कुर्ला येथील अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी पोलीस अद्यापही दिशाहीन
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

कुर्ला येथील अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी पोलीस अद्यापही दिशाहीन Bookmark and Share Print E-mail
मुंबई, ११ जून / प्रतिनिधी
कुर्ला येथे गेल्या तीन महिन्यांत घडलेल्या अल्पवयीन मुलींचे अपहरण, बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी एकच असल्याचा दावा पोलीस करीत असले तरी यापैकी प्रकरणातून नुकत्याच जामिनावर सुटलेल्या आरोपीबाबत मात्र त्यांनी मौन बाळगले आहे. पोलिसांच्या संभ्रमावस्थेमुळे पोलीस या तिन्ही प्रकरणांत दिशाहीन असल्याची टीका स्थानिकांकडून केली जात आहे.
नुसरत खुर्शीद आलम शेख ही आठ वर्षांची मुलगी गेल्या ६ जूनपासून बेपत्ता आहे. अल्पवयीन मुलीचे अपहरण होण्याची नेहरूनगर परिसरातील ही तिसरी घटना असून या पूर्वीच्या दोन घटनांमध्ये अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्यानंतर त्यांच्यावर बलात्कार होऊन त्यांची हत्या झाली होती. यातील एका मुलीचा मृतदेह तर नेहरूनगर पोलीस वसाहतीच्या एका इमारतीच्या गच्चीवर आढळला होता. नेहरूनगरमध्ये अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या वाढत्या घटनांमुळे स्थानिकांत भीतीचे वातावरण पसरले असून एवढे होऊनही पोलिसांकडून काही ठोस पावले उचलली जात नसल्याबद्दल त्यांच्यामध्ये असंतोष आहे.
पोलिसांच्यामते मात्र तिन्ही प्रकरणातील आरोपी एकच आहे. त्याची रेखाचित्रेही प्रसिद्ध करण्यात आली आहेत. मात्र एवढे करूनही आरोपीविषयी काहीच धागेदोरे सापडलेले नाहीत. साक्षीदारांनी केलेल्या वर्णनानुसार आतापर्यंत ५० हून अधिक जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आल्याचा दावाही पोलीस करीत आहेत. परंतु एकीकडे या तिन्ही प्रकरणातील आरोपी एकच असल्याचा दावा करणाऱ्या पोलिसांनी नुकत्याच जामिनावर सुटलेल्या मोहम्मद अजमेरीविषयी बोलण्यास मात्र नकार दिला. जर तिन्ही प्रकरणातील आरोपी एकच आहे, तर अजमेरी अटकेत असताना नुसरतचे अपहरण कसे झाले? असा सवाल आता स्थानिकांकडून केला जात आहे.
दरम्यान, नुसरतचा शोध घेण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांनी आता नुसरतचे छायाचित्र प्रसिद्ध केले असून ती आढळून आल्यास किंवा तिच्याविषयी माहिती असल्यास २५२२४२९१, २५२२४२६९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.