सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्प होणारच- पतंगराव
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्प होणारच- पतंगराव Bookmark and Share Print E-mail
कराड, १२ जून/वार्ताहर
कोणत्याही परिस्थितीत सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्प होणार असल्याचा ठाम विश्वास वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारकान्याच्या निवडणुकीत सामान्य सभासदांच्या ताकदीवर सत्ताधारी रयत सहकार पॅनेल प्रचंड मताधिक्क्य़ाने विजयी होईल, असा दावा त्यांनी केला. मोहिते व भोसले एकदिलाने या निवडणुकीत कार्यरत आहेत.
डॉ. इंद्रजित मोहिते यांनी कारखाना चांगल्या प्रकारे चालविल्याने सभासद त्यांच्याच पाठीशी ठाम राहतील, असा विश्वास डॉ. पतंगराव कदम यांनी व्यक्त केला.
सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्प व नवीन महाबळेश्वर हे प्रकल्प लवकरच कार्यवाहित आणले जाणार आहेत. या प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमीन क्षेत्रासंबंधीचे निर्णय केंद्र शासनाने घेतल्याचे स्पष्ट करून सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होणारच असल्याचा ठाम विश्वास वनमंत्र्यांनी व्यक्त केला.
राज्यातील वनक्षेत्र वाढविण्यात येणार असून, चालू पावसाळी हंगामात चार कोटी रोपांची लागवड करण्यात येणार आहे. सध्या २१ टक्के असलेले वनक्षेत्र ३३ टक्केपर्यंत वाढविण्यात येणार आहे. या नियोजनासाठी येत्या २३ जून रोजी राज्यातील वनाधिकाऱ्यांची व्यापक बैठक पुण्याच्या यशदामध्ये आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे लवकरच उद्घाटन होईल, असे डॉ. कदम म्हणाले.
‘मैनुद्दिनचा काँग्रेसशी संबंध नाही’
मिरज दंगलीचा संशयित सूत्रधार सांगलीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवानचा काँग्रेसशी काडीमात्र संबंध नाही. ते राष्ट्रवादीचेच असल्याचे नि:संदिग्धपणे सांगताना मिरज दंगलीबाबत उद्या मला सविस्तर माहिती मिळेल असे म्हणाले. या प्रकरणात राजकीय दबाव आहे का, असे विचारले असता कोणत्याही प्रकारणात राजकीय दबाव असतोच. त्यामुळे हे प्रकरण काही नवीन नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.