वेलकम टू आफ्रिका!
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

वेलकम टू आफ्रिका! Bookmark and Share Print E-mail
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन
जोहान्सबर्ग, ११ जून / वृत्तसंस्था

आफ्रिकन नृत्य आणि संगीताचा स्पर्श असलेला बहारदार, विविधरंगी सोहळा..आफ्रिकेतील पारंपरिक नृत्याविष्कार व वेशभूषेतली विविधता, आफ्रिकेतील प्रसिद्ध गायकांच्या गीतांची बहार..कलाकारांनी सादर केलेले विविध कलाविष्कार..आफ्रिका खंडात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यातले हे क्षण जगभरातील सुमारे २१५ देशांतील फुटबॉलचाहत्यांनी टीव्हीच्या माध्यमातून अनुभवले आणि त्याची वाहवा केली.
कॅलाबाश असे नामकरण केलेल्या जोहान्सबर्गच्या सॉकर सिटी स्टेडियममध्ये या सोहळ्यासाठी सहा वर्षे वयाच्या लहान मुलांपासून ते साठीत प्रवेश केलेल्या प्रौढांपर्यंत सुमारे १५०० कलाकारांनी आपापली कला सादर केली आणि तमाम फुटबॉलचाहत्यांना ‘आफ्रिकेत तुमचे स्वागत असो’ अशा शब्दांत या स्पर्धेचे आमंत्रण दिले, त्यांचे स्वागत केले. कॅलाबाश हे स्टेडियमला असलेले नाव आफ्रिकेतील भाजी आणि ते बनविण्यासाठी लागणारे भांडे या कल्पनेतून साकारले आहे. आफ्रिकेत नांदत असलेल्या विविध संस्कृतींचे बेमालूम मिश्रण दाखविण्यासाठी प्रातिनिधिक म्हणून या सोहळ्याचे याच स्टेडियमवर आयोजन झाले असावे.
या सोहळ्याची सुरुवात झोसा भाषेत सर्वांचे स्वागत करून झाली. झोलानी एमखिवा या गायकाने डोक्यावर लाल टोपी, अंगावर चित्त्याची कातडी अशा पेहरावात त्याने ‘अखेर तो ऐतिहासिक क्षण  आला आहे’ अशा शब्दांत सोहळ्याचा प्रारंभ केला. इंद्रधनुष्याच्या रंगातील चादरी लपेटलेले शेकडो कलाकार मग स्टेडियमवर अवतरले आणि त्यांनी नऊ वेगवेगळ्या रांगा तयार करीत या स्पर्धेसाठी जी इतर स्टेडियम्स सज्ज ठेवण्यात आली आहेत, त्यांची एकदा आठवण तमाम उपस्थितांना करून दिली. दक्षिण आफ्रिकेच्या ‘मामा आफ्रिका’ म्हणजे मिरियम माकेबा यांचे सुप्रसिद्ध क्लिक साँग झोसा भाषेतून थांडीस्वा माझावाईने गाणे सादर केले. अल्जेरियाच्या खालेद, नायजेरियाच्या फेमी कुटी यांनीही आपली गायन कला पेश केली. या दोघांचेही देश यंदा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सहभागी झाले आहेत. उद्घाटन सोहळ्याला नेल्सन मंडेलाची उपस्थिती आकर्षणाचे केंद्र ठरणार होती, पण दुर्दैवाने त्यांची पणती एका अपघातात काल मृत्युमुखी पडल्यामुळे ते या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांनी आपला संदेश उपस्थित चाहत्यांपर्यंत पोहोचविला.
स्टेडियमच्या बाह्यरूपाची प्रतिकृतीही स्टेडियमच्या मध्यभागी तयार करण्यात आली आणि सर्व कलाकारांनी त्याभोवती नृत्य सादर करीत, प्रेक्षकांची वाहवा मिळविली. हेच कलाकार नंतर एक आले आणि त्यांनी विविध खंडांचे चित्र मैदानात विविधरंगी वस्त्रांच्या सहाय्याने तयार केले. थोडय़ाच वेळात त्यावर पावले उमटली. विविध खंडातून प्रवास करीत फुटबॉलचा विश्वचषक आफ्रिका खंडात पोहोचल्याचे त्यातून दिसले आणि नकळत प्रत्येकाच्या तोंडून व्वा! असा शब्द उच्चारला गेला.