जातीआधारित जनगणनेच्या मुद्दय़ावरून भाजपमध्ये गोंधळाची स्थिती
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

जातीआधारित जनगणनेच्या मुद्दय़ावरून भाजपमध्ये गोंधळाची स्थिती Bookmark and Share Print E-mail
पाटणा, १२ जून /पी.टी.आय.
जातीवर आधारित जनगणनेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ठाम विरोध केल्याने आणि पक्षातच असलेल्या मतभेदामुळे जातीवर आधारित जनगणनेस विरोध करण्याची भूमिका भारतीय जनता पक्ष घेण्याची चिन्हे आहेत. या प्रश्नावर नेमकी भूमिका घेण्यात अपयश आल्याने पक्षात गोंधळाची स्थिती असल्याचे स्पष्ट झाले. 
अंदाजपत्रकी अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात जातीवर आधारित जनगणना प्रश्नावर चर्चा झाली असता पक्षाचे उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासह अन्य काही नेत्यांनी पाठिंबा दिला होता. लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव व शरद यादव यांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्या आजच्या अध्यक्षीय भाषणात या संवेदनशील प्रश्नाचा उल्लेखच नव्हता. यामुळे पक्ष सरचिटणीस रविशंकर प्रसाद यांच्यावर पत्रकारांनी प्रश्नांच्या फैरी झाडल्याने काहीशा त्रासलेल्या सुरात ते म्हणाले की, समर्थ व मजबूत राष्ट्रावर आमचा विश्वास असून ही भूमिका संसदेत पक्षाने मांडली आहे. याबाबत केंद्र सरकारची भूमिकाच स्पष्ट नसताना तुम्ही या विषयी पक्षाची भूमिका का विचारता आहात?  
पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी जातीवर आधारित जनगणनेमुळे देशाची एकता धोक्यात येईल असे सांगत विरोध केला होता व हा विषय राष्ट्रीय कार्यकारिणीत उपस्थित करू असे सांगितले होते. जातीवर आधारित जनगणनेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस मोहन भागवत यांनीही ठाम विरोध केला होता. सकाळी पक्ष प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनीही या प्रश्नावर पक्षात मतभेद नसून काँग्रेसनेच आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज असल्याचे सांगितले होते.  
दरम्यान, कार्यकारिणीसाठी आलेले गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मुस्लिम युनायटेड फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निदर्शने केली. गोध्रा दंगलीच्या पाश्र्वभूमीवर मोदी, वरुण गांधी चले जाव, हम बिहार को गुजरात नही बनने देंगे, अशा घोषणा दिल्या.