला आहे.
या सर्व पाश्र्वभूमीवर प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी वाघ्या-मुरळ्यांच्या जागरण या विधिनाटय़ाचे प्रयोगविज्ञान स्पष्ट करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. वाघ्या-मुरळी यांचे जागरण हे विधिनाटय़ अलीकडच्या काळात लोकनृत्य, लोककला म्हणून प्रसिद्ध पावलेले असले तरी जागरणाचा मूळचा पिंड विधिनाटय़ाचाच आहे. विधींची अपरिहार्यता, त्यातून व्यक्त होणारे श्रद्धागर्भ लोकमानस आणि श्रद्धेय जागरणाचे रंजक रूप या दोहोंच्या व्यामिश्रतेतून जागरण हे विधिनाटय़ उभे राहते. या विधिनाटय़ाचे सूक्ष्म परिशीलन डॉ. प्रकाश खांडगे यांनी केले आहे आणि जागरणाचे प्रयोगविज्ञान मांडले आहे. प्रयोगात्म लोककलांच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा देण्याचे आणि सैद्धांतिक बैठक देण्याचे काम डॉ. प्रकाश खांडगे यांनी केले आहे. हे त्यांचे प्रयोगात्म लोककलांच्या क्षेत्रातील योगदानच आहे. नृत्य, नाटय़ आणि संगीत हे जागरणातील प्रयोगात्मक घटक आहेत. हे घटक आणि खंडोबाचे संकीर्तन यांच्या एकजिनसी स्वरूपातून जागरण हे विधिनाटय़ साकारते. प्रत्येक अंग-उपांगांचा अभ्यास या ग्रंथात मांडला आहे. अगदी जागरणातील भारीत भूमी म्हणजे काय इथपासून जागरणातील कलावंतांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा, प्रकाशयोजना इथपर्यंत बारीकसारीक घटकांचा विचार या ग्रंथात केलेला दिसतो.
खंडोबा, त्याच्या परिवार देवता यांच्याविषयी अनेकदा लिहून, छापून आले आहे. त्यामुळे त्याची पुनरूक्ती या ग्रंथात टाळण्यात आली आहे. जागरणाची मौखिक संहिता, या मौखिक संहितेचे लिखित रूप व त्या लिखित रूपाची रंगसंहिता यांच्या सूक्ष्म भेदांसह तसेच वाङ्मयीन व प्रयोगरूपांच्या अंगांनी जागरण या विधिनाटय़ाचा विचार केल्याचे या ग्रंथात दिसून येते. वाङ्मयीन अंगाने विचार करताना     डॉ. खांडगे यांनी पारंपरिक जागरण सादर करणारे शंकरराव जाधव-धामणीकर यांच्या संग्रहात असणारी खंडोबा-बाणाई लग्नाची कथा तर प्रयोगरूपाचा विचार करताना मुंबईत वास्तव्य करणाऱ्या मुरळी कमलाबाई शिंदे आणि जेजुरी येथील वाघ्ये कानिफनाथ देशमुख यांनी सादर केलेल्या खंडोबा-बाणाई लग्नाची कथा आधारभूत मानली आहे. या तीनही कथांच्या संहिता ‘खंडोबाचे जागरण’ या ग्रंथात दिल्या आहेत. त्यामुळे जागरण सादर करणाऱ्या वाघ्या-मुरळींच्या अभिनयात, संवादात आणि सादरीकरणात कसे बदल होत जातात ते सोदाहरण दाखवून देण्यात डॉ. खांडगे यशस्वी ठरले आहेत. याशिवाय शंकरराव जाधव-धामणीकर यांच्या संग्रहात असणाऱ्या आणि याआधी कोठेही प्रसिद्ध न झालेल्या खंडोबाविषयक पदांचाही समावेश ग्रंथात करण्यात आला आहे. त्यामुळे वाङ्मयीनदृष्टय़ा ही पदे महत्त्वाची आहेत. अतिशय छोटय़ा वाटणाऱ्या परंतु अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या कित्येक घटकांचाही या ग्रंथात साकल्याने विचार करण्यात आला आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर दैवी पातळीवरील पात्रे आणि मानवी पातळीवरील पात्रे यांच्यातील औपचारिक संभाषिते आणि दैनंदिन संभाषिते यांच्यात कसे बदल होत जातात याचेही अभ्यासपूर्ण विवेचन या ग्रंथात डॉ. खांडगे यांनी केले आहे. त्यामुळे केवळ लोकसाहित्याच्या अभ्यासकालाच नाही तर सर्वसामान्य वाचकालाही या ग्रंथाच्या वाचनाने अनेक अभ्यासपूर्ण बाबी उलगडतील यात शंकाच नाही.
