सोलापूर, कराड परिसरात जोरदार पाऊस
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

सोलापूर, कराड परिसरात जोरदार पाऊस Bookmark and Share Print E-mail
कराड, १२ जून/वार्ताहर
कराड परिसराला शुक्रवारी  दुपारी २ वाजल्यानंतर झालेल्या धो-धो पावसाने अक्षरश: धुऊन काढले. या जोरदार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी होताना सखल भागात व रस्त्यावरही पाणी तुंबून राहिल्याने पादचारी व वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली. दरम्यान, वृक्ष उन्मळणे व गोरगरिबांच्या झोपडय़ा या पावसात झोपल्याचे प्रकार घडले.
गुरुवारी रात्रीही कराड शहर परिसर व कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला.  सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत कराड विभागामध्ये ५४, तर एकंदर ६४ कि.मी. पावसाची नोंद झाली. महाबळेश्वर वगळता कोयना धरण क्षेत्रातही पावसाची रिपरिप राहिली. त्यात कोयनानगर येथे १४ एकूण ९८, नवजा येथे ७ एकूण ७८ मि.मी. तर महाबळेश्वर येथे आज पावसाने उघडीप घेताना चालू हंगामातील आज अखेरच्या पावसाची ४४ कि.मी. इतकी नोंद झाली आहे.
कोयनेची वीजनिर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असतानाही कोयना धरणाच्या पाणीपातळीत घटच होत आहे. सध्या धरणाची पाणी पातळी पावणेदोन फुटांनी कमी होवून २०७९ फूट ९ इंच इतकी आहे, तर पाणीसाठय़ात जवळपास एक टीएमसीने घट होऊन तो ३१.७० टीएमसी इतका राहिला आहे. धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस कोसळत असल्याने लवकरच धरणाची पाणीपातळी वाढण्यास सुरुवात होईल, असा विश्वास धरण व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
सोलापुरात पावसाची हजेरी
सोलापूर- सोलापूर शहर व परिसरात शुक्रवारी सायंकाळी मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावून वातावरण उल्हसीत केले. या पावसाच्या सरींनी सारे रस्ते जलमय होऊन काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र या पावसाचा सर्वाना आनंदच वाटला.
मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या होत्या. त्यानंतर हवेत पुन्हा उष्मा वाढल्याने सारेजण हैराण झाले होते. शहरातील तापमान पुन्हा ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची भीती व्यक्त होत असताना मृग नक्षत्राकडे सारेजण आशेने पाहात होते.
त्याप्रमाणे अखेर शुक्रवारी सायंकाळी पाचनंतर पावसाला प्रारंभ झाला. सुमारे दीड तास सर्वत्र मध्यम सरी कोसळत राहिल्या. या पावसात भिजण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही. विशेषत: लहान मुलांनी गाणी म्हणत पाऊस अंगावर झेलत आनंद लुटला. दिवसभर हवेत कमालीचा उष्मा वाढल्यामुळे सर्वाच्या अंगाची लाहीलाही होत होती. घामाच्या धारा असह्य़ ठरत असताना पावसाची आस सारेजण करीत होते. त्याप्रमाणे सायंकाळी आकाशात ढग दाटून आले आणि थोडय़ाच वेळात पावसाला दमदार सुरुवात झाली. त्यामुळे लगोलग संपूर्ण वातावरणात फरक पडला. उष्मा निघून गेला आणि गारवा निर्माण झाला.