जडणघडण : संस्कृतीच्या तपश्चर्येतून लाभले यशाचे वरदान!
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

जडणघडण : संस्कृतीच्या तपश्चर्येतून लाभले यशाचे वरदान! Bookmark and Share Print E-mail
विनायक लिमये, रविवार, १३  जून २०१०
९८२३२७४६१६
मराठीतील एक पुस्तक, त्याच्या १९ आवृत्त्या, त्याचे गुजराती, हिंदी आणि इंग्रजीत भाषांतर, ही तिन्ही भाषांतरित पुस्तके त्याच प्रकाशनाची. यातील गुजराती अनुवादाची दहावी आवृत्ती, हिंदी अनुवादाची दुसरी आवृत्ती, इंग्रजी अनुवादाची दुसरी आवृत्ती, असं लखलखतं यश लाभलेलं पुस्तक आणि त्याचा लेखक हा वेगळाच विक्रम आहे. बरं, हे पुस्तक, ‘तर काय कराल किंवा यश कसे मिळवाल, ’ अशा माहितीपर किंवा धार्मिक गटातील पुस्तक नाही. समाज घडवणाऱ्या, भारतीय संस्कृती रुजवणाऱ्या पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावरचे ‘देह झाला चंदनाचा’ हे पुस्तक आणि त्याचे लेखक आहेत राजेंद्र खेर आणि प्रकाशक ‘विहंग’ प्रकाशन.
विहंग प्रकाशनने एका तपाच्या वाटचालीत अनेक विक्रम केले आहेत. विहंग प्रकाशनाच्या  ‘गीतांबरी’ या पुस्तकाच्या भाषांतरासाठी अमेरिकन प्रकाशकाकडून विचारणा झाली आणि मग हे पुस्तक त्या प्रकाशनाने इंग्रजीत प्रकाशित केलेही. विहंग प्रकाशनाच्या संचालिका सीमंतिनी खेर संस्थेच्या वाटचालीबद्दल सांगताना म्हणाऱ्या, माझ्या सासऱ्यांच्या अर्थात ज्येष्ठ पत्रकार भा. द. खेर यांच्या ‘हिरोशिमा’ या कादंबरीने आम्ही आमच्या प्रकाशनाची सुरुवात केली. त्यानंतर माझे पती राजेंद्र खेर यांनी स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांच्यावर ‘देह झाला चंदनाचा’ ही कादंबरी लिहिली. त्यासाठी शास्त्रीजींबरोबर फिरून अनेक वर्षे अभ्यास करून त्यांनी ही कादंबरी लिहिली. त्या वेळी आमचे प्रकाशन आम्ही नुकतेच सुरू केले होते. इतकी उत्तम साहित्यकृती अधिकाधिक वाचकांपर्यंत माफक किमतीत जावी या हेतूने आपणच ही कादंबरी प्रकाशित करायची असे आम्ही ठरवले. शास्त्रीजींनीही परवानगी दिली, असे सीमंतिनी खेर यांनी सांगितले. त्या वेळी ६०० पानांच्या या पुस्तकाची किंमत आम्ही फक्त २०० रुपये ठेवली होती. आज दहा वर्षांनंतर आम्ही या कादंबरीची किंमत फक्त ९० रुपयांनी वाढवली आहे. भारतीय संस्कृतीला प्राधान्य देणारी, नवा विचार मांडणारी कसदार लेखन असलेलीच पुस्तके प्रकाशित करायची असा आमचा उद्देश आहे, असे सीमंतिनी खेर यांनी सांगितले.
राजेंद्र खेर यांची दोन पुस्तके त्यापूर्वी नामवंत प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली होती. घरचेच प्रकाशक म्हणून राजेंद्र खेर यांची ही कादंबरी प्रकाशित केली, असा मामला येथे नाही. या प्रकाशनाने राजेंद्र खेर यांचेच ‘गीतांबरी’ हे पुस्तकही प्रकाशित केले. त्याचे अमेरिकन प्रकाशकांनी भाषांतर प्रकाशित केले. त्यांचीच अर्जुनाच्या जीवनावरील ‘धनंजय’ व ‘बिंदू सरोवर’, ‘देवांच्या राज्यात’, ‘हॉलिवूडचे विनोदवीर’ ही पुस्तके विहंग प्रकाशनने प्रसिद्ध केली, त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. विहंगने केवळ राजेंद्र आणि भा. द. खेर यांचीच पुस्तके प्रकाशित केली असे नाही तर अन्य लेखकांचीही पुस्तके आवर्जून प्रसिद्ध केली आहेत.
सीमंतिनी खेर प्रकाशनाबरोबरच लेखनही करतात. संस्कृतमधील सुभाषितांच्या कथा त्यांनी लिहिल्या. त्याचे पुस्तकही प्रसिद्ध केले.  त्याचबरोबर ‘दैनंदिन भगवद्गीता’ या राजेंद्र खेर यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या त्या सहलेखिका आहेत. प्रकाशनाचा व्याप त्या पूर्णपणे सांभाळतात. अर्थात राजेंद्र खेर यांचे सहकार्य त्यांना असतेच.