जागरणाचे रंगतत्त्व आणि जागरणातील नाटय़तत्त्व या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. जागरणाचा प्रयोगरूपाचा अभ्यास करताना त्याचे नाटय़तत्त्व हे रंगतत्त्वाचा एक भाग असते. रंगतत्त्व ही संकल्पना नाटय़तत्त्वापेक्षा अधिक व्यापक व बहुस्पर्शी असते; कारण रंगतत्त्वाचा जागरणातील सर्वच चैतन्ययुक्त घटकांचा विचार करावा लागतो असे स्पष्ट करीत डॉ. प्रकाश खांडगे यांनी जागरणाच्या आकृतिबंधाची ठळक वैशिष्टय़े या प्रबंधात मांडली आहे ती अशी.
१) सादरीकरणातील व्यामिश्रता : पूर्वरंग आणि उत्तररंगात स्थूलमानाने विभागलेल्या जागरणात पदगायन हे केंद्रस्थानी असते. पदाच्या चौकाचे गायन झाल्यावर मुख्य वाघ्या त्या चौकाचा मतितार्थ निरूपणातून सांगतो व हा मतितार्थ अधिक अधोरेखित करण्यासाठी लौखिक संदर्भ देत निरूपणात वाघ्या-मुरळ्यांचे संवाद सुरू होतात व संवादानंतर पुन्हा पदगायन सुरू होते. पूर्वरंग-उत्तररंगातील स्फुटपदे आणि उत्तररंगातील नाटय़रूपे कथादर्शनात वरील घटकांची योजना केलेली असते. या घटकांची पूर्वरंग आणि उत्तररंगातील व्यामिश्रता हे जागरणाचे वैशिष्टय़ म्हणता येईल.
व्यामिश्रता हा शब्द पदगायन, निरूपण, संवाद आणि पुन्हा पदगायन यांची स्वाभाविक सरमिसळ या अर्थी वापरलेला आहे.
२) पदातील चौक हा स्वतंत्र दृश्यबंध : जागरणातील स्फुटपदे आणि एखादी कथा मांडणारे अनेक चौकांचे दीर्घपद यांचे प्रत्यक्ष सादरीकरण होते तेव्हा पदाच्या एका चौकातून विशिष्ट प्रसंग उभा करण्याचा व्याघ्या-मुरळ्यांचा प्रयत्न असतो. म्हणजेच पदाच्या विशिष्ट चौकाचे गायन हा स्वतंत्र दृश्यबंध म्हणून आपणासमोर सादर होतो. या दृश्यबंधांच्या साखळीतून नाटय़रूप कथा आकाराला येते. हे दृश्यबंध पदगायन, निरूपण, संवाद आणि पुन्हा गायन या व्यामिश्र घटकांच्या मालिकेतून तयार होतात. हे दृश्यबंधाच्या कडय़ांमधून नाटय़रूप कथा आकाराला येते. आश्चर्य म्हणजे या दृश्यबंधांना वाघ्ये व मुरळ्या ‘कडी’ असेच म्हणतात.
३) लीलादर्शन आनुषंगिक : चौकाचौकांच्या गायनातून जागरणात खंडोबाचे लीलागायन होते. या लीलागायनात दृश्यबंध गानरूप असतात. या दृश्यबंधांमधून होणारे लीलादर्शन हे आनुषंगिक असते. लीलागायनात नाटय़मयता आहे. या नाटय़मय लीलागायनावर लीलादर्शनाचा वरचष्मा नाही.
४) भूमिका रूपांतरण : जागरणात उपास्य देवता, उपासक आणि भक्त यांच्या भूमिका परिवर्तनीया असतात. दैवी, अलौकिक उपास्य देवता: मानवी आणि लौकिक पातळीवर येतात. उपासक उपास्य देवतेचे पात्र वठवितात, उपास्य देवतेच्या संदेशवाहनाचे काम करतात, रंजनाची कौशल्ये दाखवून उपासकांचे कलावंत होतात. जागरणाचे भक्त जागरणातील विविध विधिविधानांमध्ये भाग घेतात. ते उपास्य देवतेच्या लीलादर्शनाचे साक्षीदार असतात व आस्वादकही असतात. दैवी व मानव भूमिकांचे प्रतीकात्मक, संकेतरूप रूपांतरण हे जागरणाच्या आकृतिबंधाचे वैशिष्टय़ म्हणता येईल.
‘खंडोबाचे जागरण’ या ग्रंथात विधिनाटय़ाच्या प्रयोग विज्ञानाचे साक्षेपी संशोधन असून लोकसाहित्य, लोककलेच्या अभ्यासकांसाठी हा ग्रंथ अतिशय उपयुक्त आहे.
