दशांगुळे उरणारा जॅडेन स्मिथ!
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

दशांगुळे उरणारा जॅडेन स्मिथ! Bookmark and Share Print E-mail
रेखा देशपांडे, रविवार, १३ जून २०१०
‘बापसे बेटा सवाई’- अशीच प्रचीती विल स्मिथनिर्मित ‘कराटे किड’ या चित्रपटातला जॅडेन स्मिथचा थक्क करणारा वावर देतो. ११ वर्षांचा जॅडेन स्मिथ हा विल स्मिथ या अतिशय संवेदनशील अभिनेत्याचा मुलगा. चार वर्षांपूर्वी विल स्मिथबरोबर त्यानं ‘इन परसूट ऑफ हॅपिनेस’मध्ये विलच्या मुलाचीच भूमिका केली होती आणि त्याच्या वावरातली सहजता आपला ठसा उमटवून गेली होती. आता ‘कराटे किड’चा जॅडेन हा नायकच आहे आणि तो अक्षरश: संपूर्ण चित्रपट आपल्या मुठीत घेऊन वावरलाय म्हटलं, तरी अतिशयोक्ती वाटणार नाही.
१९८४ च्या ‘कराटे किड’चा हा रीमेक असला तरी जॅडेन स्मिथचा ‘कराटे किड’ ८४ सालच्या ‘कराटे किड’चा प्रभाव पुसून टाकतो यात शंका नाही.
आफ्रिकन- अमेरिकन ड्रे पार्कर (जॅडेन स्मिथ) या ११ वर्षांच्या मुलाला वडिलांच्या मृत्यूनंतर एकटीनं वाढवणाऱ्या आईच्या शेरी पार्करच्या (ताराजी पी.) नोकरीतल्या बदलीनिमित्तानं डेट्रॉइट सोडून थेट चीनला यावं लागतं. चीनलाच जाण्यातली तिची मजबुरी मात्र कुठेही स्पष्ट झालेली नाही. आपले मित्र, आपल्या परिचयाचं जग सोडून एका सर्वथा वेगळ्या परिसरात, वेगळ्या भाषेत, वेगळ्या लोकांत, मित्रहीन अवस्थेत ड्रेचा भावनिक कोंडमारा होतोय. त्यातच तिथल्या शाळेतली काही गुंड पोरं त्याला त्रास देऊ लागतात. आपल्या देशात परत जावं असं वाटू लागतं. नव्या ठिकाणी नकोरीची, आयुष्याची घडी बसवताना आईला आपल्या या लहानग्याची कशी समजूत घालावी, त्याला बंडखोर, बेशिस्त होण्यापासून कसं वाचवावं ते कळेनासं होतं. गुंड पोरांचा त्रास वाढतच जातो. अशा वेळी बिल्डिंगची देखभाल करणारा एक एकाकी, अबोल, काहीसा उदास आणि तऱ्हेवाईक वाटणारा मि. हान (जॅकी चॅन) ड्रेला वाचवतो.. आधी नकार देतच, पण मग तो ड्रेला कुंग फू शिकवायचं ठरवतो. कारण ड्रेला कुंग फू शिकवणं त्याला आवश्यक वाटू लागतं. कुंग फू शिकवण्याची त्याची पद्धत वेगळीच, ड्रेला अनाकलनीय अशी आहे. मग हळूहळू ड्रेला नकळत त्या पद्धतीचं आकलन होऊ लागतं, आपल्या या तऱ्हेवाईक गुरूंचंही कोडं त्याला उलगडू लागतं. गुरू त्याला थेट कुंग फूच्या अध्यात्मापर्यंत सफर करवून आणतो ती विलक्षण आणि नजरबंदी करणाऱ्या दृश्य अनुभवातून! हा नजरबंदी करणारा अनुभव जसा ड्रेला मिळतो, तसाच तो प्रेक्षकालाही मिळतो. गुंड पोरांचं कुंग फू सामन्याचं आव्हान ड्रेला पेलायचं असतं आणि प्रश्न ड्रेचा तसाच हानचाही असतो. हान बीजिंगमधल्या एका हाऊसिंग सोसायटीचा, बारीकसारीक दुरुस्त्या करणारा प्लंबर- इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक अशी कामं करणारा सामान्य माणूस. एकटा, साधनहीन, तर गुंड पोरांचा प्रशिक्षक हा प्रथितयश कुंग फू प्रशिक्षक! पण हान कुंग फूमध्ये किती खोलवर उतरलेला आहे हे कुणालाच माहीत नसतं, ते आकलन होतं एकटय़ा ड्रेला! साधनहीन, कमजोर पक्ष जिद्दीच्या जोरावर साधनसंपन्न, शिरजोर पक्षावर मोठय़ा थरारक सामन्यानंतर कसा विजय मिळवतो ही कथा अनेक चित्रपटांतून अनेक प्रकारे सादर होत आली आहे. कधी फुटबॉलच्या सामन्यात, कधी क्रिकेटमध्ये, कधी बास्केटबॉलमध्ये, कधी धावण्याच्या, सायकलच्या शर्यतीत..त्यातला थरार प्रेक्षकांच्या परिचयाचा आहे. त्याची परिणतीदेखील प्रेक्षकांना ठाऊक असते. असं असलं तरीही या परिचित नाटय़ाचं सादरीकरण ‘कराटे किड’चं नवं वाटावं असं आहे. त्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे जॅडेन स्मिथचा ‘प्रेझेन्स’. जॅकी चॅन हा खरा कुंगफू कराटे किंग. पण ‘कराटे किड’मधली जॅकी चॅनची भूमिका हेदेखील या सादरीकरणाचं वेगळं वैशिष्टय़ आहे. सगळं मैदान लहानग्या जॅडेन स्मिथसाठी जणू मोकळं सोडून प्रगल्भ जॅकी चॅन वत्सल भावानं कडेला उभा आहे. त्याच्या हानच्या व्यक्तिरेखेतही ‘इकॉनॉमी ऑफ अ‍ॅक्शन’ लक्षणीय आहे आणि त्यानं भूमिकेला दिलेल्या प्रगल्भ परिमाणाची द्योतक. अमेरिकेतून चीनमध्ये आलेल्या ड्रेचं मन या दोन संस्कृतींच्या संघर्षांतही सापडलंय. मेइंग या चिनी मुलीशी झालेल्या त्याच्या मैत्रीतही काही काळ दोन संस्कृतींमधल्या फरकापायी झालेल्या गैरसमजातून अंतराय निर्माण होतो. हाही कथेचा भाग असला तरीही संपूर्ण चित्रपट मुख्यत: व्यक्त होतो तो दृश्यांतून! दृश्यांची भाषा इतकी साधी, सोपी, सरळपणे सामोरी येते की संवादांची फारशी गरजही भासू नये. जॅडेन स्मिथची भूमिकेची जाण, अभिनयाची जाण, त्याचा वावर दशांगुळे उरणारा आणि तरीही संपूर्ण चित्रपटाचा तोलही कुठे ढळू नये, असा सुंदर अनुभव ‘कराटे किड’ देतो.
कराटे किड : निर्माता- विल स्मिथ, दिग्दर्शक- हेराल्ड झ्वार्ट.
कलावंत - जॅडेन स्मिथ, जॅकी चॅन, ताराजी पी.