प्रत्येक पुस्तक उत्तमच झाले पाहिजे याकडे सीमंतिनी खेर यांचा कटाक्ष असतो. सवंग, बाजारात चालून जाईल, मग काढा की कुठलेही पुस्तक, असा विहंगचा दृष्टिकोन कधीच नाही. विहंगने भारतीय संस्कृती व जगाला भारतीय साहित्याचे महत्त्व पटवून देणारी पुस्तके प्रसिद्ध करण्याचे ध्येय  त्यांनी ठेवले आहे. पुस्तक प्रकाशन हा व्यवसाय आहे हे त्यांना मान्यच आहे, पण हे काम व्रत आहे, ही एक तपश्चर्या आहे, असे समजून सीमंतिनी आणि राजेंद्र काम करत असतात. वय वर्षे ९३ असूनही लेखन करणाऱ्या भा. द. खेर यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. विहंगने कधीही एखादे पुस्तक गाजवायचे या हेतूने जाहिरातबाजी केलेली नाही. वाचकच एकमेकांना त्यांच्या  पुस्तकांची शिफारस करतात. लोक आवर्जून ही पुस्तके मागत असतात.
‘लोकांना हेच विषय हवे असतात. नवं वेगळं काही चालत नाही,’ असा युक्तिवाद करून काहीजण दुय्यम दर्जाची पुस्तके काढतातही, पण आम्हाला लोकांना  आमचा विचार सांगायचाय, लोकांनी हे वाचले पाहिजे, असा निर्धार करून विहंग प्रकाशन वेगळी पुस्तके प्रकाशित करत असते. अर्थात त्यांची मेहनत आणि ध्येयाप्रती त्यांची असलेली अविचल निष्ठा याला वाचकांचाही प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळेच ‘देह झाला चंदनाचा’ हे पुस्तक लवकरच ५० हजार प्रतींचा आकडा पूर्ण करेल. विहंगच्या तीन ते चार पुस्तकांची अमेरिकेतील ग्रंथालयांसाठी निवड झाली आहे. वाचकमान्यतेबरोबरच विहंगच्या पुस्तकांना गदिमा प्रतिष्ठान, बडोदा मराठी वाङ्मय परिषद यांसारख्या मान्यवर संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.
विहंग प्रकाशनने एका तपाच्या वाटचालीत अनेक पुस्तके प्रकाशित केली. निम्म्यापेक्षा जास्त पुस्तकांना तीनपेक्षा जास्त आवृत्त्यांचे भाग्य लाभले आहे. एकाच प्रकाशनने हिंदी, इंग्रजी, गुजराती व मराठी पुस्तकांचे प्रकाशन करण्याचे उदाहरण दुर्मिळ असते. अर्थात विहंगने ती किमयाही साध्य केली आहे. त्याबद्दल सीमंतिनी व राजेंद्रजी सांगतात, आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये जगाला देण्यासारखं खूप आहे. मी सगळे संदर्भ तपासून, मेहनत घेऊन दहा-दहा वेळा लेखन करत असतो. दोन-दोन, तीन-तीन वेळा एखाद्या प्रकरणाचे लेखन करण्याची वेळ येते, पण त्यात मी तडजोड करीत नाही. माझ्या ‘गीतांबरी’ या भगवद्गीतेवरील पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीचे काम दोन वर्षे चालले होते.’’ जगाला गवसणी घालणारे साहित्य देण्याचा विहंगचा मानस आहे. काळाच्या कसोटीवर उतरणारे व आपली नाममुद्रा कायम राहील अशी साहित्यकृती विहंगची असावी यासाठी सीमंतिनी व राजेंद्र यांचा प्रयत्न असतो.
सम्राट समुद्रगुप्त यांच्या जीवनावरील सविस्तर माहिती देणाऱ्या पुस्तकाच्या कामात सध्या राजेंद्र खेर मग्न आहेत. त्याचबरोबर ‘गॉड अँड डेमी गॉड्स’ या इंग्रजी पुस्तकाचेही त्यांचे काम सुरू आहे. या दोन्ही पुस्तकांबरोबरच ‘धनंजय’ आणि ‘गीतांबरी’च्या नव्या आवृत्तीच्या कामात सीमंतिनीताई व्यग्र आहेत. विहंगचे आणखी एक पुस्तक लक्षणीय ठरेल ते म्हणजे भा. द. खेर आपल्या आठवणी शब्दबद्ध करत आहेत. ‘कथा चिरेबंदी’ हे त्यांचे पुस्तक त्यांच्या आजपर्यंतच्या अनुभवांचे सार असेल. मोठा इतिहास त्यातून उलगडला जाईल.
 विहंग प्रकाशनची स्वत:ची वेबसाईट आहे. नव्या युगाचा वेध घेत त्याबरोबर मार्गक्रमण करतानाही त्यांचे मातीशी नाते तुटलेले नाही. प्रत्येक प्रकाशनाला एक चेहरा असतो. सर्व प्रकारचे साहित्य काहीजण प्रकाशित करतात. काहीजण विशिष्ट विषयाला वाहून घेतात. ‘विहंग’ ने भारतीय संस्कृती व आपल्या वैभवशाली इतिहासाला प्राधान्य दिले आहे. आकाशात उत्तुंग भरारी घेण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यांच्यात तेवढे सामथ्र्यही आहे. त्यांनी आपल्याला काय करायचे ते निश्चित केले, त्यानुसार ठामपणे वाटचाल केली. अडचणी त्यांनाही आल्या, पण त्याचा बाऊ करत ते थांबले नाहीत. आपली तपश्चर्या त्यांनी सुरूच ठेवली, त्यामुळे त्यांना वाचकांच्या अलोट प्रतिसादरूपी यशाचे वरदान लाभले. विहंगची वाटचाल यापुढील काळातही अशीच उत्तुंग भरारी घेणारीच असेल यात शंका नाही.