खंडोबाचे जागरण
लोकवाङ्मयगृह आणि
पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र,
उदयपूर,भारत सरकार
पृष्ठे : ४१०, मूल्य : ३०० रुपये
प्रशांत पवार

द्वेष जाळून टाकणारं पुस्तक
जग वंदी त्यासच पुन्हा पुन्हा
हे घडत कसे नकळे कवणा
 महात्मा गांधींवरच्या या काव्यओळी मला अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा हे गांधीजींवरचं प्रेम व्यक्त करतात तेव्हा आठवतात. सारं जगच महात्माजींवर कसं प्रेम करत होतं, याची प्रचीती देणारं ‘अज्ञात गांधी’ हे पुस्तक माझ्या हातात पडलं, ते वाचलं आणि महात्माजी शत्रूवरही कसं प्रेम करत होते हे वाचून डोळे भरून आले. महात्माजींविषयी आपल्या देशात असंख्य गैरसमज आहेत. त्यांच्याविषयी द्वेषभावना जपणारी माणसं आजही आहेत. महात्माजींनी भारताची फाळणी केली म्हणून त्यांना शिव्याशाप देणारेही आहेत. अशा या माणसांचं हृदयपरिवर्तन करण्याचं सामथ्र्य या पुस्तकात आहे.
महात्माजींचा हृदयपरिवर्तनावर केवढा विश्वास होता. यावर प्रकाश पाडण्याचं काम हे पुस्तक करतं. महात्माजी दक्षिण आफ्रिकेत होते तेव्हा त्याच्यावर हल्ला करणारा मीर आलम हा महात्माजीचं क्षमाशील हृदय पाहून पुढे महात्माजींचा जीव वाचवण्यासाठी कसा पुढे झाला याचं हृद्य चित्रण वाचताना मन गलबलून जातं आणि हे सारं विश्वसनीय आहे. महात्माजींच्या आयुष्यात सावली म्हणून राहिलेल्या महादेवभाई देसाई यांचे पुत्र नारायणभाई यांनी हे पुस्तक लिहिलं आहे, म्हणून या पुस्तकाचं महत्त्व अधिक आहे. महात्मा गांधी नावाचा विचार आणि महात्मा गांधी नावाचा माणूस या दोन्ही बाजू नारायणभाई यांनी इथे समर्थपणे मांडल्या आहेत.
महात्माजींच्या सहवासात राहिलेल्या नारायणभाईंना इक्वेडोर देशात एक माणूस भेटला. तो त्यांचा शेकहँडसाठी धरलेला हात सोडता सोडेना. गांधीजींच्या पवित्र हाताचा स्पर्श झालेल्या त्या हाताची पवित्र लहर त्यांच्यामार्फत आपल्या शरीरात भिनावी त्यासाठी तो हे करत होता. अमेरिकेत अहिंसात्मक आंदोलन चालवणारा सीझर चावेज हा नेता आपली सगळी कामं रद्द करून नारायणभाईंच्या सहवासात चर्चा करीत राहिला. दक्षिण आफ्रिकेत असताना महात्माजींनी ज्याच्याविरुद्ध सतत लढा दिला तो ब्रिटिश स्मट्स याने महात्माजींना संत म्हणून गौरवलं असल्याची हकीगतही नारायणभाई सांगतात.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आणि महात्माजींचे संबंध कसे होते, अस्पृश्यांसाठी वेगळा मतदारसंघ नको असं महात्माजी डॉ. आंबेडकरांना समजावून का सांगत होते, याची माहिती वाचून आपल्या मनातले सल आपोआप मिटतात.
बॅ. जीनांनी हट्टाने पाकिस्तानची मागणी केली. ती पदरात पाडून घेतली. ते पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल बनले, पण म्हणून ते आनंदी होते का? क्वेटा इथल्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये बॅ. जीना बरेच दिवस उपचार घेत होते. तिथल्या मुख्य डॉक्टरांनी जीनांना एकदा विचारलं, ‘आयुष्यभरात आपल्या हातून कोणतीच चूक झाली नाही का?’ जीनांनी सांगितलं, ‘जीवनातली सर्वात मोठी चूक म्हणजे ‘डिव्हिजन ऑफ इंडिया’ (फाळणी) ही आहे.’ शेवटच्या क्षणी त्यांची सदसद्विवेकबुद्धी जागी झाली. अशा अनेक घटना नारायणभाई शांत चित्ताने कोणताही आवेश न आणता, कोणतंही भाष्य न करता सांगतात.
महात्माजी अहिंसेचा मंत्र वडिलांच्या वागण्यातून शिकले, सत्याग्रहाचा मंत्र पत्नी कस्तुरबा हिच्याकडून शिकले, अशी महत्त्वपूर्ण माहिती नारायणभाईंनी कथा सांगावी इतक्या सोप्या शब्दांत सांगितली आहे.
महात्माजींनी  हिंदूंवर अन्याय केल्याचा आरोप कसा खोटा होता, त्यांच्यामुळे देशाची फाळणी झाली हे धादांत खोटं कसं होतं, हे सारं सांगताना माऊंटबॅटन यांच्या शब्दांची साक्ष नारायणभाई देतात आणि त्या आरोपातलं तथ्य निष्प्राण होतं. महात्माजींच्या हत्येनंतर सारं जग रडत होतं, मात्र काहीजण गांधी हत्येला वध मानून हत्येचं उदात्तीकरण करत होते. हा शेवट वाचताना महात्माजींविषयीचा आदर वाढत जातो. साठ र्वष माझं मन महात्माजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा द्वेष करत होतं. ‘अज्ञात गांधी’ वाचलं आणि द्वेषाचे काटे, रागाचे फुत्कार आपोआप गळून पडले.
इतकं सामथ्र्य असलेल्या या पुस्तकाचं मराठी रूपांतर सुरेशचंद्र वारघडे यांनी अतिशय समर्थपणे केलं आहे. आपण भाषांतर वाचतोय, असं कुठेही जाणवत नाही. मराठी भाषेचं वळण त्यांनी जपलं आहे. हे पुस्तक लिहिण्यापूर्वी त्यांनी नारायणभाई यांच्या गांधी कथेच्या छत्तीस व्हिडिओ सीडीज एकाग्रपणे पाहिल्या. त्यामुळेच महात्माजींचं ‘जीवनसत्य’ ते अंत:करणापासून लिहू शकले आहेत. द्वेषाचं निर्मूलन करणारं असं पुस्तक प्रसिद्ध करणाऱ्या ‘समकालीन प्रकाशन’चे वाचकांनी आभार मानले पाहिजेत.
अज्ञात गांधी
मूळ लेखक- नारायणभाई देसाई
रूपांतर- सुरेशचंद्र वारघडे
समकालीन प्रकाशन, पुणे
मूल्य- २०० रुपये
अनुराधा औरंगाबादकर

पुस्तकाच्या मागील पानावर पुस्तकाचा कथाविषय सांगणाऱ्या आशयाचा सारांश मांडणाऱ्या- मोजक्या ओळी असतात   निर्मितीच्या प्रक्रियेत ‘मागे’ राहून  ‘बोलकी’ आणि मोलाची कामगिरी करणारे हे समर्थ सारांश..
आयुष्याच्या विविध टप्प्यांवर मला जे मित्र भेटले, त्यांच्या जीवनातील भयाण वास्तवामुळे अस्वस्थ झालो. काही वेळा प्रभावित झालो. अशा भिडूंची ही जीवनकहाणी!
शत्रूशी निकरानं लढून देशाला विजय मिळवून देणारा योद्धा, आपल्या कुटुंबाकडून पराभूत होतो.. शिक्षकानं हरहुन्नरी विद्यार्थ्यांना समजून घेऊन, त्यांचं व्यक्तिमत्त्व फुलवत विकसित करायचं असतं, पण त्यानंच बालमनावर आघात केले तर मुलाचं उभं आयुष्य बरबाद होतं.. दुष्काळी कामाच्या खडीकेंद्रावर जन्मलेल्या मुलीच्या जन्मदात्याची शरीराच्या सुजेप्रमाणे सुधारलेली सांपत्तिक स्थिती त्या लेकीला अभागी जिणं जगायला भाग पाडते.. असेच काही भिडू प्रतिकूल परिस्थितीशी निकरानं झुंजून मार्ग काढत असले, तरी त्यांच्या अंतर्मनातदेखील खोल व्यथा-वेदना आहेत. ही इरसाल मंडळी पूर्वी कशी होती? आज कुठे आहेत? त्यांच्या भल्या-बुऱ्या अवस्थेला जबाबदार असणाऱ्या व्यवस्थेचा शोध घेण्याचा हा प्रांजळ प्रयत्न!
भिडू
भगवान इंगळे
ग्रंथाली प्रकाशन
पृष्ठे - २५६, मूल्य - २५० रुपये
 


अधिक माहितीकरिता लॉग ऑन करा -
http://www.loksatta.com/filmfest

 

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 

आता ‘यशस्वी भव’ऑनलाइन सुध्द! व्हिडिओ ट्युटोरियल स्वरुपात!
विद्यार्थी मित्रांनो, 'लोकसत्ता'मधील लोकप्रिय सदर ‘यशस्वी भव’ यू टय़ूबवर YouTube.com/LoksattaYB या ठिकाणी दृकश्राव्य शिकवणी (व्हिडिओ टय़ुटोरियल) स्वरूपात सुध्दा उपलब्ध आहे. ही सेवा विनामुल्य आहे. याशिवाय तज्ञ शिक्षक तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. तुमचे प्रश्न yb@expressindia.com या ई-मेल पत्त्यावर पाठवा. 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो